Sunday, December 20, 2009
टीव्हीची दुनिया
दशकभरात भारतीय टीव्ही इण्डस्ट्रीने भरपूर मोठी झेप घेतली आहे. चॅनल्सच्या या वाढत्या संख्येमुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांची निमिर्ती होऊ लागली. यामुळे टीव्ही प्रोड्युसर्सना असणारी मागणी प्रचंड प्रमाणात वाढलीय. आज चॅनल जगताने बरीच मोठी झेप घेतली आहे. १९९३ मध्ये फक्त दहा चॅनल्स होते. आज या चॅनल्सची संख्या २२० च्या वर पोहोचली आहे. भारतीय टीव्ही इण्डस्ट्रीने गेल्या दशकभरात प्रचंड झेप घेतली आहे. एण्टरटेन्मेण्ट, न्यूज ते स्पोर्ट्स, बिझनेस संबंधित चॅनल्सचा सुळसुळाट झाला आहे. चॅनल्सची संख्या वाढली तशी त्यावरील कार्यक्रमांची संख्या वाढली. यामुळे टीव्ही प्रोड्युसर्सना असणारी मागणीही भरपूर प्रमाणात वाढली. म्हणूनच आज या क्षेत्रात फूल टाइम करिअर करता येणं शक्य आहे. मीडिया इण्डस्ट्रीत आलेल्या बुममुळे वेगवेगळे चॅनल्सना चांगले दिवस आले आहेत. यामुळे टीव्ही प्रोडक्शन या क्षेत्रातही कामाच्या संधी खूप वाढू लागल्या आहेत. टीव्ही प्रोडक्शनमध्ये वेगवेगळ्या टीव्ही मालिका, व्हिडीओ प्रोडक्शन, डिजिटल व्हिडीओ आणि लाइटिंग, एडिटिंग या सगळ्यांचा समावेश होतो. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे. टीव्ही प्रोडक्शन या क्षेत्राचं प्रशिक्षण घेतल्यावर टीव्ही प्रोडक्शन प्रोसेस, फिल्म अॅण्ड व्हिडीओ डिजिटल एडिटिंग, यूज ऑफ डिजिटल कॅमेरा, फिल्म अॅण्ड टीव्ही ग्राफिक्स, लाइट डिझाइन टेक्निक्स, मीडिया प्लॅनिंग, पोस्ट प्रोडक्शन टेक्निक्स आदी क्षेत्रांत काम करता येतं. टीव्ही प्रोडक्शनचं प्रशिक्षण घेतल्यावर स्वतंत्र प्रोड्युसर किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करता येतं. एखाद्या टीव्ही प्रोड्युसरकडे पर्सनल असिस्टण्ट म्हणून काम करण्याचा पर्यायही आहे. कोणत्याही कार्यक्रमाच्या टीव्ही प्रोड्युसरला त्या कार्यक्रमातील कलाकारांच्या येण्याजाण्यापासून कॉश्च्युम, एडिटिंग, शूटिंग, प्रॉपटीर्, बजेट प्लॅनिंग अशा सगळ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात. दूरदर्शन, झी, सोनी, एनडीटीव्ही, स्टार, ई टीव्ही अशा अनेक चॅनल्समध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, ऑन लाइन प्रोड्युसर, प्रोडक्शन डिझायनर अशा प्रकारच्या कामाच्या संधी उपलब्ध असतात. या चॅनल्सवरील संस्कृती, डान्स, कला, मनोरंजनात्मक अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची निमिर्ती करण्यासाठी प्रत्येक चॅनलला टीव्ही प्रोड्युसरची गरज असते. या क्षेत्रातील ज्ञानाबरोबरच टेक्निकल बाजूची माहिती असणाऱ्या प्रोफेशनल्सना बालाजी टीव्ही हाउससारख्या विविध प्रोडक्शन हाउसेसमध्ये असिस्टण्ट एडिटर, असिस्टण्ट साऊण्ड रेकॉडिर्स्ट, असिस्टण्ट कॅमेरामन म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. बीबीसी, सीएनबीसी, सीएनएन, डिस्कव्हरी, नॅशनल जीओग्राफीसारख्या इण्टरनॅशनल चॅनल्समध्येही नोकरीसाठी अर्ज करता येईल. फ्रेशर म्हणून कमीतकमी पाच हजार रुपये पगार तर हमखास मिळतो. तर अनुभवी व्यक्तींना २० हजार आणि त्याहून अधिक पगार मिळतो. काही संस्थांमध्ये या क्षेत्राचं परिपूर्ण प्रशिक्षण देणारे स्पेशलाइज्ड् कोसेर्स उपलब्ध आहेत (फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, पुणे). इथे तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स इन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन उपलब्ध आहे. तसंच एक वर्षाचा सटिर्फिकेट कोर्सही आहे. तर काही संस्थांमध्ये मास कम्युनिकेशन कोर्सच्या सिलॅबसमध्ये टीव्ही प्रोडक्शन हा एक भाग असतो. या कोर्समधून विद्यार्थ्यांना कॅमेरा, दिग्दर्शन, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी अशा विविध विषयांशी ओळख करून घेता येतेत. एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेण्टर, दिल्ली इथे दोन वर्षांचा एमए हा डिग्री कोर्स आहे. तर दिल्लीच्याच इंदप्रस्थ कॉलेजमध्ये बॅचलर मास मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन कोर्सचा एक भाग म्हणून या विषयाचं प्रशिक्षण देण्यात येतं. दिल्लीच्याच द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनने त्यांच्या पीजी डिप्लोमा इन रेडिओ अॅण्ड टीव्ही जर्नलिझम कोर्सचा एक भाग म्हणून नुकताच टीव्ही प्रोडक्शन हा विषय सुरू केला. काही प्रायव्हेट संस्थांमध्ये शॉर्ट टर्म प्रोग्राम्स उपलब्ध आहेत. काही संस्थांतफेर् या विषयाची ओळख करून देणारे सेमिनार्स आणि वर्कशॉप्सही घेतले जातात. स्कूल ऑफ ऑडिओ अॅण्ड इंजिनीअरिंग इथेही डिप्लोमा इन डिजिटल फिल्म मेकिंग, डिग्री इन फिल्म मेकिंग, सटिर्फिकेट कोर्स इन टेलिव्हिजन प्रोडक्शन हे कोसेर्स उपलब्ध आहे. या संस्थांमध्ये प्रवेश घेणं तितकंसं सोपं नसतं. संस्थांची मर्यादित संख्या आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या यामुळे इथली प्रवेश प्रक्रिया थोडी कठीण असते. यासाठी प्रथम लेखी परीक्षा पास व्हावं लागतं. ........ हे कोसेर्स उपलब्ध असणाऱ्या काही नामांकित संस्था : झेविअर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, सेण्ट झेविअर्स कॉलेज, महापालिका मार्ग, मुंबई ०१सत्यजीत रे फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकाता फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे मास कम्युनिकेशन रिसर्च सेण्टर, नवी दिल्ली मैसूर युनिव्हसिर्टी, मैसूर सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, पुणे स्कूल ऑफ ऑडिओ अॅण्ड इंजिनीअरिंग, अंधेरी/चेन्नई/नवी दिल्ली/बंगलोर.
Sunday, December 13, 2009
अखेरची कविता!
अखेरची कविता!:
कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांचा उद्या स्मृतिदिन. १४ डिसेंबर, १९७७ रोजी 'आधुनिक वाल्मिकी' असा गौरव झालेल्या गद
िमांचे अचानक देहावसान झाले. त्यांचे चिरंजीव शरत्कुमार यांनी गदिमा व त्यांचा काळ रेखाटणारे 'कळशीच्या तीर्थावर' हे पुस्तक लिहिले आहे. 'ब्लू बर्ड'ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील माडगूळकरांच्या अखेरच्या कवितेची ही हेलावून टाकणारी हकीकत.
रात्रीचे आठ वाजून गेलेले होते. टेलिफोनची बेल खणखणली. आपल्या दुखऱ्या छातीवर एक हात धरून पप्पांनी रिसीव्हर उचलला. मघापासून बाहेर येऊ पाहणारी खोकल्याची उबळ थोपवत त्यांनी रिसीव्हर कानाला लावला, ''हॅलो...!''
दुसरीकडून आवाज आला, ''हॅलो, स्वामी आहेत काय? मी पी. एल. (पु. ल. देशपांडे) बोलतोय.''
''बोला बोला! काय खबरबात?''
''तुमची तब्येत कशी काय? बरेच दिवसांत गाठभेट नाही.''
''आमच्या तब्येतीची रडकथा नेहेमीचीच आहे. नवीन काय काढलंत?''
''गेल्या महिन्यात बाबा आमट्यांची गाठ पडली होती. त्या उभयतांनी तुमची खूप आठवण काढली. म्हणाले, 'कविश्रींचे पाय अजून 'आनंदवना'ला लागले नाहीत. एकवार त्यांच्या येण्याचा योग घडवून आणा.' तिथं बाबा आणि साधनाताई यांनी एक 'आनंदमेळावा' योजला आहे.''
''त्या थोर पुरुषाचं आमंत्रण कशाला पाहिजे? माझी फार इच्छा आहे येण्याची. पण प्रकृतीनं इथं अगदी जायबंदीच करून ठेवलंय मला''
''बाबांनी तुमच्याकडं एक मागणी केलीय. 'आनंदमेळ्या'साठी त्यांना एक गाणं लिहून पाहिजेय तुमच्याकडून. तुमच्या वतीनं मी होकार देऊन बसलोय. मग कधी देताय?''
''पीएल्, माझी प्रकृती धडधाकट असती तर तुला मी फोनवरसुद्धा ओळी सांगितल्या असत्या. प्रयत्न करतो. त्या महात्म्याला नकार देणं महाकर्मकठीण.''
''उदईक सेवकास धाडतो लेखनाचा कागुद आणण्यासाठी.''
संभाषण संपलं. रात्रीत जागून पपांनी एक सुरेखसं गाणं लिहिलं. नव्या पिढीचं प्रतीक म्हणून 'बालतरूची पालखी' काढण्याची बाबांची अभिनव कल्पना पपांना इतकी आवडली की त्यांनी त्याला साजेसं गीत सहज लिहून हातावेगळं केलं. इतकंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी फोनवरच ते पी. एल्. देशपांड्यांना ऐकवलं. मुखडा ऐकताच पी. एल्.ची कळी खुलली. ते गाणं होतं नवागताच्या स्वागताचं :
'कोवळ्या रोपट्या, आज तू पाहुणा
भूषवी अंगणा येऊनिया।
माणसाची प्रीती घेई रे संगाती
मानाचा अतिथी आमुचा तू।
श्यामसुंदराच्या देहुड्या ढंगात
येइ या घरात आनंदाने।
आनंदाचा नाद मंजुळ संगीत
शाखापल्लवात घेऊनी ये।
कोवळ्या पानात तुझिया नवीन
सूर्याचे किरण नाचू देत।
वनाचा वल्लभ नाचताहे वारा
देई उपहारा गीताचा त्यां।
वर्षतो श्रावण आशिर्वाद त्याचा
मुकुट माथीचा होवो तुज।
इंदपुरीतून धारा वर्षताती
पडू दे त्या माथीं पानांवर।।'
पपांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं हे शेवटचंच गीत. या गाण्यासाठी त्यावेळी आग्रह धरणाऱ्या पी. एल्.ना मात्र या अदृष्टाची यत्किंचितही चाहूल नसावी. अवघ्या चार-पाच दिवसांनी असं काही घडेल आणि पपांचा अखेरचा निरोप घ्यावा लागेल, अशी पुसटशीही जाणीव त्यांना शिवलेली नसावी...

Sunday, November 1, 2009
लोकांचा लेखक
मराठी साहित्यविश्वातला छुपा चातुर्र्वण्य ज्यांना ठाऊक आहे, त्यांना बाबा कदम हा अस्सल कथा लिहिणारा लेखक मान्यते
च्या परिघाबाहेर कसा राहिला, याचे आश्चर्य वाटणार नाही. ते लोकप्रिय होते हा जणू त्यांचा गुन्हाच झाला. ते मुंबई-पुण्याच्या प्रस्थापित साहित्यिकांच्या कंपूत न वावरता दूर कोल्हापुरात राहून झपाटल्यासारखे लिखाण करत राहिले. रहस्यकथा, अपराध कथा, शिकार कथा, कोर्टरूम ड्रामा यांच्या अरण्यात रमले. साहित्यातले हे प्रांत तसे दुय्यम मानले जातात. तशात बाबांचे भरमसाठ लिहिणे म्हणजे श्रेष्ठतेच्या तथाकथित फूटपट्टीत उथळपणाचीच खूण मानली गेली. मानवी मनाचे विश्लेषण करण्याच्या फंदात न पडता ते माणसांच्या अर्तक्य वर्तनाचा, ते करण्यास भाग पाडणाऱ्या परिस्थितीचा, सामाजिक स्थितीचा वेध घेत राहिले. त्यांच्या लिखाणातला ग्रामीण ढंग, रांगडेपणा आणि बैजवार सांगण्याची तऱ्हा वाचकाला आवडली तरी साहित्यप्रांतातील टीकाकार आणि मान्यवर लेखक-प्रकाशकांना ती अदखलपात्र वाटली. पण एखाद्याने खरोखरच त्यांच्या कादंबऱ्यांचा नीट अभ्यास केला तर ज्यांना आपण मोठे लेखक मानले अशा कितीतरी लेखकांच्या लिखाणाहून त्यांचे लेखन मोठे होते, प्रत्ययकारक होते, याचा शोध लागेल. बाबा कदमांचे खरे नाव वीरसेन कदम. त्यांच्या थरारक कादंबऱ्या वाचतानाही हा कोणीतरी भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा माणूस असणार असा वाचकाचा समज होई. प्रत्यक्षात मात्र बाबा उंचीने छोटे आणि मिष्किल होते. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानात अधिकारपदावर होते. त्यामुळे संस्थानी वातावरण, खानदानी रिवाज यांचा त्यांना चांगलाच परिचय होता. तरीही ते स्वत: रमले ते सामान्य माणसांच्या गोष्टींमध्ये. बी.ए., एलएल.बी. झाल्यावर त्यांनी फौजदारी वकील हा पेशा स्वीकारला. पुढे ते सरकारी वकील झाले. ३१ वषेर् त्यांनी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम केले. हे करताना कौटुंबिक कलह, दुश्मनी, इस्टेटीची भांडणे, खून-मारामाऱ्या ह्यापोटी कज्जेदलालीच्या फेऱ्यात अडकलेल्या लोकांशी त्यांचा संपर्क येऊ लागला. मानवी स्वभावाचे अजबगजब नमुने त्यांना पाहायला मिळाले. त्यांना भेटणाऱ्या माणसांमध्ये आणि त्यांना अडकवणाऱ्या परिस्थितीमध्ये त्यांना कादंबऱ्यांची बिजे सापडू लागली. ही माणसे गावरान होती, रांगडी होती, भाबडी होती, निष्पाप होती, चालबाज आणि धोकादायकही होती. बाबांची दुसऱ्याशी संवाद साधण्याची हातोटी विलक्षण. त्यांनी या माणसांच्या कहाण्या जाणून घेतल्या. ती जिथे बोलत नसत त्या मधल्या नि:शब्द जागांमधले अर्थही बाबा ताडत असत. अशा सत्य घटनेवर आधारलेल्या सुमारे नव्वद कादंबऱ्या बाबा कदमांनी लिहिल्या. त्यांनी गुन्हा आणि गुन्हेगार यात फरक केला आणि गुन्हेगाराकडेही आत्मीयतेने पाहिले, ही त्यांच्या लेखकपणाची वेगळी खूण. ते शिकारीचे नादी. या नादापायी त्यांनी कोल्हापुरातली जंगले पालथी घातली. थरार केवळ कल्पनेने कागदावर उतरवला नाही तर स्वत: अंतर्बाह्य अनुभवला. डोंगरची मैना, भालू, जोतिबाचा नवस, अजिंक्य, बदला, ज्वालामुखी, सन्ना, इस्टेट मॅनेजर, पद्मजा अशी नावे असलेल्या त्यांच्या कादंबऱ्यांवर वाचकांच्या उड्या पडत असत. त्यांच्या एकेका कादंबरीच्या आठ आठ आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांनी असंख्य वाचनालये समृद्ध झालेली आहेत. परंतु एवढी प्रचंड लोकप्रियता लाभूनही बाबांना अहंकाराचा वारा लागला नाही. ते कायम ऋजु राहिले. औरंगाबाद येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात बाबा कदमांची प्रकट मुलाखत ठेवण्यात आली होती. बाबांच्या गप्पीष्ट स्वभावाची प्रचीती यावेळी आली. त्यांची साहित्यविषयक धारणा, लेखकीय वेगळेपण आणि जीवनदृष्टी जाणून घेण्यासाठी सरसावून बसलेल्या मुलाखतकारांच्या प्रश्ानंना चक्क बाजूला ठेवून ते एका सत्यघटनेचे कथन असे काही रंगून जाऊन करू लागले की त्यांनी त्या दीड तासात एक अख्खी कादंबरीच उलगडली. त्यांना प्रश्ान् विचारणारे आणि मंडपात बसलेले श्रोते त्यांच्या रसाळ कथनात बघता बघता हरवून गेले. साहित्य संमेलन आणि बाबांचा एवढाच संबंध

च्या परिघाबाहेर कसा राहिला, याचे आश्चर्य वाटणार नाही. ते लोकप्रिय होते हा जणू त्यांचा गुन्हाच झाला. ते मुंबई-पुण्याच्या प्रस्थापित साहित्यिकांच्या कंपूत न वावरता दूर कोल्हापुरात राहून झपाटल्यासारखे लिखाण करत राहिले. रहस्यकथा, अपराध कथा, शिकार कथा, कोर्टरूम ड्रामा यांच्या अरण्यात रमले. साहित्यातले हे प्रांत तसे दुय्यम मानले जातात. तशात बाबांचे भरमसाठ लिहिणे म्हणजे श्रेष्ठतेच्या तथाकथित फूटपट्टीत उथळपणाचीच खूण मानली गेली. मानवी मनाचे विश्लेषण करण्याच्या फंदात न पडता ते माणसांच्या अर्तक्य वर्तनाचा, ते करण्यास भाग पाडणाऱ्या परिस्थितीचा, सामाजिक स्थितीचा वेध घेत राहिले. त्यांच्या लिखाणातला ग्रामीण ढंग, रांगडेपणा आणि बैजवार सांगण्याची तऱ्हा वाचकाला आवडली तरी साहित्यप्रांतातील टीकाकार आणि मान्यवर लेखक-प्रकाशकांना ती अदखलपात्र वाटली. पण एखाद्याने खरोखरच त्यांच्या कादंबऱ्यांचा नीट अभ्यास केला तर ज्यांना आपण मोठे लेखक मानले अशा कितीतरी लेखकांच्या लिखाणाहून त्यांचे लेखन मोठे होते, प्रत्ययकारक होते, याचा शोध लागेल. बाबा कदमांचे खरे नाव वीरसेन कदम. त्यांच्या थरारक कादंबऱ्या वाचतानाही हा कोणीतरी भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा माणूस असणार असा वाचकाचा समज होई. प्रत्यक्षात मात्र बाबा उंचीने छोटे आणि मिष्किल होते. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानात अधिकारपदावर होते. त्यामुळे संस्थानी वातावरण, खानदानी रिवाज यांचा त्यांना चांगलाच परिचय होता. तरीही ते स्वत: रमले ते सामान्य माणसांच्या गोष्टींमध्ये. बी.ए., एलएल.बी. झाल्यावर त्यांनी फौजदारी वकील हा पेशा स्वीकारला. पुढे ते सरकारी वकील झाले. ३१ वषेर् त्यांनी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम केले. हे करताना कौटुंबिक कलह, दुश्मनी, इस्टेटीची भांडणे, खून-मारामाऱ्या ह्यापोटी कज्जेदलालीच्या फेऱ्यात अडकलेल्या लोकांशी त्यांचा संपर्क येऊ लागला. मानवी स्वभावाचे अजबगजब नमुने त्यांना पाहायला मिळाले. त्यांना भेटणाऱ्या माणसांमध्ये आणि त्यांना अडकवणाऱ्या परिस्थितीमध्ये त्यांना कादंबऱ्यांची बिजे सापडू लागली. ही माणसे गावरान होती, रांगडी होती, भाबडी होती, निष्पाप होती, चालबाज आणि धोकादायकही होती. बाबांची दुसऱ्याशी संवाद साधण्याची हातोटी विलक्षण. त्यांनी या माणसांच्या कहाण्या जाणून घेतल्या. ती जिथे बोलत नसत त्या मधल्या नि:शब्द जागांमधले अर्थही बाबा ताडत असत. अशा सत्य घटनेवर आधारलेल्या सुमारे नव्वद कादंबऱ्या बाबा कदमांनी लिहिल्या. त्यांनी गुन्हा आणि गुन्हेगार यात फरक केला आणि गुन्हेगाराकडेही आत्मीयतेने पाहिले, ही त्यांच्या लेखकपणाची वेगळी खूण. ते शिकारीचे नादी. या नादापायी त्यांनी कोल्हापुरातली जंगले पालथी घातली. थरार केवळ कल्पनेने कागदावर उतरवला नाही तर स्वत: अंतर्बाह्य अनुभवला. डोंगरची मैना, भालू, जोतिबाचा नवस, अजिंक्य, बदला, ज्वालामुखी, सन्ना, इस्टेट मॅनेजर, पद्मजा अशी नावे असलेल्या त्यांच्या कादंबऱ्यांवर वाचकांच्या उड्या पडत असत. त्यांच्या एकेका कादंबरीच्या आठ आठ आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांनी असंख्य वाचनालये समृद्ध झालेली आहेत. परंतु एवढी प्रचंड लोकप्रियता लाभूनही बाबांना अहंकाराचा वारा लागला नाही. ते कायम ऋजु राहिले. औरंगाबाद येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात बाबा कदमांची प्रकट मुलाखत ठेवण्यात आली होती. बाबांच्या गप्पीष्ट स्वभावाची प्रचीती यावेळी आली. त्यांची साहित्यविषयक धारणा, लेखकीय वेगळेपण आणि जीवनदृष्टी जाणून घेण्यासाठी सरसावून बसलेल्या मुलाखतकारांच्या प्रश्ानंना चक्क बाजूला ठेवून ते एका सत्यघटनेचे कथन असे काही रंगून जाऊन करू लागले की त्यांनी त्या दीड तासात एक अख्खी कादंबरीच उलगडली. त्यांना प्रश्ान् विचारणारे आणि मंडपात बसलेले श्रोते त्यांच्या रसाळ कथनात बघता बघता हरवून गेले. साहित्य संमेलन आणि बाबांचा एवढाच संबंध.

Sunday, October 25, 2009
तमाशा फडातला वगसम्राट
चंद्रकांत ढवळपुरीकरांनी तमाशात दोन पिढ्या घडविल्या. विठाबाई, कांताबाईंचा ते आदर्श होतेच; पण लता पुणेकर, सुरेखा पुणेकर, रघुवीर खेडकर आणि किरण ढवळपुरीकर या तरुण तमासगीरांनीही भाऊंकडून तमाशा कलेचे धडे घेतले.चंद्रकांत ढवळपुरीकर हे तमाशा क्षेत्रातील अनुभवी आणि बुजुर्ग नाव होते. वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर या नावाने गेली पन्नास वर्षे तमाशा फड गाजविला. आपल्या करारी भारदस्त आवाजाने आणि दमदार अभिनयाने त्यांनी तमाशातल्या वगाला कलात्मक दर्जा मिळवून दिला. चंद्रकांत भाऊंनी साकारलेला "अब्जलखान' अजूनही यापुढे कितीतरी काळ तमाशा रसिकांच्या स्मरणात राहील, यात शंका नाही. वगात खलनायकाची भूमिका करावी ती चंद्रकांत ढवळपुरीकरांनीच. सत्तर ते नव्वद या दशकात एकीकडे विठाबाई, कांताबाई आणि रोशनबाई यांच्या लावणीच्या दिलखेच अदांवर आणि त्यांच्या नशिल्या जवानीवर उभा महाराष्ट्र घायाळ होत होता, अशा काळात चंद्रकांत ढवळपुरीकर या तमासगिराने आपल्या दमदार अभिनयाने तमाशाच्या प्रेषकाला वगाची गोडी लावली. पारंपरिक तमाशाला आधुनिक चेहरा देऊन त्यातील नाट्य अधिक प्रगल्भ केले.अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या गावात १९३२ मध्ये या कलावंताचा जन्म झाला. १९५० ते २००० ही ५० वर्षे त्यांनी तमाशा कलेतून समाजप्रबोधन केले. सुरवातीला विष्णू बुवा बांगर यांच्या तमाशात ढवळपुरीकरांनी नाच्याची भूमिका करून आपल्या तमाशा सेवेची नांदी उभी केली. १९५० नंतर तुकाराम खेडकर यांच्याबरोबरीने काम करत ढवळपुरीकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाले. पुढे १९६४ नंतर त्यांनी दत्ता महाडीक पुणेकर यांच्या साथीने तमाशा फड काढला आणि यानंतर मात्र हा बहुआयामी तमासगीर स्वतंत्रपणे आपला तमाशा फड घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकरंजनासाठी फिरत राहिला.तमाशात नाच्या, सोंगाड्या, अभिनय सम्राट, मॅनेजर व तमाशाचा मालक अशा कितीतरी जबाबदाऱ्या झेलत झेलत ढवळपुरीकर लोककलेचा पारंपरिक व कलात्मक बाज तसाच ठेवून तमाशाला प्रबोधनाच्या वाटेवर आणू पाहत होते. ढवळपुरीकरांचा तमाशा का पहायचा? तर तो त्यांच्या वगामुळे, असे आजही बोलले जाते. "संत तुकाराम', "भक्त पुंडलिक', "चित्ता फाडला जावळीचा', "महाराष्ट्र झुकत नाही' हे चंद्रकांत ढवळपुरीकरांचे खास गाजलेले वग होते. या वगांतील गणोजी शिर्के, चंद्रराव मोरे, मंबाजी, आबाजी पाटील या व्यक्तिरेखांतून त्यांनी तमाशाशौकिनांना अक्षरशः वेड लावले. त्यांचा "महाराष्ट्र झुकत नाही' हा वग तर इराण, जर्मनी आणि अमेरिकेतील लोककलांच्या अभ्यासकांचा अभ्यासविषय बनला. तमाशा क्षेत्रात प्रचंड प्रसिद्धी आणि मान-सन्मान लाभलेला हा हाडाचा कलावंत होता. त्यांना महाराष्ट्र सरकारने कला पुरस्कार देऊन गौरविलेच, पण मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणचे अनेक नावाजलेले पुरस्कारही त्यांना मिळाले. प्रवरानगर येथील प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पद्मश्री विखे पाटील पुरस्कारानेही हा कलावंत सन्मानित झाला. असे मानसन्मान आणि पुरस्कार मिळूनही त्यांची नजर तमाशाच्या फडाबाहेर गेली नाही. नाटक, चित्रपटाच्या आमिषाला न भुलता ते लोकनाट्याला नवा बाज देण्यात रममाण झाले.चंद्रकांत ढवळपुरीकरांनी तमाशात दोन पिढ्या घडविल्या. विठाबाई, कांताबाईंचा ते आदर्श होतेच; पण लता पुणेकर, सुरेखा पुणेकर, रघुवीर खेडकर आणि किरण ढवळपुरीकर या तरुण तमासगीरांनीही भाऊंकडून तमाशा कलेचे धडे घेतले. तमाशाच्या अनेक देशी-परदेशी अभ्यासकांचे भाऊ केंद्र होते. तमाशाचे सारे रस्ते याच आधारवडावर येऊन थांबत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संयत व संयमी होते. शुद्ध वाणी, वाणीतला स्पष्ट आणि ओजस्वी भाव भाऊंना भेटणाऱ्या प्रत्येकावर मोहिनी टाकायचा. व्यक्तिगत जीवनात अत्यंत प्रेमळ माणूस म्हणून त्यांची ख्याती होती; पण तमाशात मात्र भाऊंनी खलनायकी पात्रांना साकारले. या अर्थाने भाऊंच्या समोर निळू फुले यांचा आदर्श होता. तमाशाबद्दल बोलताना ते आवर्जून अण्णा भाऊ साठेंचा उल्लेख करत. अण्णा भाऊंना अपेक्षित असलेले लोकनाट्य अजूनही का साकारत नाही, ही त्यांची खंत होती.तमाशात रात्रीचा राजा दिवसा मात्र भिकारी असतो. महाराष्ट्रातल्या साऱ्याच लोककलांची ही शोकांतिका आहे. चंद्रकांत भाऊ याला अपवाद नव्हते. अत्यंत शिस्तबद्धपणे तमाशा चालवूनही तमाशाचा मालक कर्जाच्या खाईत ढकलला जातोच. याला कारण तमाशा कॅन्सरसारखी शिरलेली सावकारशाही आणि शासनाची उदासीनता आहे, असे ते सातत्याने सांगत.आजचा तमाशा बदलला, त्याचा ऑर्केस्ट्रा झाला. नाटक आणि चित्रपटाचे तो अतिरेकी अनुकरण करायला लागला, तमाशाच्या प्रेक्षक बदलला, त्यांची अभिरुची बदलली, कला म्हणून तमाशा किती उरला आणि व्यवसाय म्हणून तो नेमका कुठे चालला आहे, असे प्रश्न तमाशासमोर आहेतच, याशिवाय तमासगिरांचे दारिद्य्र, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न, त्यांच्या मुलांचे शिक्षण असे असंख्य प्रश्न तमाशा कलेसमोर उभे असताना तमाशा क्षेत्रातला चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्यासारखा मार्गदर्शक फड सोडून जावा, ही तमाशा कलेच्या दृष्टीने अत्यंत शोकात्म घटना आहे.जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून माणसाचे जीवन आमूलाग्र बदलणार, हे वास्तव आहे. सांस्कृतिक क्षेत्रावर या आधुनिक व आर्थिक बदलांचा निश्चितपणे परिणाम होत आहे. आज जगभरातल्या लोककला संपुष्टात येऊ पाहत असताना तमाशाकडून पारंपरिक अपेक्षा करून चालणार नाही, हेही वास्तव आहे; पण महाराष्ट्रातील तमाशा ही लोककला कला म्हणून संपत चालली आणि व्यवसाय म्हणून अधिकाधिक शृंगारिक बनली, याची सामाजिक आणि सांस्कृतिक कारणमीमांसा करण्याची ही निश्चित वेळ आहे. एकीकडे लोकसाहित्य व लोककलांच्या अभ्यासात तमाशाचा समाजशास्त्रीय अभ्यास झाला नाही आणि जो झाला तो विद्यापीठांच्या एम.फिल. व पीएच.डी. या पदव्यांपर्यंत मर्यादित राहिला. दुसरीकडे शासनाने व सांस्कृतिक कलांचा अभ्यास करणाऱ्या संस्थांनी तमाशा कलेचा विकास होईल, तमाशा कलावंतांना सामाजिक न्याय मिळेल, अशी धोरणात्मक अंमलबजावणी कधीच केली नाही आणि तिसरीकडे शिक्षण, व्यसन, दारिद्य्र आणि नैतिक शिस्तीच्या अभावी तमासगीर केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरत राहिला. तमाशातील जातिव्यवस्था पाहिली तर अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. ""महाराघरी गाणं, मांगाघरी वाजवणं आणि ब्राह्मणाघरी लिव्हनं'' हे म्हणणे तमाशाला तंतोतंत लागू पडते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला ब्रोकन मॅन (पाठीचा कणा मोडलेला माणूस) तमाशा कलेत पावलोपावली दिसतो आहे. या ब्रोकन मॅनचा विचार झाला नाही तर दिवसागणिक लावण्यांचे शृंगारिक नाद सजतील, कला केंद्र उत्तररात्री फुलतील, डान्स बार पुन्हा उघडतील आणि चंद्रकांत ढवळपुरीकरांसारखे तमाशातले असंख्य कलावंत दारिद्य्र व लाचारीचे जिणे जगत जगत जगाचा निरोप घेतील, ही पुरोगामी महाराष्ट्राची सांस्कृतिक शोकांतिका आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातला पाटील बाई नाचवणे हे प्रतिष्ठेचे मानत राहील, तोपर्यंत तमाशा ही कला केवळ शृंगाराचा अड्डाच राहील, हे वेगळे सांगायला नको. चंद्रकांत ढवळपुरीकर हा कलावंत या साऱ्या गोष्टींच्या विरोधी होता. "कला म्हणून तमाशाला जपा,' हा ढवळपुरीकरांनी नव्या तमाशा कलावंतांना दिलेला संदेश आज शासनाने, तमाशाच्या अभ्यासकांनी, कलावंतांनी, प्रेक्षकांनी आणि तमाशाचा विकास करू पाहणाऱ्या प्रत्येकाने लक्षात घेतला, तर या "वगसम्राटा'ला खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.
Friday, October 23, 2009
राज्यातील विजयी उमेदवार 10/2009
नंदूरबार - १ - अक्कलकुवा (अनुसूचित जमाती) - ऍड. के. सी. पाडवी (कॉंग्रेस)२ - शहादा (अनुसूचित जमाती) - पद्माकर वळवी (कॉंग्रेस) ३ - नंदूरबार (अनुसूचित जमाती) - विजयकुमार गावीत (राष्ट्रवादी कॉंग्रेस)४ - नवापूर (अनुसूचित जमाती) - शरद गावीत (समाजवादी पक्ष)धुळे - ५ - साक्री (अनुसूचित जमाती) - योगेंद्र भोये (कॉंग्रेस)६ - धुळे ग्रामीण - प्रा. शरद पाटील (शिवसेना)७ - धुळे शहर - अनिल गोटे (लोकसंग्राम)८ - सिंदखेडा - जयकुमारभाऊ रावळ (भाजप)९ - शिरपूर (अनुसूचित जमाती) - काशिनाथ पावरा (कॉंग्रेस)जळगाव -१० - चोपडा (अनुसूचित जमाती) - जगदीशचंद्र वाळवी (राष्ट्रवादी कॉंग्रेस)११ - रावेर - शिरीष चौधरी (अपक्ष)१२ - भुसावळ (अनुसूचित जाती) - संजय सावकारे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१३ - जळगाव शहर - सुरेशकुमार जैन (शिवसेना)१४ - जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) १५ - अमळनेर - कृषिभूषण पाटील (अपक्ष)१६ - एरंडोल - चिमणराव पाटील (शिवसेना)१७ - चाळीसगाव - राजीव देशमुख (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१८ - पाचोरा - दिलीप वाघ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९ - जामनेर - गिरीश महाजन (भाजप)२० - मुक्ताईनगर - एकनाथ खडसे (भाजप)बुलडाणा - २१ - मलकापूर - चैनसुख संचेती (भाजप)२२ - बुलडाणा - विजयराज शिंदे (शिवसेना)२३ - चिखली - राहुल बोंद्रे (कॉंग्रेस)२४ - सिंदखेडराजा - डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२५ - मेहकर (अनुसुचित जाती) - संजय राजमूलकर (शिवसेना)२६ - खामगाव - गोकुळचंद सानंदा (कॉंग्रेस)२७ - जळगाव (जमोद) - डॉ. संजय कुटे (भाजप)अकोला -२८ - अकोट - संजय गवांडे (शिवसेना)२९ - बालापूर - बळीराम शिरसकर (अपक्ष)३० - अकोला पश्चिम - गोवर्धन शर्मा (भाजप)३१ - अकोला पूर्व - हरिदास भाडे (भारीप बहुजन महासंघ)३२ - मूर्तिजापूर - हरिश पिंपळे (भाजप)वाशिम - ३३ - रिसोड - सुभाषराव झनक (कॉंग्रेस)३४ - वाशिम (अनुसूचित जाती) - लखन मलीक (भाजप)३५ - कारंजा - प्रशांत डहाके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)अमरावती -३६ - धामणगाव - वीरेंद्र जगताप (कॉंग्रेस)३७ - बडनेरा - रवी राणा (अपक्ष)३८ - अमरावती - रावसाहेब शेखावत (कॉंग्रेस)३९ - तिवसा - ऍड. यशोमती ठाकूर (कॉंग्रेस) ४० - दर्यापूर (अनुसूचित जाती) - अभिजीत अडसूळ (शिवसेना)४१ - मेळघाट - केवळराम काळे (कॉंग्रेस)४२ - अचलपूर - ओमप्रकाश कडू (अपक्ष)४३ - मोर्शी - डॉ. अनिल बोंडे (अपक्ष)वर्धा -४४ - अर्वी - दादाराव केचे (भाजप)४५ - देवळी - रणजित कांबळे (कॉंग्रेस)४६ - हिंगणघाट - अशोक शिंदे (शिवसेना)४७ - वर्धा - सुरेश देशमुख (अपक्ष)नागपूर -४८ - काटोल - अनिल देशमुख (राष्ट्रवादी कॉंग्रेस) ४९ - सावनेर - सुनील केदार (कॉंग्रेस)५० - हिंगणा - विजयभाऊ घोडमारे (भाजप)५१ - उमरखेड (अनुसूचित जाती) - विजय खडसे (कॉंग्रेस)५२ - नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस (भाजप)५३ - नागपूर दक्षिण - दिनानाथ पडोळे (कॉंग्रेस)५४ - नागपूर पूर्व - कृष्णा खोपडे (भाजप)५५ - नागपूर मध्य - विकास कुंभारे (भाजप)५६ - नागपूर पश्चिम - सुधाकर देशमुख (भाजप)५७ - नागपूर उत्तर (अनुसूचित जाती) - डॉ. नितीन राऊत (कॉंग्रेस)५८ - कांपटी - चंद्रशेखर बावनकुले (भाजप) ५९ - रामटेक - आशिष जैस्वाल (शिवसेना)भंडारा -६० - तुमसर - अनिल बावणकर (कॉंग्रेस)६१ - भंडारा - नरेंद्र भोंडेकर (कॉंग्रेस)६२ - साकोली -नानाभाऊ पाटोले (भाजप)गोंदिया - ६३ - अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोळे (भाजप)६४ - तिरोरा - कुशाल बोपाचे (भाजप)६५ - गोंदिया - गोपालदास अगरवाल (कॉंग्रेस)६६ - आमगाव (अनुसूचित जमाती) - रामरतनबापू राऊत (कॉंग्रेस)गडचिरोली -६७ - आरमोरी (अनुसूचित जमाती) - आनंदराव गेडाम (कॉंग्रेस)६८ - गडचिरोली (अनुसूचित जमाती) - डॉ. डल्लुजी नामदेव (कॉंग्रेस)६९ - अहेरी (अनुसूचित जमाती) - दिपक अत्राम (अपक्ष)चंद्रपूर -७० - राजूरा - सुभाष धोटे (कॉंग्रेस)७१ - चंद्रपूर (अनुसूचित जाती) - नानाजी शामकुळे (भाजप)७२ - बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार (भाजप)७३ - ब्रह्मपूरी - अतूल देशकर (भाजप) ७४ - चिमुर - विजय वडेट्टीवार (कॉंग्रेस)७५ - वरोरा - संजय देवतळे (कॉंग्रेस)यवतमाळ -७६ - वणी - वामनराव कासावकर (कॉंग्रेस)७७ - राळेगाव (अनुसूचित जाती) - प्रा. वसंत पुरके (कॉंग्रेस)७८ - यवतमाळ - निलेश पावरेकर (कॉंग्रेस)७९ - दिग्रस - संजय राठोड (शिवसेना) ८० - अरणी - शिवाजीराव मोघे (कॉंग्रेस)८१ - पुसाद - मनोहर नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)८२ - उमरखेड - विजयराव खडसे (कॉंग्रेस)नांदेड -८३ - किनवट - प्रदीप नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) ८४ - हडगाव - माधवराव पवार (कॉंग्रेस)८५ - भोकर - अशोक चव्हाण (कॉंग्रेस)८६ - नांदेड उत्तर - डी. पी. सावंत (कॉंग्रेस)८७ - नांदेड दक्षिण - ओमप्रकाश पोखरणा (कॉंग्रेस)८८ - लोहा - शंकर धोंडगे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)८९ - नायगाव - वसंतराव चव्हाण (अपक्ष)९० - देगलूर (अनुसूचित जाती) - रावसाहेब अंतापूरकर (कॉंग्रेस)९१ - मुखेड - हनुमंत पाटील (कॉंग्रेस)हिंगोली -९२ - वसमत - जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)९३ - कळमनुरी - राजीव सातव (कॉंग्रेस)९४ - हिंगोली - भाऊराव पाटील गोरेगावकर (कॉंग्रेस)परभणी -९५ - जिंतूर - रामप्रसाद कदम (कॉंग्रेस)९६ - परभणी - संजय जाधव (शिवसेना)९७ - गंगाखेड - सीताराम घनदाट (अपक्ष)९८ - पाथरी - मीरा रेंगे (शिवसेना)जालना - ९९ - परतूर - सुरेशकुमार जेठलिया (अपक्ष)१०० - घनसावंगी - राजेश टोपे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१०१ - जालना - कैलास गोरंट्याल (कॉंग्रेस)१०२ - बदनापूर (अनुसूचित जाती) - संतोष सांबरे (शिवसेना)१०३ - भोकरदन - चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१०४ - सिल्लोड - अब्दुल सत्तार अब्दुल नाबी (कॉंग्रेस)औरंगाबाद - १०५ - कन्नड - हर्षवर्धन जाधव (मनसे)१०६ - फुलंब्री - डॉ. कल्याण काळे (कॉंग्रेस)१०७ - औरंगाबाद मध्य - प्रदीप जैस्वाल (अपक्ष)१०८ - औरंगाबाद पश्चिम (अनुसूचित जाती) - संजय शिरसाट (शिवसेना)१०९ - औरंगाबाद पूर्व - राजेंद्र दर्डा (कॉंग्रेस) ११० - पैठण - संजय वाघचौरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१११ - गंगापूर - प्रशांत बंब (अपक्ष)११२ - वैजापूर - आर. एम. वाणी (शिवसेना)नाशिक - ११३ - नांदगाव - पंकज भुजबळ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)११४ - मालेगाव मध्य - मुफ्ती मोहम्मद ईस्माइल ए. खलीक (जनसुराज्य शक्ती) ११५ - मालेगाव बाह्य - दादा भौसे (शिवसेना)११६ - बागलान (अनुसूचित जमाती) - उमाजी बोरसे (भाजप)११७ - कळवण - अर्जुन पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस)११८ - चांदवड - शिरीष कोतवाल (अपक्ष)११९ - येवला - छगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१२० - सिन्नर - माणिकराव कोकाटे (कॉंग्रेस)१२१ - निफाड - अनिल कदम (शिवसेना)१२२ - दिंडोरी (अनुसूचित जमाती) - धनराज महाले (शिवसेना)१२३ - नाशिक पूर्व - ऍड. उत्तमराव ढेकले (मनसे) १२४ - नाशिक मध्य - वसंतराव गीते (मनसे)१२५ - नाशिक पश्चिम - नितीन भोसले (मनसे)१२६ - देवळाली (अनुसूचित जाती) - बबनराव घोलप (शिवसेना)१२७ - इगतपूरी (अनुसूचित जाती) - निर्मला गावीत (कॉंग्रेस)ठाणे -१२८ - डहाणू (अनुसूचित जाती) - राजाराम ओझारे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया)१२९ - विक्रमगड (अनुसूचित जाती) - ऍड. चिंतामणराव वांगा (भाजप)१३० - पालघर (अनुसूचित जमाती) - राजेंद्र गावीत (कॉंग्रेस)१३१ - बोईसर - विलास तारे (बहुजन विकास आघाडी)१३२ - नालासोपारा - क्षितीजी ठाकूर (बहुजन विकास आघाडी)१३३ - वसई - विवेक पंडीत (अपक्ष)१३४ - भिवंडी ग्रामीण (अनुसूचित जमाती) - विष्णु सावरा (भाजप)१३५ - शहापूर (अनुसूचित जमाती) - दौलत दरोडा (शिवसेना) १३६ - भिवंडी पश्चिम - अब्दुल रशिद ताहीर मोमीन (समाजवादी पक्ष)१३७ - भिवंडी पूर्व - अबु आझमी (समाजवादी पक्ष) १३८ - कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर (मनसे)१३९ - मुरबाड - किसन काठोरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१४० - अंबरनाथ (अनुसूचित जाती) - डॉ. बालाजी कीणीकर (शिवसेना)१४१ - उल्हासनगर - उत्तमचंद कुमार (भाजप)१४२ - कल्याण पूर्व - गणपत गायकवाड (अपक्ष)१४३ - डोंबिवली - रवींद्र चव्हाण (भाजप)१४४ - कल्याण ग्रामीण - रमेश पाटील (मनसे)१४५ - मिरा भाईंदर - गिल्बर्ट मेंडोका (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१४६ - ओव्हळा माजीवाडा - प्रताप सरनाईक (शिवसेना)१४७ - कोपरी पंचपाखडी - एकनाथ शिंदे (शिवसेना)१४८ - ठाणे - राजन विचारे (शिवसेना)१४९ - मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१५० - ऐरोली - संदीप नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१५१ - बेलापूर - गणेश नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)मुंबई उपनगर -१५२ - बोरिवली - गोपाळ शेट्टी (भाजप)१५३ - दहिसर - विनोद घोसाळकर (शिवसेना)१५४ - मागठाणे - प्रवीण दरेकर (मनसे)१५५ - मुलुंड - सरदार तारासिंग (भाजप)१५६ - विक्रोळी - मंगेश सांगळे (मनसे) १५७ - भांडुप पश्चिम - शिशिर शिंदे (मनसे)१५८ - जोगेश्वरी पूर्व - रवींद्र वाईकर (शिवसेना)१५९ - दिंडोशी - राजहंस सिंग (कॉंग्रेस)१६० - कांदिवली पूर्व - रमेश ठाकूर (कॉंग्रेस)१६१ - चारकोप - योगेश सागर (भाजप)१६२ - मालाड पश्चिम - अस्लम शेख (कॉंग्रेस)१६३ - गोरेगाव - सुभाष देसाई (शिवसेना)१६४ - वर्सोवा - बाळदेव खोसा (कॉंग्रेस)१६५ - अंधेरी पश्चिम - अशोक जाधव (कॉंग्रेस) १६६ - अंधेरी पूर्व - सुरेश शेट्टी (कॉंग्रेस)१६७ - विलेपार्ले - कृष्णा हेडगे (कॉंग्रेस)१६८ - चांदिवली - खान मोहम्मद आरीफ (कॉंग्रेस)१६९ - घाटकोपर पश्चिम - राम कदम (मनसे)१७० - घाटकोपर पूर्व - प्रकाश मेहता (भाजप)१७१ - मानखुर्द - अबू आझमी (समाजवादी पक्ष)१७२ - अणुशक्तीनगर - नवाब मलीक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) १७३ - चेंबूर - चंद्रकांत हंडोरे (कॉंग्रेस)१७४ - कुर्ला - मिलिंद कांबळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१७५ - कलिना - कृपाशंकर सिंग (कॉंग्रेस)१७६ - बांद्रा पूर्व - प्रकाश सावंत (शिवसेना)१७७ - ब्रा पश्चिम - बाबा सिद्दीकी (कॉंग्रेस)मुंबई शहर -१७८ - धारावी (अनुसूचित जमाती) - वर्षा गायकवाड (कॉंग्रेस)१७९ - सायन कोळीवाडा - जगन्नाथ शेट्टी (कॉंग्रेस)१८० - वडाळा - कालीदास कोळंबकर (कॉंग्रेस)१८१ - माहिम - नितीन सरदेसाई (मनसे)१८२ - वरळी - सचिन अहीर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१८३ - शिवडी - बाळा नांदगावकर (मनसे)१८४ - भायखळा - मधुकर चव्हाण (कॉंग्रेस)१८५ - मालबा हिल - मंगल लोढा (भाजप)१८६ - मुंबादेवी - अमीन पटेल (कॉंग्रेस)१८७ - कुलाबा - अनी शेखर (कॉंग्रेस)रायगड -१८८ - पनवेल - प्रशांत ठाकूर (कॉंग्रेस) १८९ - कर्जत - सुरेशभाऊ ला (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९० - उरण - विवेकानंद पाटील (शेतकरी कामगार पक्ष)१९१ - पेण - धैर्यशील पाटील (शेतकरी कामगार पक्ष)१९२ - अलिबाग - मिनाक्षी पाटील (शेतकरी कामगार पक्ष)१९३ - श्रीवर्धन - सुनील तटकरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९४ - महाड - भरतशेठ गोगावले (शिवसेना)पुणे -१९५ - जुन्नर - वल्लभ बेनके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९६ - आंबेगाव - दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९७ - खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९८ - शिरूर - अशोक पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९९ - दौंड - रमेश थोरात (अपक्ष)२०० - इंदापूर - हर्षवर्धन पाटील (कॉंग्रेस)२०१ - बारामती - अजित पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २०२ - पुरंदर - विजय शिवतारे (शिवसेना)२०३ - भोर - संग्राम थोपटे (कॉंग्रेस)२०४ - मावळ - बाळा भेगडे (भाजप) २०५ - चिंचवड - लक्ष्मण जगताप (अपक्ष)२०६ - पंपरी - अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२०७ - भोसरी - विलास लांडे (अपक्ष)२०८ - वडगाव शेरी - बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २०९ - शिवाजीनगर - विनायक निम्हण (कॉंग्रेस) २१० - कोथरूड - चंद्रकांत मोकाटे (शिवसेना)२११ - खकवासला - रमेश वांजळे (मनसे)२१२ - पर्वती - माधुरी मिसाळ (भाजप) २१३ - हडपसर - महादेव बाबर (शिवसेना)२१४ - पुणे कॅन्टोन्मेंट - रमेश बागवे (कॉंग्रेस)२१५ - कसबा पेठ - गिरीश बापट (भाजप)अहमदनगर -२१६ - अकोले (अनुसूचित जमाती) - मधुकर पिचड (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२१७ - संगमनेर - बाळासाहेब थोरात (कॉंग्रेस)२१८ - शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (कॉंग्रेस)२१९ - कोपरगाव - अशोक काळे (शिवसेना)२२० - श्रीरामपूर - भाऊसाहेब कांबळे (कॉंग्रेस)२२१ - नेवासा - शंकरराव गडाख (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२२२ - शेवगाव पाथर्डी - चंद्रशेखर घुले (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २२३ - राहुरी - शिवाजीराव कर्डीले (भाजप)२२४ - पारनेर - विजय औटी (शिवसेना)२२५ - अहमदनगर शहर - अनिल राठोड (शिवसेना)२२६ - श्रीगोंदा - बबनराव पाचपुते (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२२७ - कर्जत जामखेड - प्रा. राम शिंदे (भाजप)बीड -२२८ - गेवराई - बदामराव पंडीत (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२२९ - माजलगाव - प्रकाशदादा सोळंके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२३० - बीड - जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २३१ - अष्टी - सुरेश धस (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२३२ - केज (अनुसूचित जाती) - डॉ. विमलताई मुंदडा (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२३३ - परळी - पंकजा मुंडे-पालवे (भाजप)लातूर - २३४ - लातूर ग्रामीण - वैजनाथ शिंदे (कॉंग्रेस)२३५ - लातूर शहर - अमित देशमुख (कॉंग्रेस)२३६ - अहमदपूर - बाबासाहेब पाटील (रिडालोस)२३७ - उदगीर (अनुसूचित जाती) - सुधाकर भालेराव (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२३८ - निलंगा - शिवाजीराव पाटील निलंगेकर (कॉंग्रेस)२३९ - औसा - बसवराज पाटील (कॉंग्रेस)२४० - उमरगा - ध्यानराज चौगुले (शिवसेना)उस्मानाबाद -२४१ - तुळजापूर - मधुकरराव चव्हाण (कॉंग्रेस)२४२ - उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर (शिवसेना)२४३ - परांडा - राहुल मोटे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)सोलापूर - २४४ - करमाळा - शामल बागल (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २४५ - माढा - बबनराव शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २४६ - बार्शी - दिलीप सोपल (अपक्ष)२४७ - मोहोळ (अनुसूचित जाती) - लक्ष्मण ढोबळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२४८ - सोलापूर उत्तर - विजयकुमार देशमुख (भाजप)२४९ - सोलापूर मध्य - प्रणिती शिंदे (कॉंग्रेस)२५० - अक्कलकोट - सिद्रामप्पा पाटील (भाजप) २५१ - सोलापूर दक्षिण - दिलीप माने (कॉंग्रेस)२५२ - पंढरपूर - तुकाराम भालके (स्वाभिमानी पक्ष)२५३ - सांगोला - गणपतराव देशमुख (शेतकरी कामगार पक्ष)२५४ - माळशिरस (अनुसूचित जाती) - हनुमंत डोळस (राष्ट्रवादी कॉंग्रेस)सातारा - २५५ - फलटण (अनुसूचित जाती) - दिपक चव्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२५६ - वाई - मकरंद जाधव पाटील (अपक्ष)२५७ - कोरेगाव - शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२५८ - माण - जयकुमार गोरे (अपक्ष)२५९ - कराड उत्तर - शामराव पाटील (अपक्ष) २६० - कराड दक्षिण - विलासराव पाटील (कॉंग्रेस)२६१ - पाटण - विक्रमसिंह पाटणकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२६२ - सातारा - शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी कॉंग्रेस)रत्नागिरी - २६३ - दापोली - सूर्यकांत दळवी (शिवसेना)२६४ - गुहागर - भास्कर जाधव (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२६५ - चिपळूण - सदानंद चव्हाण (शिवसेना)२६६ - रत्नागिरी - उदय सामंत (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२६७ - राजापूर - राजन साळवी (शिवसेना)सिंधुदुर्ग -२६८ - कणकवली - प्रमोद जठार (भाजप)२६९ - कुडाळ - नारायण राणे (कॉंग्रेस)२७० - सावंतवाडी - दिपक केसरकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)कोल्हापूर -२७१ - चंदगड - बाबासाहेब कुपेकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२७२ - राधानगरी - के. पी. पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२७३ - कागल - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२७४ - कोल्हापूर दक्षिण - सतेज पाटील (कॉंग्रेस)२७५ - करवीर - चंद्रदीप नरके (शिवसेना)२७६ - कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर (शिवसेना)२७७ - शाहूवाडी - विनय कोरे (जनसुराज्य शक्ती पार्टी)२७८ - हातकणंगले (अनुसूचित जाती) - डॉ. सुजीक मिनचेकर (शिवसेना)२७९ - इचलकरंजी - सुरेश हाळवणकर (भाजप) २८० - शिरोळ - सा. रे. पाटील (कॉंग्रेस)सांगली -२८१ - मिरज (अनुसूचित जाती) - सुरेश खाडे (भाजप)२८२ - सांगली - संभाजी पवार (भाजप)२८३ - इस्लामपूर - जयंत पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २८४ - शिराळा - मानसिंग नाईक (अपक्ष)२८५ - पलूस कडेगाव - पतंगराव कदम (कॉंग्रेस)२८६ - खानापूर - सदाशिवराव पाटील (कॉंग्रेस)२८७ - तासगाव कवठेमहांकाळ - आर आर पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२८८ - जत - प्रकाश शेंडगे (भाजप)
Tuesday, September 15, 2009
झंझावात आशा भोसले
मा. दीनानाथांसारख्या प्रतिभासंपन्न पित्याकडलं लाभलेलं स्वरांचं अनमोल धन, विलक्षण जिद्दी मन घेऊन आशाताईंनी पार्श्वगायनाच्या प्रांतात पाऊल ठेवलं, त्याला आता जवळजवळ साठ वर्षे होत आली.
सहा दशकं उलटली तरी आपल्यासारख्या रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद त्यांच्या आवाजात कायम आहे. बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व, या वयाच्या सर्व टप्प्यांत आणि पहाटेपासून उत्तररात्रीपर्यंत, दैनंदिनीच्या कुठल्याही वळणावर "आशाताईं'च्या सुरांनी उभारीच दिलेली आहे."उठी श्रीरामा'सारख्या भूपाळीतून पहाट प्रसन्न केलीय, "पंढरीनाथा झडकरी आता' किंवा "येगं येगं विठाबाई'सारख्या लालित्यपूर्ण भक्तिगीतांनी, दुपारच्या शांत वातावरणात पोटात खड्डा निर्माण केलाय. "नाच रे मोरा'नं शाळकरी सवंगडी भेटल्याचा आनंद दिलाय. "केव्हातरी पहाटे' किंवा "ही वाट दूर जाते'सारखं भावगीत असो, "रेशमाच्या रेघांनी'सारखी लावणी असो, आशाताईंच्या वैविध्यपूर्ण मराठी गीतांनी तांबड्या मातीतल्या साध्या माणसांना, वर्षानुवर्षे जगण्याचं बळ दिलंय.भावगीतांचा टप्पा बदलला, स्वररचनेचे आकार बदलले, रुची बदलली, पण आशाताईंचा आवाज बदलत्या प्रत्येक वळणावर अनोखे रूप घेऊन आपल्यासमोर आलाय. "तरुण आहे रात्र अजुनी' असो, गुलामअलींची गझल असो, नाट्यगीताचा तुकडा असू दे किंवा "जानम समजा करो'ची सुरावट असो, अनेक शब्दकार, संगीतकारांना, त्यांच्या शब्दस्वरांना आपल्या सुरांनी, आशाताईंनी "ताजा ग्रंथ' दिलाय.आपल्या मरगळलेल्या, गांजलेल्या आयुष्याला उभारी देणारा सुरांचा हा झंझावात आहे. आपल्या साऱ्यांच्या दैनंदिनीत सहजतेनं एकरूप झालेला. वैयक्तिक संकट-अडचणी बाजूला ठेवून, प्रसन्नपणे रंगमंचावरून सामोरे येत आपलेही ताणतणाव क्षणात दूर करणारा, सुरांचा हा चैतन्यदायी सुरेल आविष्कार आहे.तब्बल पंचवीस वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शनच्या जमान्यात अरुण काकतकरांच्या सौजन्यानं मी आशाताईंची प्रथम छोट्या पडद्यासाठी प्रकट मुलाखत घेतली. ८५ सालचा सप्टेंबर महिना. शहर मुंबई. फोर्टमधला आशिष स्टुडिओ. साईबाबावाल्या पांडुरंग दीक्षितांचा मुलगा "आशिष' केसातून हात फिरवत, सतत फिरक्या घेणारा, एकदम गंभीर झालेला असतो. कारण कोणत्याही क्षणी आशाताई स्टुडिओत येण्याची शक्यता असते.व्हायोलीन्स लागलेली. बाबूजी म्हणजे सुधीर फडके स्टुडिओत पोचलेले. मुलाखतीत ऐकवायच्या गाण्याचं रेकॉर्डिंग-कम-चित्रण करण्यासाठी आशाताई येणार असतात. त्यांच्या तोंडची गाणी पडद्यावर ज्यांच्यावर चित्रित होतात, त्या "नायिका' आपण नेहमी पाहतो, पण ती गाणी गाणाऱ्या पडद्यामागच्या "गायिका' मात्र प्रथमच पडद्यावर दिसणार असतात. स्टुडिओचा दरवाजा लोटताच मोगऱ्यासारखा वास देणाऱ्या इन्सेसचा गंध दरवळतो. पाठोपाठ खळाळत हसत आशाताई, स्काय ब्ल्यू काठाची पांढरी साडी, त्याच रंगाचे रेडिमेड फूल डोक्यात खोचलेले, अशा आत शिरतात. "चला आशिष, लवकर रेकॉर्डिंग करू या. मला नंतर "मेहेबूब'मध्ये पोचायचंय. एवढ्यात आशाताईंना "बाबूजी' दिसतात. क्षणात त्या विनम्र होतात. "नमस्ते बाबूजी...' निम्म्या झुकत हात जोडून नमस्कार करतात. "गीत रामायणा'त तल्लीन झाल्यानंतर हलते तशी मान हलवत, बाबूजी उजव्या हाताची एक तर्जनी नाचवत, आशाताईंकडे बघत आम्हाला सांगतात... "जशास तसे'मध्ये आशा प्रथम माझ्याकडे गायली.' लगेच आशाताई त्यांचे शब्द खोडतात... "नाही बाबूजी...' "जाळ्यात गावलाय मासा...!' पुढचं पाऊल. दोघांचे डोळे जुन्या आठवणींनी लकाकतात. "जिवलगा कधी रे येशील तू' गाण्याचं टी.व्ही.साठीचं रेकॉर्डिंग संपतं. बाबूजींचे डोळे पाणावलेले. ""त्या परमेश्वराची कृपा आहे. काय बाई आहे ही! पंचावन्न मध्ये मी प्रथम हे गाणं रेकॉर्ड केले अगदी तसाच आवाज. जागान् जागा तीच. कमाल आहे.'' बाबूजींना गदगदून येतं. बाबूजींच्या स्तुतीनं आशाताई संकोचतात. मान डावीकडे झुकवत, रुमाल मानेवर टिपत, काहीशा हसत, डोळ्यांतून साऱ्यांना "धन्यवाद' देत स्टुडिओबाहेर पडतात.इथून माझा त्यांच्याबरोबरचा गप्पाष्टकांचा प्रवास सुरू होतो. कधी प्रभुकुंज, पेडर रोड, कधी खारच्या हेमंतच्या फ्लॅटवर, कधी बर्मन साहेबांचा हॉल, कोल्हापूरचं मैदान, नाशिक वा नागपूरच्या हजारो रसिकांसमोर विस्तारलेलं स्टेज, बडोद्याच्या महाराजांचा दरबार, जिव्हाळ्याच्या बोरिवलीकरांसमोर वा नेहरू स्टेडियमच्या प्रांगणात किंवा ठाण्याच्या "इंद्रधनू'त किंवा अमेरिकेतल्या "सॅन होजे'च्या अधिवेशनात खचाखच भरलेल्या अनिवासी भारतीय मराठी संमेलनात. ऐन पंचाहत्तरीत मुसळधार पावसात पुण्यातल्या रमणबाग शाळेत भिजत, तेवीस गाणी म्हणण्याचा दुर्दम्य उत्साह. सतत इतक्या वर्षांत मी त्यांना खळाळत, उत्साहातच पाह्यलंय. चुकूनही दुर्मुखलेपण नाही.लाल, केशरी, हिरव्या काठांच्या सिल्क साड्या गाण्यागणिक बदलत, डोईवरचं फूल बदलत, कधी नवग्रहांची माळ ठसठशीतपणे गळ्याभोवती पेहनत, कधी पाचू, कधी पोवळं, माणकं, मोती, अशा माळा बदलत, कधी हिऱ्यांची कुडी तर पॅरिसचं मॉडर्न कानातलं लटकवत, मनगटावरचं हिऱ्यामोत्यांनी चकाकणारं ब्रेसलेट आकाशाच्या दिशेनं भिरकावत आशाताई, हातातल्या माईकवरून, पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावरही, "ले गई ले गई... मुझको हुई ना खबर' देशोदेशीच्या रंगमंचावरून म्हणू लागतात, तेव्हा त्यांची नातवंडं शोभतील, अशा वयाची श्रोत्यांमधली जनरेशनही बेभान होते, डुलायला लागते."विचारल्यावीण हेतू कळावा, त्याचा माझा सूर जुळावा...' म्हणता म्हणता अचानक घेतलेली आशाताईंची "तान,' अचानक आलेल्या वळवाच्या सरीचा प्रसन्न आनंद देते. "का रे अबोला'मधील "आर्जव,' "आ आ आजा' मधला "खळाळ,' "मेरा नाम है शबनम' म्हणत गाता गाता केलेला नटखट "संवाद,' "मुहब्बत क्या कहीये' म्हणत "गझल'चा नेमका पकडलेला चालू "ट्रेंड,' "सोना रे सोना रे...'मधून येणारी "नयी निखार,' "दिल चीज क्या है...' ऐकताना लखनौचा सरंजामीशाही महाल डोळ्यांसमोर उभं करणं, "पान खाये सैयॉं'मध्ये आठवणारी नौटंकीवाली, "शूरा मी वंदीले' म्हणताना दीनानाथांना केलेलं वंदन, कधी एखाद्या गाण्यातला "खटका,' तर कधी गाता गाता हसणं. त्या गात असतानाची किती किती रूप अनुभवलीयत. त्या नुसत्या "गायिका' नाहीत, तर प्रत्येक "शो' हिट करणाऱ्या बेस्ट परफॉर्मरही आहेत.केसाचा बुचडा बांधत, तोंडाला कसलंसं तेल चोपडत, त्या त्यांच्या मुंबईतल्या पेडर रोडवरच्या "प्रभुकुंज'मधल्या फ्लॅटच्या खोलीतून बाहेर येतात आणि हॉलमध्ये समोर अचानक उभे ठाकलेले, आपण कुणी ओळखीचे दिसलो की भरभरून हसतात. "माणसांनी आपल्याकडे यावं' ही आपुलकी, अगत्य त्या हसण्यात पुरेपूर भरलेलं असतं. "आलेच हं' असं म्हणत, क्षणात आत पळतात. फटदिशी टिनोपॉल व्हाइट कॉटन साडी नेसून, एकदम ताज्या तवाण्या, प्रसन्न मुद्रेनं तुम्हाला सामोऱ्या येतात.मनात येईल ते मनःपूर्वक बोलून मोकळ्या होतात. राग आला तर साऱ्यांसमक्ष चिडतात, फटकारतात आणि स्वतःची छोटीशी जरी चूक लक्षात आली, तरी "इमेज'चा बाऊ न करता, फट्दिशी "माफ करा हं' म्हणत खळाळतात.इतक्या निकोप, निखळ, स्वच्छ असल्यानंच, गाण्यातही त्यांचं निकोप मन उतरते आणि मग ते गाणं मनाइतकंच उत्कट बनतं. घरात कुणाला बरं नाहीसं झालं, तर "पूजा' बोलतात. मंत्रोच्चार करवतात. उत्कट -हळुवारपणाबरोबरच, "परवशता पारा दैवी'सारखं आक्रमक गाणं म्हणणाऱ्या आशाताई वेळप्रसंगी कणखरही आहेत. सांसारिक टक्केटोणपे खाऊनही म्हणूनच त्या टिकून आहेत.गाणं असो वा खाणं, "जमत नाही म्हणजे काय?' हे आव्हान त्या कायम स्वीकारतात. "अशक्य' हा शब्द त्यांच्या कोशात नाही. बाबांसारखी नाट्यगीतं म्हणता यावीत म्हणून गणपतराव मोहित्यांकडून "ढब' जाणून घेतली. बाबूजींकडून "उच्चारण' घोटून घेतलं. हवं तिथेच व्हायब्रेशन देत, प्रत्येक शब्द, प्रत्येक भावना, वेगळ्या तऱ्हेनं कशी मांडावी हे बर्मनदांकडून शिकून घेतलं, "शब्द चावू नका, मोकळं गा' ही शब्दांवर लक्ष देण्याची शिकवण, सी. रामचंद्रांनी माहीत करून दिली. त्यामुळे "मलमली तारुण्य माझे' मस्त रंगलं. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरावटी ऐकण्यासाठी सोप्या, पण म्हणायला "अवघड,' त्यासाठी मेहनत घेतलीय. एकच आवाज वेगवेगळ्या स्टाइलने कसा आणता येतो त्याचा आत्मविश्वास "दी ट्रेन'पासून सुरू झालेल्या छोट्या बर्मनदांच्या बरोबरच्या प्रवासात वाढला. ध्वनिमुद्रणासाठी ध्वनिक्षेपकासमोर गेल्यावर त्या भोवतीचं सारं विसरतात. राग, लोभ, अन्याय, दुःख सारं सारं विसरून त्या गाण्यातल्या भावनेशी एकरूप होतात. समरस होतात. कारण माईक हाच माझा परमेश्वर आणि गाणं हीच माझी पूजा, यावर त्यांची श्रद्धा आहे.आयुष्यातील चढ-उतारांना, जो क्षण जसा येईल त्याला सामोरं जाणं, हसत जाणे, हा त्यांचा आयुष्यातला पणच आहे. कारण, त्यांचं म्हणणे...माझा रस्ता मी निवडलाय. त्याकरिता कुणाला दोष देणं मला आवडत नाही. मी "स्पष्टवक्ती- फटकळ' असल्याने मला "राजकारणात' आणि राजकारण करण्यात रस नाही.दीदींना त्या मानतात. "चले है तीर नजर के इधर से भी...' हे त्यांच्याबरोबर प्रथम द्वंद्वगीत म्हटले. दीदींनी "आनंदघन' म्हणून संगीतकार या नात्यानं "रेशमाच्या रेघांनी' ही लावणी म्हणवून घेतली. दीदी शेजारी असल्यानं मी म्हटलेली सर्वांत सभ्य लावणी, असं त्या मिस्कीलपणे नोंदवितात. बाळच्या म्हणजे हृदयनाथच्या रचना म्हणताना सर्वांत ताण असतो. तो गाताना गाण्याचे भाव, स्वर, लय, ताल यांना अगदी तपशिलात जाऊन बारकाव्यासह सादर करतो. त्याचं गाणं गाताना भीती वाटते. कारण सुरांच्या बाबतीत त्याचं कडक लक्ष असतं. त्याचं "जिवलगा राहिले रे दूर घर माझे' हे सात मिनिटाचं गाणं मी एका दमात गायलीय. श्वास जातोय कायमचा, असं वाटलं.""नव्या मंडळींनी गाण्याचा भाव अर्थ समजून घ्यायला हवा. संगीतकाराने शब्द कुठे तोडले आहेत, हरकत घेताना आवाजाला कुठे आवळून घ्यायला पाहिजे, ते शिकायला हवं. नुसत्या चाली पाठ करून चालणार नाही,'' असे त्या सुचवतात.पंचाहत्तरीतही त्यांच्या गाण्याची लोकप्रियता टिकून असण्यामागे कारण त्या सांगतात, की जसा जमाना आला, तशी मी बदलत गेले. त्या त्या जमान्याच्या स्टाइलमध्ये अडकले असते, तर संपले असते. सतत सर्वोत्तमच द्यायचं हा ध्यास. त्यामुळे मी गाणं आजही एन्जॉय करते. सुरेश भट आशाताईंना उद्देशून म्हणत...तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहोवार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहोतलवार तुझ्या गीतांची, बिजलीसम तळपत राहो।।
)

Sunday, September 13, 2009
कृष्णमूर्ती यांच्या सहवासात
जे. कृष्णमूर्ती मानवी जीवनाचा जसा स्वतंत्र विचार करतात तसा शिक्षणाचाही. त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी साधलेला संवाद शिक्षणाचा नवाच अर्थ सांगतो... ............. जे. कृष्णमूतीर् यांनी धर्माच्या रूढ संकल्पनेलीकडं जावून मानवजातीला उत्क्रांत करील अशा धर्मशील, प्रज्ञावंत मनाच्या निमिर्तीची प्रक्रिया जगासमोर मांडली. मात्र, ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून माहीत नसतात. त्यांच्या प्रेरणेने कृष्णमूतीर् फाऊंडेशनने जगभर ८ शाळा सुरू केल्या. या शाळांमध्ये विविध प्रयोग केले जातात. कृष्णमूतीर् शिक्षणाकडे जीवनाला नवी दृष्टी देणारे, जगण्याचे नवे आकलन शिकवणारे क्षेत्र म्हणून पाहतात. त्यांनी शिक्षक आणि विद्याथीर् यांच्याशी ज्या चर्चा केल्या, त्या चर्चांची पुस्तके प्रकाशित झाली. अलीकडेच प्रकाशित झालेल्या दोन अनुवादित पुस्तकांमध्ये शिक्षक आणि विद्याथीर् प्रश्ान् विचारतात आणि कृष्णमूतीर् उत्तरे देतात. ही केवळ औपचारिक उत्तरे नाहीत तर कृष्णमूतीर् त्या प्रश्ानच्या मागील अज्ञानालाच आघाताचा विषय बनवून जीवनदृष्टी स्पष्ट करणारी उत्तरे देतात. त्यामुळे प्रश्ान् जरी नेहमीचे असले तरी उत्तरे वेगळी, जीवनभाष्य करणारी आहेत. स्वत:चे आकलन समजावून देणारी आणि अंतरंगाचा बहर उमजून सांगणारी आहेत. प्रश्ान् जरी विविधांगी असले तरी काही महत्त्वाच्या शीर्षकांमध्ये ती सर्व प्रश्ानेत्तरे बांधली आहेत. शिक्षणकार्य, स्वातंत्र्य, श्ावण, सृजनशील असंतोष, खुले मन, धामिर्कता, धर्मशील मन व विज्ञाननिष्ठ मन, ज्ञान आणि प्रज्ञा, स्वातंत्र्य व सुव्यवस्था, संवेदना, भीती, हिंसावृत्ती, मनातील पूर्वग्रह व प्रतिमा, वागणूक, योग्य शिक्षण, व्यापक दृष्टिकोन, कृती, स्पर्धा, भीती, शिकवणे आणि शिकणे, चांगले मन, नकारात्मक दृष्टिकोन, चिंतन आणि शिक्षण, बहरणे इत्यादी ५० पेक्षा जास्त विषयांवर कृष्णमूतीर् बोलतात. वाचक कृष्णमूतीर्ंच्या शिक्षणविषयक चिंतनात न्हाऊन जातो आणि खऱ्या अर्थाने बहरून जातो. ही तत्त्वज्ञानाची चर्चा असली तरी प्रश्न साधे, सोपे आहेत. विशेषत: विद्यार्थ्यांचे प्रश्ान् अधिक नेमके व निरागस आहेत. 'आपल्याला प्रसिद्ध व्यक्ती का व्हावेसे वाटते?' 'आम्हाला खेळात जितकी मौज वाटते तितकी अभ्यासात का वाटत नाही?' 'आपण गरिबांचा द्वेष का करतो?' 'आम्ही खोडकर का असतो?' 'श्ाीमंत गविर्ष्ट का असतात?' 'मी पक्ष्यांच्या जवळ गेलो तर ते उडून का जातात?' 'मी धूम्रपान करतो तेव्हा शिक्षक माझ्यावर का चिडतात?' अशा प्रश्ानंना कृष्णमूतीर् अगदी सहज तात्त्विक डूब देतात. कृष्णजी म्हणतात की शिक्षण म्हणजे परीक्षा उत्तीर्ण होणे, पदवी मिळवणे, नोकरी पटकावणे व लग्न करणे एवढेच नव्हे तर पक्ष्यांचे कूजन ऐकणे, गगनाचे दर्शन घेणे, एखाद्या वृक्षाचे असाधारण सौंदर्य पाहणे, टेकड्यांच्या आकृत्या पाहणे व अंत:करणाने साथ देणे हे सारेच. ते विद्यार्थ्यांना सांगतात, 'शिक्षकांचे शिकवण्यावर खरेच प्रेम असेल तर तुम्ही अनन्यसाधारण व्यक्ती व्हाल. शिक्षक मनाने मुक्त असतो तेव्हा त्याच गोष्टींचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडतो. शिक्षण यशावर प्रेम करायला शिकवते पण आपण जे काही करतो, त्यावर प्रेम करायला शिकवत नाही, याबद्दल कृष्णजी नाराजी व्यक्त करतात. आज स्पर्धा हा प्रतिष्ठित शब्द झाला आहे. परीक्षांमुळे दरवषीर् किमान चार हजार विद्याथीर् आत्महत्या करतात. तरी आपण स्पर्धांना प्रतिष्ठा देतो. स्पर्धा आणि महत्त्वाकांक्षेविषयी कृष्णमूतीर्ंची मांडणी अंतर्मुख करणारी आहे. महत्त्वाकांक्षी माणसाला प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून मान मिळतो. महत्त्वाकांक्षी, आक्रमक मनुष्य, विजीगिषू व प्रतिष्ठित समजला जातो. पण जेव्हा स्पर्धा नाहीशी होते तेव्हाच खरे शिक्षण अस्तित्वात येते. जो मनुष्य काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतो, तो कुरूप असतो इतके थेटपणे कृष्णमूतीर् सुनावतात. शिक्षणातून समाजपरिवर्तन झाले पाहिजे असे बोलले जाते. पण परिवर्तन नेमके काय? कृष्णमूतीर्ंची परिवर्तनाची संकल्पनाच खूप वेगळी आहे. ते परिवर्तन आमूलाग्र आहे. प्रेम हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. प्रेमशून्य समाज म्हणजे वाळवंट. ज्याक्षणी जिव्हाळा निर्माण होतो त्याक्षणी जीवन सुंदर होते. तुम्ही खूप हुशार असाल, पण तुमच्या ठायी प्रेमभावना नसेल तर तुमचे सारे आयुष्य दु:खीकष्टी होईल. लहान वयात जर तुम्हाला प्रेमभावना नसेल, लोकांकडे, प्राण्यांकडे, फुलांकडे प्रेमळपणे तुम्ही बघत नसाल तर मोठे झाल्यावर जीवन पोकळ, रिकामे वाटेल. पण ज्या क्षणी प्रेम नावाची भावना जागेल तेव्हा जीवन बदलून जाईल. कृष्णमूतीर्ंचे सारे चिंतन थक्क करणारे आहे. साध्या, सरळ भाषेत ते महान तत्त्वज्ञान सांगतात. शिक्षणातून सत्याचा शोध घेण्याचे, स्वत:चा बोध घेण्याचे सार्मथ्य अंगी यावे, अशी त्यांची मांडणी आहे. तेव्हा शाळेकडून त्यांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. 'जगात घडते त्याची शाळा म्हणजे एक छोटी आवृत्ती आहे आणि सर्व विनाशकारी गोंधळ, दु:ख, हालअपेष्टा पाहून वाटते की नव्या मनाची निमिर्ती एवढाच त्यावर मार्ग आहे. ते केवळ योग्य प्रकारच्या शिक्षणानेच घडू शकेल. त्यासाठी शांतपणे बसून मनाचे कार्य बघणे हे वर्गात बसण्या इतकेच महत्त्वाचे आहे. ................. या गोष्टींचा विचार करा लेखक : जे. कृष्णमूर्ती अनुवाद: दिवाकर घैसास पाने: २६०, किंमत: १९५ रुपये
Wednesday, September 9, 2009
बुद्धिबळ तपस्वी
सांगली ही रंगभूमीची पंढरी आहे, तशी ती बुद्धिबळासारख्या खेळाचीही आहे. या सांगली शहरात बुद्धिबळासाठी सातत्याने धडपडणारे एक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याशी बोलताना ते किती बुद्धिबळमय झाले आहेत, हे लक्षात येत असे. नरहर व्यंकटेश तथा भाऊसाहेब पडसलगीकर यांनी आपला संसारच बुद्धिबळाशी थाटला होता. जुन्या मंडळींसाठी ते भाऊ किंवा भाऊराव होते. पडसलगीकर यांचे नाव उच्चारले की सांगली आणि त्यांचे नूतन बुद्धिबळ मंडळ ही दोन नावे प्रकर्षांने डोळ्यांसमोर येत असत. बुद्धिबळाच्या खेळासाठी त्यांनी अक्षरश: वणवण केली. बुद्धिबळाचा प्रसार व्हावा आणि तरुण वर्गात हा खेळ लोकप्रिय व्हावा, यासाठी ते विद्यापीठांपासून प्राथमिक शाळांपर्यंत हिंडले. त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. कुणाच्या खेळण्याने वा न खेळण्याने आपल्यापैकी कुणाच्याही जीवनात फरक पडत नसतो, पण त्यांनी तसे मानले नाही. प्रचंड जिद्दीनिशी त्यांनी बुद्धिबळाच्या स्पर्धा भरवल्या आणि त्या यशस्वी करून दाखवल्या. १९४१ मध्ये जेव्हा त्यांनी आणि त्यांचे मित्र भाऊसाहेब राजवाडे, दाजीसाहेब दीक्षित, सोपानराव शिंगारे यांनी नूतन बुद्धिबळ मंडळाची स्थापना केली, तेव्हा त्यांच्या हातात एक पैसाही नव्हता. ६८ वर्षांमध्ये या परिस्थितीत फार फरक दिसला नाही. बऱ्याचदा स्वत:च्या खिशाला चाट मारूनही त्यांनी ही स्पर्धा यशस्वी केली आहे. वार्षिक स्पर्धेचा काळ आला की भाऊराव पुण्या-मुंबईपासून बेळगावपर्यंत सगळीकडे हिंडायचे. अनेक उद्योजकांकडून, श्रीमंत व्यक्तींकडून त्यांनी थोडेथोडे पैसे जमवूनही स्पर्धा साजऱ्या केल्या, त्यांना कुठेही कमी पडू दिले नाही. तसे पाहिले तर भाऊराव हे बुद्धिबळ आयुष्यभर जगले. त्यांचे वडील बुद्धिबळ खेळायचे, आजोबाही त्या खेळात माहीर होते. १९४६ मध्ये भाऊरावांनी इकडून, तिकडून शंभर रुपये गोळा करून स्पर्धा भरवायला प्रारंभ केला. तेव्हापासून अगदी या वर्षी मे महिन्यापर्यंत त्यांनी त्यात खंड पडू दिला नाही. बुद्धिबळ हा विषय त्यांच्या दृष्टीने समाजकार्याइतकाच जिव्हाळ्याचा होता. सांगलीच्या आदि बलभीम व्यायाम शाळेत तरुण वयात कुस्ती खेळणाऱ्या भाऊरावांनी हुतूतू, खो-खो आदि खेळांमध्येही प्रगती साधली. ते स्पर्धावेडे होते. स्पर्धामध्ये बुद्धिबळ खेळणाऱ्याला इतरांच्या डावपेचांची माहिती होते आणि त्यामुळे खेळाचाच सर्वागीण विकास होतो, यावर त्यांची श्रद्धा होती. परदेशात बुद्धिबळ स्पर्धासाठी वेगळ्या प्रकारची ‘स्टॉप वॉचेस’ असतात, तशी ती आपल्याकडे नाहीत म्हटल्यावर सांगलीच्याच एका घडय़ाळ विक्री करणाऱ्याला प्रोत्साहन देऊन तशी चार घडय़ाळे त्यांनी बनवून घेतली. अनेक बुद्धिबळपटू त्यांनी तयार केले. राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा विजेत्या भाग्यश्री साठे-ठिपसे, स्वाती घाटे यांच्यापासून ते ओंकार पटवर्धन, जयश्री संकपाळ-कदम, पल्लवी शहा, कृष्णा जहागिरदार, अनुप्रिता पाटील, संतोष संकपाळ यांच्यापर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांनी तयार केले. त्यांच्या शिष्यगणांची संख्या शेकडोंमध्ये भरेल. २००० मध्ये सांगलीत राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धाचे त्यांनी आयोजन केले होते. राष्ट्रकुलातल्या देशांचे अनेक सर्वोत्तम खेळाडू त्यात भाग घेणार म्हटल्यावर त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा आवश्यक होत्या. पंचतारांकित काय, पण नाव घेता येईल असे सर्वोत्तम हॉटेल त्यावेळी सांगलीत नव्हते, तरीही त्यांनी या स्पर्धेचा खटाटोप केला. त्यांच्या आवाहनानुसार अनेक देशांच्या खेळाडूंनी त्यात भागही घेतला. या स्पर्धेत भाग घेऊन नावारूपाला आलेला शशिकिरण पुढे ग्रँडमास्टर बनला. रशियाला गेलेल्या कनिष्ठ गटाच्या बुध्दिबळपटूंच्या संघाचे भाऊराव हे प्रशिक्षक होते. ही स्पर्धा सलग पंधरा दिवस चालली. याच काळात भाऊरावांनी एकाच वेळी चाळीस खेळाडूंबरोबर बुद्धिबळाचा डाव मांडून त्यांनी समस्त रशियन प्रेक्षकांना चकित करून सोडले होते. शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भाऊराव हे सलग ५-६ वर्षे बुद्धिबळ प्रशिक्षक होते. आपल्या मुलांना भाऊरावांनीच बुद्धिबळ शिकवायला हवे, हा पालकांचा आग्रह असे. बुद्धिबळ त्यांच्या अंगात जणू इतके संचारायचे की त्यासाठी एखाद्या खेडय़ात जाऊन राहायलाही त्यांची ना नसे. सांगलीचे दुसरे एक नामांकित बुद्धिबळपटू भा. प. म्हैसकर हेही रशियाच्या स्पर्धेत भाग घ्यायला गेले होते. त्यांनीही आपल्या यशाचे श्रेय भाऊरावांनाच दिले होते. म्हैसकरांबरोबर त्यांचे बुद्धिबळाचे अनेक डाव रंगायचे. १९७९ मध्ये त्यांच्या नूतन बुद्धिबळ मंडळाने केवळ महिलांची बुद्धिबळ स्पर्धा भरवली होती. भारतातल्या १४ राज्यांच्या ४४ महिलांनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता. नूतन बुद्धिबळ मंडळाची भाग्यश्री साठे त्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आली, पण तिने पुढे अनेक बडय़ा बडय़ांचे विक्रम मोडीत काढले. ती आशियाई विजेती ठरली. तिने इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, स्वित्र्झलड, बांगलादेश आदी देशांमधल्या स्पर्धा गाजवल्या. भाऊरावांचे वैशिष्टय़ असे की, एखादी गोष्ट मनावर घेतली की तिचा पिच्छा पुरवायचा. आठ वर्षांखालील मुलांना लवकर बुद्धिबळ समजू शकेल, असे त्यांच्या मनाने घेतले आणि आश्चर्य म्हणजे त्यांची ती स्पर्धा कमालीची यशस्वी झाली. मग त्यांनी ८, १०, १२, १४, १६ आणि १९ वर्षे वयोगटाखालच्या स्पर्धा भरवून त्या यशस्वी करून दाखवल्या. इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणारे विनायकराव खाडिलकर हेही नूतन बुद्धिबळ मंडळाचे खेळाडू. शिवराम नातू, आप्पाकाका खाडिलकर, नारायणराव खाडिलकर हे सगळे भाऊरावांच्याबरोबर खेळात रंगलेले दिसायचे. यात आणखीही एक नाव असे. पुढे राजकवी साधुदास म्हणून प्रसिद्धीस आलेले गोपाळराव मुजुमदारही त्यांच्या या ‘डावा’त असत. भाऊरावांच्या शब्दाखातर अनेक ग्रँडमास्टरही नूतन बुद्धिबळ मंडळाच्या स्पर्धेत दिसायचे. ‘६४ घरांचा राजा’ असे ज्याचे वर्णन केले जाते तो ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद सांगलीत खेळला आहे. अभिजित कुंटे, प्रवीण ठिपसे, देवेंद्र बारुआ, रविशेखर, जयश्री आणि रोहिणी खाडिलकर यांनीही सांगलीच्या त्यांच्या स्पर्धामध्ये हजेरी लावली आहे. त्यांच्या स्पर्धामध्ये अलीकडच्या काळात बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या शेजारी देशांमधल्या खेळाडूंनीही सहभागी व्हायची इच्छा प्रदर्शित केली होती. स्पर्धाच्या तारखा जाहीर झाल्या, की भाऊरावांची स्वारी दौऱ्यावर निघे आणि देणगीदारांचा शोध घेत असे. त्यांनी आपल्या मंडळाकडे कायमस्वरूपी निधी राहील, असे पाहिले, पण क्रिकेटवर सर्वाधिक प्रेम करणारे बडे उद्योजक बुद्धिबळाचे नाव काढले, की ‘पुन्हा केव्हातरी पाहू’ म्हणून त्यांना वाटेला लावत. अशाने ते निराश मात्र होत नसत. वडील तम्मण्णाचार्य यांच्याकडून बुद्धिबळाचा आलेला वारसा सर्व समाजांपर्यंत पोहोचायला पाहिजे, या उर्मीतून ते ठाम असत. त्यांच्या कोशात ‘थकणे’ हा शब्दच नव्हता. सुट्टीच्या काळात शिक्षणसंस्थांच्या सभागृहात ते या स्पर्धा भरवायचे. त्यांना आपल्या मंडळासाठी मोठे सभागृह आणि संग्रहालय उभारायचे होते. स्वित्र्झलडमध्ये लुझानला असलेल्या ऑलिम्पिक संग्रहालयाच्या धर्तीवर त्यांना बुद्धिबळाची ही वास्तू उभारायची होती. त्यासाठी त्यांनी नामांकित वास्तूविशारदांबरोबर चर्चाही केली होती. सांगलीत त्यांना त्यासाठी उत्तम अशी जागा मिळाली, पण त्या जागेवर एका राजकारण्याचा डोळा असल्याने ही जागा देता येऊ शकत नाही, असे सांगत आताच्या सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने ती द्यायला नकार दिला. भाऊराव पडसलगीकरांचे एक स्वप्न भंगले. वयाच्या सहाव्या वर्षांपासून बुद्धिबळात रंगलेला बुद्धिबळाचा हा भीष्माचार्यही आता उरलेला नाही. शिवछत्रपती क्रीडा कार्यकर्ता, पुढे ‘दादोजी कोंडदेव’ आणि अगदी अलीकडे ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने गौरवलेला हा बुद्धिबळ तपस्वी बुद्धिबळाच्या वास्तूसाठी जागेच्या शोधात हिंडत होता. आता कुणी जागा देईलही, पण भाऊराव पडसलगीकर नावाचे धुरंधर व्यक्तिमत्त्व ती ताब्यात घेऊन स्पर्धा भरवायला नसेल, हा दैवदुर्विलास आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री प्रतीक पाटील सांगलीचे आहेत. त्यांनी आता या कामात पुढाकार घेऊन भाऊरावांच्या स्मृती चिरंतन राहतील, हे किमान पाहावे.
Subscribe to:
Comments (Atom)