घरोघरी नाहीत आता मातीच्या चुली!
पायाच्या दोन्ही अंगठ्यांत काठवट धरून भाकरी बडवायची. सुना उभ्या राहून परातीत भाकरी थापायला लागल्या. आईची टराटर फुगलेली भाकरी आणि सुनांचा पिठाचा भाजलेला लगदा. कशाची तुलना कशाशी करायची? आता घरात किचनकट्टा. शेगडी-लायटर. सगळं चकाचक. किचन कसं टीव्हीतल्या जाहिरातीगत दिसतं. ओव्हनपासून ते मायक्रोव्हेवपर्यंत सारं हाजीर! मिक्सरपासून ग्राइंडरपर्यंत सारं तैनात! फक्त चवीचा पत्ता नाही. कुठं हरवली ही चव? चुलीसमोर माझं बालपण गेलं. फुलती चूल... भुरभुरती चूल... भडकलेली चूल... थंड चूल... चुलीची अनेक रूपं पाहिली मी. माझ्या नकळत्या वयात. चूल आणि मूल. माझी आई या चुलीसोबत, माझ्यासोबत जगत होती. जगवत होती. चुलीसोबत पेटणं, धगधगणं, फुलणं, थंड होणं अनुभवलं मी माझ्या वयासोबत. आयुष्याशी जोडली गेली चूल, भानूशी आणि वैल. नाही कळत ना तुम्हाला? नकोच कळायला! काय असते चूल? तीन दगडांची चूल. कुणाचं पेटतं आयुष्य? कशी शोधली असेल माणसानं चूल? झाडावर झाड घासलं. उठली असेल ठिणगी. पेटला असेल वणवा. दावानल! जंगलभर, पोळले असतील पक्षी, प्राणी, पशू. माणसानं वाचवलं असेल आपल्याला. चलाखच तो. मेंदू होता त्याच्याजवळ. भाजलेला पशू-पक्षी-प्राणी-फळ-झाड चाखले असेल त्यानं. हे फारच ग्रेट! जीभ आणि चव. काही तरी वेगळं लागलं असेल माणसाला. मग विस्तवाचा शोध. यातायात. झाडावर झाड आपटा. दगडावर दगड. दिसली असेल ठिणगी. ती पकडा. ती साठवा. साठवता साठवता चुलीचा शोध. आधी फक्त मोकळी- धग. नंतर तीन दगडांची. मग कोणी तर कल्पक कुंभारानं बनवली असेल चूल. फारच बुद्धिमान असेल कुंभार. पेटणारी आग नियंत्रित करणारा. आगीला आकारात बंद करून इप्सिताजवळ पोचवणारा. त्यानंच बनवलं मडकं. मातीला आकार देऊन. पहिलं मडकं घडवणारा कुंभार नोबेल लॉरेटच! त्याला नाही दिलं कुणी नोबेल. बिचारा हाकलला गेला व्यवस्थेतून. ओबीसी हे आरक्षण देऊन! चूल : जणू काही घराची लक्ष्मीच!आई भल्या पहाटे उठून चुलीला पोतेरं द्यायची. हळद-कुंकू लावायची. चुलीत जिवंत ठेवलेला विस्तव फुलवत ठेवायची. शेणीवर. नव्हती तेव्हा काडेपेटी. विस्तव राखेत पेरून ठेवायचा. गरज असेल तेव्हा फुलवायचा. निर्माण करायची आग. जेव्हा चूल थंड पडायची तेव्हा आणायचा शेजाऱ्याच्या चुलीतून विस्तव. हक्कच तो! नव्हतं उसनं-पासनं. कैकदा असा विस्तव आणला आहे मी ही शेळकुंडावरून किंवा वडील आपल्या तंबाखूच्या पिशवीतून दोन गारगोट्या काढायचे. एकमेकांवर आपटून चकमक पेटवायचे. कप असायचा मध्ये. कप म्हणजे कापसाचं कवच. त्यावर फुलायचा विस्तव. पेटायची चूल. नंतर आली आगपेटी. गंधक सापडल्यावर. चुलीनं समृद्ध केलं आयुष्य. चुलीवरच्या गाडग्यातली आमटी. चुलीवरची भाकरी. चुलीवर तापवलेल्या दुधाची साय. वैलावर ठेवलेली भाजी. साऱ्यालाच मातीचा, राखेचा गंध. जिभेवर रेंगाळावी अशी चव. आईच्या हातातून चूल चव कमवायची. भाकरीला पापुद्रा यायचा. चूल लक्ष्मी घराची. आई भडकली, की चुलीशी बोलायची. चूल फुलली, तवा फुलला, की आई हेरायची... भांडण होणार. तव्यातली पहिली इटुकली भाकरी, आमटीचा पहिला थेंब, चहाचा पहिला घोट चुलीचा असायचा. चुलीला दिल्याशिवाय काहीच असायचं नाही आमच्या पदरात. चूल आणि आई दोघीही अन्नदात्या. दोघीत कमी-जास्त कोणीच नाही. जुना काळ आठवणं हा गुन्हाच!काळ बदलला. आई आणि चूल यांच्याबरोबर आम्ही वाढत गेलो. आईच्या घरात सुना आल्या. चूल, भानुशी, वैल, खोपडा, जळण, बाजूला सारलं जाऊन गॅस, शेगडी, लायटर आला. आई पायाच्या दोन्ही अंगठ्यांत काठवट धरून भाकरी बडवायची. सुना उभ्या राहून परातीत भाकरी थापायला लागल्या. आईची टराटर फुगलेली भाकरी आणि सुनांचा पिठाचा भाजलेला लगदा. कशाची तुलना कशाशी करायची? काठवट पायांच्या अंगठ्यात धरून आईची पाच-सहा बाळंतपणं सहज झाली. सुनांचं प्रत्येक वेळी सिझर. डॉक्टरांना जगवायला शेगडीचा जन्म.घरात किचनकट्टा. शेगडी-लायटर. सगळं चकाचक. किचन कसं टीव्हीतल्या जाहिरातीगत दिसतं. ओव्हनपासून ते मायक्रोव्हेवपर्यंत सारं हाजीर! मिक्सरपासून ग्राइंडरपर्यंत सारं तैनात! फक्त चवीचा पत्ता नाही. कुठं हरवली ही चव? हे फारच नॉस्टॅल्जिक झालंय ना? खरंय. आठवणं हा गुन्हाच. उलट येणाऱ्या काळावर स्वार होता आलं पाहिजे; पण कसं व्हायचं स्वार? वेगवेगळ्या जाहिरातींतल्या नवनव्या वस्तूंना घरात मोकाट प्रवेश देऊन? भरपूर लाकडं असायची शेतात. उन्हाळ्यात तोडायची, वाळवायची. पावसाळा निवांत. ददातच नसायची. झाड तोडायचा प्रश्न नसायचा. फक्त बेनायचं. पुन्हा झाड बेभान. जळाऊ लाकडंच लाकडं. भणभणती चूल. धुरात जीव घुटमळतो म्हणून आला वातीचा स्टोव्ह. मग रॉकेलचा प्रेशर स्टोव्ह. शेगडी ते गॅस. प्रगती हवीहवीच असणारी. मग प्रगतीचं शिखर मायक्रोव्हेव. अजून काहीही येईल. हवेतच शिजेल अन्न. चांगलंच आहे असं झालं तर! जगणं सुलभ, संपन्न होतच जायला हवं. प्रश्न इतकाच- शेतातली लाकडं, घरातली लाकडं, शिजवत जायचे लोक अन्न. तवा-चूल-भानुशी-वैल-राख साऱ्यांचंच रक्त जोडलं जायचं भाकरीशी. रॉकेल आलं. स्टोव्ह आला. बघता बघता गॅस आला. शेगडी आली. मायक्रोव्हेव आणि बाकी बरंच काही. प्रगती म्हणून भन्नाटच; पण कुठं? जिथं झाडं नाहीत, इंधन नाही तिथं सारं ठीक. त्यांनी गॅस पेटवावा. त्याची गरजच असते की; पण जिथं ही इंधनाची मुबलकता तिथं हा गॅस, ही शेगडी काय कामाची? कोणी म्हणेल वेळ वाचतो, श्रम वाचतात. अमूक होते-तमूक होतं. त्याचं काय? असेल बरोबर त्यांचं; पण उद्या संपेलच कधी तरी गॅस. रॉकेल आणि तुम्ही शोधलेले बरेच काही. विजेपासून अणूपर्यंत. तेव्हा पुन्हा माघारी वळण्यापेक्षा आत्ताच चूल जपायला काय हरकत आहे. आरोग्य तरी निरोगी राहील. चव शाबूत राहील. ऊर्जा टिकेल. गॅस खूप लोकांना पुरवून वापरता येईल. कोपऱ्यात पडलेली चूल यासाठी तरी शोधायला हवी. आपण कितीही मागास ठरलो तरी...!
Sunday, January 24, 2010
Monday, January 18, 2010
- सुमन कल्याणपूर, नामवंत गायिका
सुमन म्हणजे फूल. सुमन कल्याणपूर या असामान्य गायिकेने गायलेली बहुतेक हिंदी-मराठी गाणी आजही तितकीच टवटवीत वाटतात. त्यांनी पार्श्वगायन सोडल्याला अनेक वर्षं उलटली तरी त्यांचे नाव व गाणे रसिकांच्या मनात तसेच ताजे आहे. महाराष्ट्र सरकारने नुकताच त्यांना 'लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर केला आहे. त्या निमित्ताने. ........... दिवाकर देशपांडे सुमन कल्याणपूर यांना हिंदी सिनेमांची खूप कमी गाणी गायला मिळाली याची त्यांच्या बऱ्याच चाहत्यांना खंत आहे. खरं तर तशी खंत बाळगायचं काहीच कारण नाही. सुमन कल्याणपूर यांच्या समकालीन गायक-गायिकांनी त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक व सातत्याने गाणी गायली असली तरी त्यांच्या व सुमन कल्याणपूर यांच्या गाजलेल्या व रसिकांच्या आजही लक्षात राहिलेल्या गाण्यांचे प्रमाण काढले तर समकालीन गायक-गायिकांपेक्षा सुमन कल्याणपूर यांच्या अशा गाण्यांचे प्रमाण कितीतरी अधिक आहे. आकडेवारीतच बोलायचे झाले तर सुमन कल्याणपूर यांच्या समकालीन गायक-गायिकांच्या गाजलेल्या व लोकांच्या लक्षात राहिलेल्या गाण्यांचे प्रमाण २५ टक्के धरले तर सुमन कल्याणपूर यांच्या अशा गाण्यांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षाही अधिक भरते. गाजलेल्या गाण्यांपेक्षा त्यांची न गाजलेली गाणी शोधणे अधिक अवघड आहे. त्यामुळे हिंदी पार्श्वगायन क्षेत्रातील सर्वाधिक यशस्वी गायिका कोण? या प्रश्ानचे एकमेव उत्तर सुमन कल्याणपूर असे आहे. याचा अर्थ लता मंगेशकर किंवा आशा भोसले या अयशस्वी गायिका आहेत, असा कुणी काढत असेल तर मात्र ते सपशेल चूक आहे. त्यांना यश आणि अपयशाची मोजपट्टीच लावता येत नाही. त्यामुळे या दोन्ही गायिकांना वगळून हिंदी चित्रपटांतील पार्श्वगायकांच्या कारकिदीर्चा आढावा घ्यायचा असेल तर सुमन कल्याणपूर या एकमेव यशस्वी गायिका ठरतात! खरं तर सुमन कल्याणपूर यांचा आवाज लता मंगेशकर यांच्याच जातकुळीचा, पण तरीही पूर्ण वेगळा. या दोन्ही आवाजांमधला फरक तसेच गायनाच्या पद्धतीतला फरक ज्यांचे कान तयार आहेत; अशा फार थोड्या लोकांच्या लक्षात येतो. त्यामुळे हिंदी, मराठीतले लता मंगेशकरांचा आवाज वापरणारे बरेच संगीतकार काही विशिष्ट गाणी सुमन कल्याणपूर यांच्याकडूनच गाऊन घ्यायचे. उदाहरणच द्यायचे झाले तर 'हाले दिल उनको सुनाना था' हे 'फरियाद'मधलं ज्येष्ठ संगीतकार (कै.) स्नेहल भाटकर यांनी संगीत दिलेलं गाणं फक्त सुमन कल्याणपूर यांच्याच आवाजात फिट बसतं. तसंच 'मेरे महबूब न जा, आजकी रात न जा' हे 'नूरमहल'मधलं जानी बाबू कव्वाल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं इतर कोणत्याही आवाजात ऐकण्याची कल्पनाच करवत नाही. त्यांच्या आवाजातलं, गायकीतलं खास असं वेगळेपण अशा अनेक गाण्यांमधून रसिकांना दिसत राहतं. लता मंगेशकर यांचा आवाज वापरणं ही हिंदी चित्रपटसृष्टीची न टाळता येणारी अपरिहार्यता होती, तसं सुमन कल्याणपूर यांच्याबाबत नव्हतं, कारण त्यांचा आवाज ही संगीतकारांची कमजोरी होती. अमुक एका गाण्याला सुमन कल्याणपूर यांचाच आवाज न्याय देऊ शकेल असं संगीतकारांना वाटलं की, ते या अटळतेला बाजूला ठेवून सुमन कल्याणपूर यांच्याकडूनच ते गाणे गाऊन घेत. 'आजकल तेरे-मेरे प्यार के चचेर् हर जुबानपर' हे 'ब्रह्माचारी' चित्रपटातलं गाणं तसं 'चालू टाईप'चं गाणं. ते लता मंगेशकरांनी गायलं असतं तर नक्कीच लोकप्रिय झालं असतं, पण सुमन कल्याणपूर यांच्या आवाजानं मुमताजचा नखरा अगदी अचूक पकडला आहे. त्यामुळे ते आजही रसिकांच्या चांगलंच लक्षात आहे. मराठीत तर अनेक संगीतकारांनी सुमन कल्याणपूर हा आपला ब्रँडच बनवला होता. दशरथ पुजारी, अशोक पत्की, कमलाकर भागवत अशा गुणी संगीतकारांनी सुमन कल्याणपूर यांनाच डोळ्यासमोर ठेवून गाणी बांधली आणि त्यांनी ती गाणी अक्षरश: अजरामर केली. अशा गाण्यांची कितीतरी उदाहरणं सांगता येतील. सुमन कल्याणपूर यांच्यावर अन्याय झाला असे बरेच लोक म्हणतात खरे; पण कमी गाणी गायला मिळाली म्हणून अन्याय झाला असं म्हणण्यापेक्षा जास्ती जास्त चांगली गाणी गायला मिळाल्यामुळे पार्श्वगायनाच्या क्षेत्रात खरा न्याय सुमन कल्याणपूर यांनाच मिळाला, असं वाटतं. जे काही मिळालं ते निखळ होतं आणि या अव्वल गायिकेनं त्या गाण्यांचं सोनंच केलं. शेकडो गाणी गात राहून अनेकांमधला एक कलाकार होण्यापेक्षा मोजकी पण नेमकी लक्षात राहणारी गाणी गाऊन त्यांनी स्वत:चं हिंदी, मराठी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी गायलेल्या इतर भाषांमधल्या गाण्यांमुळे त्यांचं त्या त्या प्रादेशिक भाषांमध्येही असंच स्थान असणार, यात शंका नाही. सुमन कल्याणपूर यांचीही भावना आपल्यावर अन्याय झाला, आपण हिंदी संगीत क्षेत्राच्या राजकारणाचे बळी आहोत, अशी असल्याचे काही ठिकाणी वाचायला मिळते. ते कितपत खरे आहे माहीत नाही. पण 'सुमन कल्याणपूर' या नावाने भारतातील पार्श्वगायनाच्या इतिहासात एक न पुसले जाणारे प्रकरण ठळकपणे लिहिले गेले आहे आणि जोपर्यंत हिंदी, मराठी गाणी ऐकणारे रसिक या भूतलावर आहेत, तोपर्यंत हे नाव आणि त्यांची गाणी लोकांच्या ओठांवर राहणारच आहेत.

Subscribe to:
Comments (Atom)