Sunday, October 25, 2009

तमाशा फडातला वगसम्राट

चंद्रकांत ढवळपुरीकरांनी तमाशात दोन पिढ्या घडविल्या. विठाबाई, कांताबाईंचा ते आदर्श होतेच; पण लता पुणेकर, सुरेखा पुणेकर, रघुवीर खेडकर आणि किरण ढवळपुरीकर या तरुण तमासगीरांनीही भाऊंकडून तमाशा कलेचे धडे घेतले.चंद्रकांत ढवळपुरीकर हे तमाशा क्षेत्रातील अनुभवी आणि बुजुर्ग नाव होते. वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर या नावाने गेली पन्नास वर्षे तमाशा फड गाजविला. आपल्या करारी भारदस्त आवाजाने आणि दमदार अभिनयाने त्यांनी तमाशातल्या वगाला कलात्मक दर्जा मिळवून दिला. चंद्रकांत भाऊंनी साकारलेला "अब्जलखान' अजूनही यापुढे कितीतरी काळ तमाशा रसिकांच्या स्मरणात राहील, यात शंका नाही. वगात खलनायकाची भूमिका करावी ती चंद्रकांत ढवळपुरीकरांनीच. सत्तर ते नव्वद या दशकात एकीकडे विठाबाई, कांताबाई आणि रोशनबाई यांच्या लावणीच्या दिलखेच अदांवर आणि त्यांच्या नशिल्या जवानीवर उभा महाराष्ट्र घायाळ होत होता, अशा काळात चंद्रकांत ढवळपुरीकर या तमासगिराने आपल्या दमदार अभिनयाने तमाशाच्या प्रेषकाला वगाची गोडी लावली. पारंपरिक तमाशाला आधुनिक चेहरा देऊन त्यातील नाट्य अधिक प्रगल्भ केले.अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्‍यातील ढवळपुरी या गावात १९३२ मध्ये या कलावंताचा जन्म झाला. १९५० ते २००० ही ५० वर्षे त्यांनी तमाशा कलेतून समाजप्रबोधन केले. सुरवातीला विष्णू बुवा बांगर यांच्या तमाशात ढवळपुरीकरांनी नाच्याची भूमिका करून आपल्या तमाशा सेवेची नांदी उभी केली. १९५० नंतर तुकाराम खेडकर यांच्याबरोबरीने काम करत ढवळपुरीकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाले. पुढे १९६४ नंतर त्यांनी दत्ता महाडीक पुणेकर यांच्या साथीने तमाशा फड काढला आणि यानंतर मात्र हा बहुआयामी तमासगीर स्वतंत्रपणे आपला तमाशा फड घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकरंजनासाठी फिरत राहिला.तमाशात नाच्या, सोंगाड्या, अभिनय सम्राट, मॅनेजर व तमाशाचा मालक अशा कितीतरी जबाबदाऱ्या झेलत झेलत ढवळपुरीकर लोककलेचा पारंपरिक व कलात्मक बाज तसाच ठेवून तमाशाला प्रबोधनाच्या वाटेवर आणू पाहत होते. ढवळपुरीकरांचा तमाशा का पहायचा? तर तो त्यांच्या वगामुळे, असे आजही बोलले जाते. "संत तुकाराम', "भक्त पुंडलिक', "चित्ता फाडला जावळीचा', "महाराष्ट्र झुकत नाही' हे चंद्रकांत ढवळपुरीकरांचे खास गाजलेले वग होते. या वगांतील गणोजी शिर्के, चंद्रराव मोरे, मंबाजी, आबाजी पाटील या व्यक्तिरेखांतून त्यांनी तमाशाशौकिनांना अक्षरशः वेड लावले. त्यांचा "महाराष्ट्र झुकत नाही' हा वग तर इराण, जर्मनी आणि अमेरिकेतील लोककलांच्या अभ्यासकांचा अभ्यासविषय बनला. तमाशा क्षेत्रात प्रचंड प्रसिद्धी आणि मान-सन्मान लाभलेला हा हाडाचा कलावंत होता. त्यांना महाराष्ट्र सरकारने कला पुरस्कार देऊन गौरविलेच, पण मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणचे अनेक नावाजलेले पुरस्कारही त्यांना मिळाले. प्रवरानगर येथील प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पद्मश्री विखे पाटील पुरस्कारानेही हा कलावंत सन्मानित झाला. असे मानसन्मान आणि पुरस्कार मिळूनही त्यांची नजर तमाशाच्या फडाबाहेर गेली नाही. नाटक, चित्रपटाच्या आमिषाला न भुलता ते लोकनाट्याला नवा बाज देण्यात रममाण झाले.चंद्रकांत ढवळपुरीकरांनी तमाशात दोन पिढ्या घडविल्या. विठाबाई, कांताबाईंचा ते आदर्श होतेच; पण लता पुणेकर, सुरेखा पुणेकर, रघुवीर खेडकर आणि किरण ढवळपुरीकर या तरुण तमासगीरांनीही भाऊंकडून तमाशा कलेचे धडे घेतले. तमाशाच्या अनेक देशी-परदेशी अभ्यासकांचे भाऊ केंद्र होते. तमाशाचे सारे रस्ते याच आधारवडावर येऊन थांबत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संयत व संयमी होते. शुद्ध वाणी, वाणीतला स्पष्ट आणि ओजस्वी भाव भाऊंना भेटणाऱ्या प्रत्येकावर मोहिनी टाकायचा. व्यक्तिगत जीवनात अत्यंत प्रेमळ माणूस म्हणून त्यांची ख्याती होती; पण तमाशात मात्र भाऊंनी खलनायकी पात्रांना साकारले. या अर्थाने भाऊंच्या समोर निळू फुले यांचा आदर्श होता. तमाशाबद्दल बोलताना ते आवर्जून अण्णा भाऊ साठेंचा उल्लेख करत. अण्णा भाऊंना अपेक्षित असलेले लोकनाट्य अजूनही का साकारत नाही, ही त्यांची खंत होती.तमाशात रात्रीचा राजा दिवसा मात्र भिकारी असतो. महाराष्ट्रातल्या साऱ्याच लोककलांची ही शोकांतिका आहे. चंद्रकांत भाऊ याला अपवाद नव्हते. अत्यंत शिस्तबद्धपणे तमाशा चालवूनही तमाशाचा मालक कर्जाच्या खाईत ढकलला जातोच. याला कारण तमाशा कॅन्सरसारखी शिरलेली सावकारशाही आणि शासनाची उदासीनता आहे, असे ते सातत्याने सांगत.आजचा तमाशा बदलला, त्याचा ऑर्केस्ट्रा झाला. नाटक आणि चित्रपटाचे तो अतिरेकी अनुकरण करायला लागला, तमाशाच्या प्रेक्षक बदलला, त्यांची अभिरुची बदलली, कला म्हणून तमाशा किती उरला आणि व्यवसाय म्हणून तो नेमका कुठे चालला आहे, असे प्रश्‍न तमाशासमोर आहेतच, याशिवाय तमासगिरांचे दारिद्य्र, त्यांच्या आरोग्याचे प्रश्‍न, त्यांच्या मुलांचे शिक्षण असे असंख्य प्रश्‍न तमाशा कलेसमोर उभे असताना तमाशा क्षेत्रातला चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्यासारखा मार्गदर्शक फड सोडून जावा, ही तमाशा कलेच्या दृष्टीने अत्यंत शोकात्म घटना आहे.जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून माणसाचे जीवन आमूलाग्र बदलणार, हे वास्तव आहे. सांस्कृतिक क्षेत्रावर या आधुनिक व आर्थिक बदलांचा निश्‍चितपणे परिणाम होत आहे. आज जगभरातल्या लोककला संपुष्टात येऊ पाहत असताना तमाशाकडून पारंपरिक अपेक्षा करून चालणार नाही, हेही वास्तव आहे; पण महाराष्ट्रातील तमाशा ही लोककला कला म्हणून संपत चालली आणि व्यवसाय म्हणून अधिकाधिक शृंगारिक बनली, याची सामाजिक आणि सांस्कृतिक कारणमीमांसा करण्याची ही निश्‍चित वेळ आहे. एकीकडे लोकसाहित्य व लोककलांच्या अभ्यासात तमाशाचा समाजशास्त्रीय अभ्यास झाला नाही आणि जो झाला तो विद्यापीठांच्या एम.फिल. व पीएच.डी. या पदव्यांपर्यंत मर्यादित राहिला. दुसरीकडे शासनाने व सांस्कृतिक कलांचा अभ्यास करणाऱ्या संस्थांनी तमाशा कलेचा विकास होईल, तमाशा कलावंतांना सामाजिक न्याय मिळेल, अशी धोरणात्मक अंमलबजावणी कधीच केली नाही आणि तिसरीकडे शिक्षण, व्यसन, दारिद्य्र आणि नैतिक शिस्तीच्या अभावी तमासगीर केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरत राहिला. तमाशातील जातिव्यवस्था पाहिली तर अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. ""महाराघरी गाणं, मांगाघरी वाजवणं आणि ब्राह्मणाघरी लिव्हनं'' हे म्हणणे तमाशाला तंतोतंत लागू पडते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला ब्रोकन मॅन (पाठीचा कणा मोडलेला माणूस) तमाशा कलेत पावलोपावली दिसतो आहे. या ब्रोकन मॅनचा विचार झाला नाही तर दिवसागणिक लावण्यांचे शृंगारिक नाद सजतील, कला केंद्र उत्तररात्री फुलतील, डान्स बार पुन्हा उघडतील आणि चंद्रकांत ढवळपुरीकरांसारखे तमाशातले असंख्य कलावंत दारिद्य्र व लाचारीचे जिणे जगत जगत जगाचा निरोप घेतील, ही पुरोगामी महाराष्ट्राची सांस्कृतिक शोकांतिका आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातला पाटील बाई नाचवणे हे प्रतिष्ठेचे मानत राहील, तोपर्यंत तमाशा ही कला केवळ शृंगाराचा अड्डाच राहील, हे वेगळे सांगायला नको. चंद्रकांत ढवळपुरीकर हा कलावंत या साऱ्या गोष्टींच्या विरोधी होता. "कला म्हणून तमाशाला जपा,' हा ढवळपुरीकरांनी नव्या तमाशा कलावंतांना दिलेला संदेश आज शासनाने, तमाशाच्या अभ्यासकांनी, कलावंतांनी, प्रेक्षकांनी आणि तमाशाचा विकास करू पाहणाऱ्या प्रत्येकाने लक्षात घेतला, तर या "वगसम्राटा'ला खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.

Friday, October 23, 2009

राज्यातील विजयी उमेदवार 10/2009

नंदूरबार - १ - अक्कलकुवा (अनुसूचित जमाती) - ऍड. के. सी. पाडवी (कॉंग्रेस)२ - शहादा (अनुसूचित जमाती) - पद्माकर वळवी (कॉंग्रेस) ३ - नंदूरबार (अनुसूचित जमाती) - विजयकुमार गावीत (राष्ट्रवादी कॉंग्रेस)४ - नवापूर (अनुसूचित जमाती) - शरद गावीत (समाजवादी पक्ष)धुळे - ५ - साक्री (अनुसूचित जमाती) - योगेंद्र भोये (कॉंग्रेस)६ - धुळे ग्रामीण - प्रा. शरद पाटील (शिवसेना)७ - धुळे शहर - अनिल गोटे (लोकसंग्राम)८ - सिंदखेडा - जयकुमारभाऊ रावळ (भाजप)९ - शिरपूर (अनुसूचित जमाती) - काशिनाथ पावरा (कॉंग्रेस)जळगाव -१० - चोपडा (अनुसूचित जमाती) - जगदीशचंद्र वाळवी (राष्ट्रवादी कॉंग्रेस)११ - रावेर - शिरीष चौधरी (अपक्ष)१२ - भुसावळ (अनुसूचित जाती) - संजय सावकारे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१३ - जळगाव शहर - सुरेशकुमार जैन (शिवसेना)१४ - जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) १५ - अमळनेर - कृषिभूषण पाटील (अपक्ष)१६ - एरंडोल - चिमणराव पाटील (शिवसेना)१७ - चाळीसगाव - राजीव देशमुख (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१८ - पाचोरा - दिलीप वाघ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९ - जामनेर - गिरीश महाजन (भाजप)२० - मुक्ताईनगर - एकनाथ खडसे (भाजप)बुलडाणा - २१ - मलकापूर - चैनसुख संचेती (भाजप)२२ - बुलडाणा - विजयराज शिंदे (शिवसेना)२३ - चिखली - राहुल बोंद्रे (कॉंग्रेस)२४ - सिंदखेडराजा - डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२५ - मेहकर (अनुसुचित जाती) - संजय राजमूलकर (शिवसेना)२६ - खामगाव - गोकुळचंद सानंदा (कॉंग्रेस)२७ - जळगाव (जमोद) - डॉ. संजय कुटे (भाजप)अकोला -२८ - अकोट - संजय गवांडे (शिवसेना)२९ - बालापूर - बळीराम शिरसकर (अपक्ष)३० - अकोला पश्‍चिम - गोवर्धन शर्मा (भाजप)३१ - अकोला पूर्व - हरिदास भाडे (भारीप बहुजन महासंघ)३२ - मूर्तिजापूर - हरिश पिंपळे (भाजप)वाशिम - ३३ - रिसोड - सुभाषराव झनक (कॉंग्रेस)३४ - वाशिम (अनुसूचित जाती) - लखन मलीक (भाजप)३५ - कारंजा - प्रशांत डहाके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)अमरावती -३६ - धामणगाव - वीरेंद्र जगताप (कॉंग्रेस)३७ - बडनेरा - रवी राणा (अपक्ष)३८ - अमरावती - रावसाहेब शेखावत (कॉंग्रेस)३९ - तिवसा - ऍड. यशोमती ठाकूर (कॉंग्रेस) ४० - दर्यापूर (अनुसूचित जाती) - अभिजीत अडसूळ (शिवसेना)४१ - मेळघाट - केवळराम काळे (कॉंग्रेस)४२ - अचलपूर - ओमप्रकाश कडू (अपक्ष)४३ - मोर्शी - डॉ. अनिल बोंडे (अपक्ष)वर्धा -४४ - अर्वी - दादाराव केचे (भाजप)४५ - देवळी - रणजित कांबळे (कॉंग्रेस)४६ - हिंगणघाट - अशोक शिंदे (शिवसेना)४७ - वर्धा - सुरेश देशमुख (अपक्ष)नागपूर -४८ - काटोल - अनिल देशमुख (राष्ट्रवादी कॉंग्रेस) ४९ - सावनेर - सुनील केदार (कॉंग्रेस)५० - हिंगणा - विजयभाऊ घोडमारे (भाजप)५१ - उमरखेड (अनुसूचित जाती) - विजय खडसे (कॉंग्रेस)५२ - नागपूर दक्षिण पश्‍चिम - देवेंद्र फडणवीस (भाजप)५३ - नागपूर दक्षिण - दिनानाथ पडोळे (कॉंग्रेस)५४ - नागपूर पूर्व - कृष्णा खोपडे (भाजप)५५ - नागपूर मध्य - विकास कुंभारे (भाजप)५६ - नागपूर पश्‍चिम - सुधाकर देशमुख (भाजप)५७ - नागपूर उत्तर (अनुसूचित जाती) - डॉ. नितीन राऊत (कॉंग्रेस)५८ - कांपटी - चंद्रशेखर बावनकुले (भाजप) ५९ - रामटेक - आशिष जैस्वाल (शिवसेना)भंडारा -६० - तुमसर - अनिल बावणकर (कॉंग्रेस)६१ - भंडारा - नरेंद्र भोंडेकर (कॉंग्रेस)६२ - साकोली -नानाभाऊ पाटोले (भाजप)गोंदिया - ६३ - अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोळे (भाजप)६४ - तिरोरा - कुशाल बोपाचे (भाजप)६५ - गोंदिया - गोपालदास अगरवाल (कॉंग्रेस)६६ - आमगाव (अनुसूचित जमाती) - रामरतनबापू राऊत (कॉंग्रेस)गडचिरोली -६७ - आरमोरी (अनुसूचित जमाती) - आनंदराव गेडाम (कॉंग्रेस)६८ - गडचिरोली (अनुसूचित जमाती) - डॉ. डल्लुजी नामदेव (कॉंग्रेस)६९ - अहेरी (अनुसूचित जमाती) - दिपक अत्राम (अपक्ष)चंद्रपूर -७० - राजूरा - सुभाष धोटे (कॉंग्रेस)७१ - चंद्रपूर (अनुसूचित जाती) - नानाजी शामकुळे (भाजप)७२ - बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार (भाजप)७३ - ब्रह्मपूरी - अतूल देशकर (भाजप) ७४ - चिमुर - विजय वडेट्टीवार (कॉंग्रेस)७५ - वरोरा - संजय देवतळे (कॉंग्रेस)यवतमाळ -७६ - वणी - वामनराव कासावकर (कॉंग्रेस)७७ - राळेगाव (अनुसूचित जाती) - प्रा. वसंत पुरके (कॉंग्रेस)७८ - यवतमाळ - निलेश पावरेकर (कॉंग्रेस)७९ - दिग्रस - संजय राठोड (शिवसेना) ८० - अरणी - शिवाजीराव मोघे (कॉंग्रेस)८१ - पुसाद - मनोहर नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)८२ - उमरखेड - विजयराव खडसे (कॉंग्रेस)नांदेड -८३ - किनवट - प्रदीप नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) ८४ - हडगाव - माधवराव पवार (कॉंग्रेस)८५ - भोकर - अशोक चव्हाण (कॉंग्रेस)८६ - नांदेड उत्तर - डी. पी. सावंत (कॉंग्रेस)८७ - नांदेड दक्षिण - ओमप्रकाश पोखरणा (कॉंग्रेस)८८ - लोहा - शंकर धोंडगे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)८९ - नायगाव - वसंतराव चव्हाण (अपक्ष)९० - देगलूर (अनुसूचित जाती) - रावसाहेब अंतापूरकर (कॉंग्रेस)९१ - मुखेड - हनुमंत पाटील (कॉंग्रेस)हिंगोली -९२ - वसमत - जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)९३ - कळमनुरी - राजीव सातव (कॉंग्रेस)९४ - हिंगोली - भाऊराव पाटील गोरेगावकर (कॉंग्रेस)परभणी -९५ - जिंतूर - रामप्रसाद कदम (कॉंग्रेस)९६ - परभणी - संजय जाधव (शिवसेना)९७ - गंगाखेड - सीताराम घनदाट (अपक्ष)९८ - पाथरी - मीरा रेंगे (शिवसेना)जालना - ९९ - परतूर - सुरेशकुमार जेठलिया (अपक्ष)१०० - घनसावंगी - राजेश टोपे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१०१ - जालना - कैलास गोरंट्याल (कॉंग्रेस)१०२ - बदनापूर (अनुसूचित जाती) - संतोष सांबरे (शिवसेना)१०३ - भोकरदन - चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१०४ - सिल्लोड - अब्दुल सत्तार अब्दुल नाबी (कॉंग्रेस)औरंगाबाद - १०५ - कन्नड - हर्षवर्धन जाधव (मनसे)१०६ - फुलंब्री - डॉ. कल्याण काळे (कॉंग्रेस)१०७ - औरंगाबाद मध्य - प्रदीप जैस्वाल (अपक्ष)१०८ - औरंगाबाद पश्‍चिम (अनुसूचित जाती) - संजय शिरसाट (शिवसेना)१०९ - औरंगाबाद पूर्व - राजेंद्र दर्डा (कॉंग्रेस) ११० - पैठण - संजय वाघचौरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१११ - गंगापूर - प्रशांत बंब (अपक्ष)११२ - वैजापूर - आर. एम. वाणी (शिवसेना)नाशिक - ११३ - नांदगाव - पंकज भुजबळ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)११४ - मालेगाव मध्य - मुफ्ती मोहम्मद ईस्माइल ए. खलीक (जनसुराज्य शक्ती) ११५ - मालेगाव बाह्य - दादा भौसे (शिवसेना)११६ - बागलान (अनुसूचित जमाती) - उमाजी बोरसे (भाजप)११७ - कळवण - अर्जुन पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस)११८ - चांदवड - शिरीष कोतवाल (अपक्ष)११९ - येवला - छगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१२० - सिन्नर - माणिकराव कोकाटे (कॉंग्रेस)१२१ - निफाड - अनिल कदम (शिवसेना)१२२ - दिंडोरी (अनुसूचित जमाती) - धनराज महाले (शिवसेना)१२३ - नाशिक पूर्व - ऍड. उत्तमराव ढेकले (मनसे) १२४ - नाशिक मध्य - वसंतराव गीते (मनसे)१२५ - नाशिक पश्‍चिम - नितीन भोसले (मनसे)१२६ - देवळाली (अनुसूचित जाती) - बबनराव घोलप (शिवसेना)१२७ - इगतपूरी (अनुसूचित जाती) - निर्मला गावीत (कॉंग्रेस)ठाणे -१२८ - डहाणू (अनुसूचित जाती) - राजाराम ओझारे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया)१२९ - विक्रमगड (अनुसूचित जाती) - ऍड. चिंतामणराव वांगा (भाजप)१३० - पालघर (अनुसूचित जमाती) - राजेंद्र गावीत (कॉंग्रेस)१३१ - बोईसर - विलास तारे (बहुजन विकास आघाडी)१३२ - नालासोपारा - क्षितीजी ठाकूर (बहुजन विकास आघाडी)१३३ - वसई - विवेक पंडीत (अपक्ष)१३४ - भिवंडी ग्रामीण (अनुसूचित जमाती) - विष्णु सावरा (भाजप)१३५ - शहापूर (अनुसूचित जमाती) - दौलत दरोडा (शिवसेना) १३६ - भिवंडी पश्‍चिम - अब्दुल रशिद ताहीर मोमीन (समाजवादी पक्ष)१३७ - भिवंडी पूर्व - अबु आझमी (समाजवादी पक्ष) १३८ - कल्याण पश्‍चिम - प्रकाश भोईर (मनसे)१३९ - मुरबाड - किसन काठोरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१४० - अंबरनाथ (अनुसूचित जाती) - डॉ. बालाजी कीणीकर (शिवसेना)१४१ - उल्हासनगर - उत्तमचंद कुमार (भाजप)१४२ - कल्याण पूर्व - गणपत गायकवाड (अपक्ष)१४३ - डोंबिवली - रवींद्र चव्हाण (भाजप)१४४ - कल्याण ग्रामीण - रमेश पाटील (मनसे)१४५ - मिरा भाईंदर - गिल्बर्ट मेंडोका (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१४६ - ओव्हळा माजीवाडा - प्रताप सरनाईक (शिवसेना)१४७ - कोपरी पंचपाखडी - एकनाथ शिंदे (शिवसेना)१४८ - ठाणे - राजन विचारे (शिवसेना)१४९ - मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१५० - ऐरोली - संदीप नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१५१ - बेलापूर - गणेश नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)मुंबई उपनगर -१५२ - बोरिवली - गोपाळ शेट्टी (भाजप)१५३ - दहिसर - विनोद घोसाळकर (शिवसेना)१५४ - मागठाणे - प्रवीण दरेकर (मनसे)१५५ - मुलुंड - सरदार तारासिंग (भाजप)१५६ - विक्रोळी - मंगेश सांगळे (मनसे) १५७ - भांडुप पश्‍चिम - शिशिर शिंदे (मनसे)१५८ - जोगेश्‍वरी पूर्व - रवींद्र वाईकर (शिवसेना)१५९ - दिंडोशी - राजहंस सिंग (कॉंग्रेस)१६० - कांदिवली पूर्व - रमेश ठाकूर (कॉंग्रेस)१६१ - चारकोप - योगेश सागर (भाजप)१६२ - मालाड पश्‍चिम - अस्लम शेख (कॉंग्रेस)१६३ - गोरेगाव - सुभाष देसाई (शिवसेना)१६४ - वर्सोवा - बाळदेव खोसा (कॉंग्रेस)१६५ - अंधेरी पश्‍चिम - अशोक जाधव (कॉंग्रेस) १६६ - अंधेरी पूर्व - सुरेश शेट्टी (कॉंग्रेस)१६७ - विलेपार्ले - कृष्णा हेडगे (कॉंग्रेस)१६८ - चांदिवली - खान मोहम्मद आरीफ (कॉंग्रेस)१६९ - घाटकोपर पश्‍चिम - राम कदम (मनसे)१७० - घाटकोपर पूर्व - प्रकाश मेहता (भाजप)१७१ - मानखुर्द - अबू आझमी (समाजवादी पक्ष)१७२ - अणुशक्तीनगर - नवाब मलीक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) १७३ - चेंबूर - चंद्रकांत हंडोरे (कॉंग्रेस)१७४ - कुर्ला - मिलिंद कांबळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१७५ - कलिना - कृपाशंकर सिंग (कॉंग्रेस)१७६ - बांद्रा पूर्व - प्रकाश सावंत (शिवसेना)१७७ - ब्रा पश्‍चिम - बाबा सिद्दीकी (कॉंग्रेस)मुंबई शहर -१७८ - धारावी (अनुसूचित जमाती) - वर्षा गायकवाड (कॉंग्रेस)१७९ - सायन कोळीवाडा - जगन्नाथ शेट्टी (कॉंग्रेस)१८० - वडाळा - कालीदास कोळंबकर (कॉंग्रेस)१८१ - माहिम - नितीन सरदेसाई (मनसे)१८२ - वरळी - सचिन अहीर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१८३ - शिवडी - बाळा नांदगावकर (मनसे)१८४ - भायखळा - मधुकर चव्हाण (कॉंग्रेस)१८५ - मालबा हिल - मंगल लोढा (भाजप)१८६ - मुंबादेवी - अमीन पटेल (कॉंग्रेस)१८७ - कुलाबा - अनी शेखर (कॉंग्रेस)रायगड -१८८ - पनवेल - प्रशांत ठाकूर (कॉंग्रेस) १८९ - कर्जत - सुरेशभाऊ ला (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९० - उरण - विवेकानंद पाटील (शेतकरी कामगार पक्ष)१९१ - पेण - धैर्यशील पाटील (शेतकरी कामगार पक्ष)१९२ - अलिबाग - मिनाक्षी पाटील (शेतकरी कामगार पक्ष)१९३ - श्रीवर्धन - सुनील तटकरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९४ - महाड - भरतशेठ गोगावले (शिवसेना)पुणे -१९५ - जुन्नर - वल्लभ बेनके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९६ - आंबेगाव - दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९७ - खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९८ - शिरूर - अशोक पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९९ - दौंड - रमेश थोरात (अपक्ष)२०० - इंदापूर - हर्षवर्धन पाटील (कॉंग्रेस)२०१ - बारामती - अजित पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २०२ - पुरंदर - विजय शिवतारे (शिवसेना)२०३ - भोर - संग्राम थोपटे (कॉंग्रेस)२०४ - मावळ - बाळा भेगडे (भाजप) २०५ - चिंचवड - लक्ष्मण जगताप (अपक्ष)२०६ - पंपरी - अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२०७ - भोसरी - विलास लांडे (अपक्ष)२०८ - वडगाव शेरी - बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २०९ - शिवाजीनगर - विनायक निम्हण (कॉंग्रेस) २१० - कोथरूड - चंद्रकांत मोकाटे (शिवसेना)२११ - खकवासला - रमेश वांजळे (मनसे)२१२ - पर्वती - माधुरी मिसाळ (भाजप) २१३ - हडपसर - महादेव बाबर (शिवसेना)२१४ - पुणे कॅन्टोन्मेंट - रमेश बागवे (कॉंग्रेस)२१५ - कसबा पेठ - गिरीश बापट (भाजप)अहमदनगर -२१६ - अकोले (अनुसूचित जमाती) - मधुकर पिचड (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२१७ - संगमनेर - बाळासाहेब थोरात (कॉंग्रेस)२१८ - शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (कॉंग्रेस)२१९ - कोपरगाव - अशोक काळे (शिवसेना)२२० - श्रीरामपूर - भाऊसाहेब कांबळे (कॉंग्रेस)२२१ - नेवासा - शंकरराव गडाख (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२२२ - शेवगाव पाथर्डी - चंद्रशेखर घुले (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २२३ - राहुरी - शिवाजीराव कर्डीले (भाजप)२२४ - पारनेर - विजय औटी (शिवसेना)२२५ - अहमदनगर शहर - अनिल राठोड (शिवसेना)२२६ - श्रीगोंदा - बबनराव पाचपुते (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२२७ - कर्जत जामखेड - प्रा. राम शिंदे (भाजप)बीड -२२८ - गेवराई - बदामराव पंडीत (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२२९ - माजलगाव - प्रकाशदादा सोळंके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२३० - बीड - जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २३१ - अष्टी - सुरेश धस (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२३२ - केज (अनुसूचित जाती) - डॉ. विमलताई मुंदडा (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२३३ - परळी - पंकजा मुंडे-पालवे (भाजप)लातूर - २३४ - लातूर ग्रामीण - वैजनाथ शिंदे (कॉंग्रेस)२३५ - लातूर शहर - अमित देशमुख (कॉंग्रेस)२३६ - अहमदपूर - बाबासाहेब पाटील (रिडालोस)२३७ - उदगीर (अनुसूचित जाती) - सुधाकर भालेराव (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२३८ - निलंगा - शिवाजीराव पाटील निलंगेकर (कॉंग्रेस)२३९ - औसा - बसवराज पाटील (कॉंग्रेस)२४० - उमरगा - ध्यानराज चौगुले (शिवसेना)उस्मानाबाद -२४१ - तुळजापूर - मधुकरराव चव्हाण (कॉंग्रेस)२४२ - उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर (शिवसेना)२४३ - परांडा - राहुल मोटे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)सोलापूर - २४४ - करमाळा - शामल बागल (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २४५ - माढा - बबनराव शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २४६ - बार्शी - दिलीप सोपल (अपक्ष)२४७ - मोहोळ (अनुसूचित जाती) - लक्ष्मण ढोबळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२४८ - सोलापूर उत्तर - विजयकुमार देशमुख (भाजप)२४९ - सोलापूर मध्य - प्रणिती शिंदे (कॉंग्रेस)२५० - अक्कलकोट - सिद्रामप्पा पाटील (भाजप) २५१ - सोलापूर दक्षिण - दिलीप माने (कॉंग्रेस)२५२ - पंढरपूर - तुकाराम भालके (स्वाभिमानी पक्ष)२५३ - सांगोला - गणपतराव देशमुख (शेतकरी कामगार पक्ष)२५४ - माळशिरस (अनुसूचित जाती) - हनुमंत डोळस (राष्ट्रवादी कॉंग्रेस)सातारा - २५५ - फलटण (अनुसूचित जाती) - दिपक चव्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२५६ - वाई - मकरंद जाधव पाटील (अपक्ष)२५७ - कोरेगाव - शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२५८ - माण - जयकुमार गोरे (अपक्ष)२५९ - कराड उत्तर - शामराव पाटील (अपक्ष) २६० - कराड दक्षिण - विलासराव पाटील (कॉंग्रेस)२६१ - पाटण - विक्रमसिंह पाटणकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२६२ - सातारा - शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी कॉंग्रेस)रत्नागिरी - २६३ - दापोली - सूर्यकांत दळवी (शिवसेना)२६४ - गुहागर - भास्कर जाधव (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२६५ - चिपळूण - सदानंद चव्हाण (शिवसेना)२६६ - रत्नागिरी - उदय सामंत (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२६७ - राजापूर - राजन साळवी (शिवसेना)सिंधुदुर्ग -२६८ - कणकवली - प्रमोद जठार (भाजप)२६९ - कुडाळ - नारायण राणे (कॉंग्रेस)२७० - सावंतवाडी - दिपक केसरकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)कोल्हापूर -२७१ - चंदगड - बाबासाहेब कुपेकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२७२ - राधानगरी - के. पी. पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२७३ - कागल - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२७४ - कोल्हापूर दक्षिण - सतेज पाटील (कॉंग्रेस)२७५ - करवीर - चंद्रदीप नरके (शिवसेना)२७६ - कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर (शिवसेना)२७७ - शाहूवाडी - विनय कोरे (जनसुराज्य शक्ती पार्टी)२७८ - हातकणंगले (अनुसूचित जाती) - डॉ. सुजीक मिनचेकर (शिवसेना)२७९ - इचलकरंजी - सुरेश हाळवणकर (भाजप) २८० - शिरोळ - सा. रे. पाटील (कॉंग्रेस)सांगली -२८१ - मिरज (अनुसूचित जाती) - सुरेश खाडे (भाजप)२८२ - सांगली - संभाजी पवार (भाजप)२८३ - इस्लामपूर - जयंत पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २८४ - शिराळा - मानसिंग नाईक (अपक्ष)२८५ - पलूस कडेगाव - पतंगराव कदम (कॉंग्रेस)२८६ - खानापूर - सदाशिवराव पाटील (कॉंग्रेस)२८७ - तासगाव कवठेमहांकाळ - आर आर पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२८८ - जत - प्रकाश शेंडगे (भाजप)