सुकृत
Thursday, January 27, 2022
Thursday, April 15, 2010
रिलॅक्सेशनसाठी काही टिप्स
संगणकावर काम करण्याची गरज आज प्रत्येकालाच आहे. आधुनिकतेशी संबंध जोडण्यासाठी दैनंदिन व्यवहारात त्याची आवश्यकता असते. मात्र, सततच्या संगणकाच्या वापरापासून होणारे धोके टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणेही आवश्यक आहे. संगणकाच्या मॉनिटरमधून विशिष्ट प्रकारचे किरण बाहेर पडत असतात, त्याकडे सतत पाहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. मात्र कामाच्या ओघात संगणकाचे काम काही क्षण बाजूला ठेवण्याचे भान राहत नाही. त्याचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी, संगणकावर सलग काम करायचे असेल, तर दर पंधरा मिनिटांनी मॉनिटरवरून नजर हटविणे आवश्यक आहे. काही काळ डोळे बंद ठेवून डोळ्यांना आराम द्यावा. थंड पाण्याचा हलका शिडकावाही दिवसभराच्या ताणातून मुक्ती देऊ शकतो. मॉनिटरचा प्रकाशही डोळ्यांना कमीत कमी त्रास होईल, अशा रीतीने करून घेणे चांगले. फक्त संगणकावर काम करण्यासाठीचे खास चष्मेही मिळतात, त्यांचाही वापर करता येईल. डॉक्टरांच्या सल्ल्याने अशा गोष्टी केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहून ताणमुक्तीला मदत होईल आणि रोजच्या कामातला उत्साहदेखील वाढेल.संगीत ऐका मस्तरिलॅक्स व्हायचं असेल तर संगीत ऐकण्यासारखा छान उपाय नाही. हे संगीत टीव्हीवर पाहण्यापेक्षा ते ऐकतऐकत काम करणं जास्त रिलॅक्स करतं. त्यामुळे तुमच्या घरच्या रेडिओवरची किंवा म्युझिक प्लेअरवरची धूळ झटका आणि या संगीत-उपचारांची मजा घ्या. संगीत मनावरचा ताण हलका करतंच; पण आपलं आवडतं गाणं, आवडतं वाद्यसंगीत ऐकलं, की काम करण्याचा उत्साह वाढतो. अर्थात संगीत ऐकताना काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. सकाळी, दुपारी आणि रात्री त्या त्या प्रहराचा मूड ओळखून तशा प्रकारचं संगीत ऐका. रात्री झोपण्यापूर्वी ढॅणढॅण संगीत ऐकलं, तर झोप उडून जाईल, त्यामुळे त्या वेळी शांतच संगीत ऐकलं पाहिजे आणि सकाळी आवरतानाच्या वेळी मस्त उडत्या चालीची गाणी ऐका, म्हणजे कामं भराभर उरकतील आणि उत्साह वाटेल. संगीत ऐकताना त्याचा आवाज फार मोठा ठेवू नका, ते ऐकताना एकाच प्रकारचं संगीत ऐकण्यापेक्षा त्यात वैविध्य आणा, म्हणजे कंटाळा येणार नाही. ऑफिसमध्ये काम करतानाही बारीक आवाजात संगीत ऐकलं, तरी काम करताना फ्रेश वाटेल. टीव्ही बघण्यापेक्षा संगीत ऐकणं केव्हाही चांगलंच.

Sunday, April 4, 2010
बांधिलकी मानणारी लावणीसम्राज्ञी
संजय शिंदे
यमुनाबाई वाईकर यांनी नव्वदी पार केली असली तरी कलेसाठी आजवर व्यतीत केलेल्या आयुष्याचा सारा पट लख्खपणे त्यांच्या डोळ्यापुढे आहे. शरीर थकले तरी आवाजातील ठसका कायम. त्यामुळेच आजही लावणीचा विषय निघाला की त्या भरभरुन बोलतात. त्यांना नुकताच निळू फुले सन्मान पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांची भेट घेतली, तेव्हाही याचा प्रत्यय आला. ""निळूभाऊंचे माझे स्नेहाचे नाते होते. वाईत आल्यावर ते आवर्जून मला भेटायला येत होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार मला महत्त्वाचा वाटतो,'' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या कोल्हाटी- डोंबारी समाजात जन्मलेल्या यमुनाबाईंना परिस्थितीमुळे तमाशाकडे वळावे लागले; मात्र, गरिबीशी झगडत त्यांनी मोठ्या जिद्दीने आपले कर्तृत्व घडविले. सौंदर्य, अदाकारी व सुरेल आवाजाच्या देणगीमुळे त्यांनी मराठी लावणीच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. बालघाटी, छक्कड, चौकाची लावणी असे प्रकार त्या सादर करीत. बैठकीच्या लावणीला त्यांनी मोठा लौकिक मिळवून दिला. चौकाची लावणी ही त्यांची खासीयत होती. "का हो डोळे घालता सख्या', "सोडा मनगट हात तुटेल' अशा त्यांच्या लावण्या आजही रसिकांच्या ओठावर आहेत. यमुनाबाईंनी आयुष्यभर लावणी जिवंत ठेवली. पोटासाठी त्यांनी हा व्यवसाय स्वीकारला असला तरी या क्षेत्रात त्यांनी मोठे नाव कमवूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यात त्याचा अजिबात लवलेशही जाणवत नाही. त्यांचे आपुलकीने बोलणे व वागण्यातील कमालीचा साधेपणा जाणवल्याशिवाय राहत नाही. यमुनाबाईंच्या तमाशा व लावणी क्षेत्रातील दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना लावणीसम्राज्ञी पुरस्काराने सन्मानित केले. 1994 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार, अखिल भारतीय जागतिक परिषद पुरस्कार आदी विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या लावण्यांवर अभ्यास करून अमेरिकेतील एका विद्यार्थिनीने डॉक्टरेट मिळविली आहे. तसेच लावणीवर तयार झालेला ग्रंथ कॅलिफोर्निया विद्यापीठात अभ्यासासाठी ठेवण्यात आला आहे. हा त्यांच्या कलेला मिळालेला मानाचा मुजरा आहे. कलाकार म्हणून त्यांचे वेगळेपण आहेच. मात्र, सामाजिक बांधिलकी जपण्यातही त्या मागे नाहीत. वाईत कोल्हाटी समाजासाठी घरे बांधण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांची भटकंती थांबवली. त्याचप्रमाणे अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाज संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा घेऊन समाज व्यसनमुक्त होऊन शिक्षणाकडे वळावा, यासाठी मोठी धडपड केली. त्यांच्या या धडपडीला आता यश मिळू लागले आहे.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने नुकत्याच मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्यांना मानपत्र व गौरववृत्ती देण्यात आली. वयाच्या नव्वदीतही या कार्यक्रमास त्या उपस्थित राहिल्या होत्या. आता दगदग सहन होत नाही, अशी भावना त्यांच्या बोलण्यातून जाणवते. रसिकांनी भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दलची कृतज्ञता त्यांच्या डोळ्यातून ओसंडून वाहते.

Wednesday, March 17, 2010
माणुसकीची मिणमिणती पणती
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
समाजजीवनाचे भ्रष्टीकरण होत आहे. झटपट पैसे कमावण्याच्या शर्यतीत सारे उतरले आहेत. या स्पर्धेत माणुसकी आणि मूल्ये यांचा बळी पडत आहे. तरीही वाऱ्यावादळाशी आणि पाऊसपाण्याशी झुंज देत एखादी पणती मिणमिणत असते. तीच मानवतेची तारणहार ठरत असते.कोल्हापूरचा कार्यक्रम संपवून पुण्याला आलो. थोडा लवकर पोचलो. हिवाळ्याचे दिवस होते. अंधार रेंगाळत होता आणि गार वारे बोचत होते.बाहेर पडलो. "भाऊ, कुठे जायचे आहे?'' एकामागून एक रिक्षाचालक विचारत होते. "नारायण पेठ पोलिस चौकी,' असे सांगताच रागाचा कटाक्ष टाकून खांदे उडवत दुसऱ्या गिऱ्हाइकाकडे ते धावत होते.तिथे काही बायाबापड्या होत्या. लेकुरवाळ्या होत्या. त्यांच्या हातात वजनी पिशव्या होत्या. नाना-नानी होते; पण जवळचे भाडे घेण्यास कोणीच तयार नव्हते. आचार्य अत्रे यांनी नवयुग पाठमालेत पुणेरी टांगेवाल्यांविषयी लिहिलेली गोष्ट आठवली. त्यानंतर मुळामुठेतून कितीतरी पाणी वाहून गेले आहे. पुण्याचे स्वरूप पार बदलून गेले आहे. आर्थिक सुस्थिती आली आहे. शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुण्याने फार मोठा पल्ला गाठला आहे. स्वरूप बदलले; पण त्याबरोबर साऱ्याच सवयी बदलल्या असे नाही. इंग्रजीत एक म्हण आहे- ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड!एक रिक्षा आली. रिक्षाचालकाला विनंती केली. "बसा भाऊ,'' तो प्रेमाने म्हणाला. त्याने मीटर सुरू केले आणि मगच विचारले, ""कुठं जायचं आहे?''"भाऊ, इथं इतके रिक्षावाले आहेत; पण कुणीच का येत नाही गावात?''"आहो, ही बोहनीची वेळ. रामप्रहरी तरी कुणाला काही सांगू नये. माशा मारत बसतील; पण जवळचं भाडं करणार नाहीत. त्यांना लांबची भाडी हवी आहेत. तीही मीटर न लावता. प्रसंगी दोन-अडीचशे रुपये मागतात. लोक अडलेले असतात हो. एकाच मार्गावरून जायचं असलं, तरी दोघातिघांना एकत्र कोंबून प्रत्येकाकडून पैसे उकळतात...'' तो बोलतच होता. जातीबरोबर माती खावी, असे म्हणतात. सारेच आपल्या व्यवसाय बंधूंना सांभाळून घेत असतात. त्या पार्श्वभूमीवर त्याचा परखडपणा पाहून मी भारावलो."बाबा आढाव माझे मित्र आहेत. त्यांना मी या अडवणुकीबद्दल सांगणार आहे.''"तो देवमाणूस आमच्यासाठी खूप झटतो; पण ते तरी काय करणार? प्रत्येकासोबत एखादा पोलिस देणार का?''"समोर ट्रॅफिक पोलिस आहेत. ते का प्रवाशांच्या मदतीला धावत नाहीत? मुंबईत दादरला किंवा विमानतळावर अशा नाठाळांना पोलिसांच्या दंडुक्यांचा प्रसाद मिळतो.'' मी.माझ्याकडे वळून पाहत तो म्हणाला, ""आहो, इथंच घोडं पेंड खातं. त्यांचं एकमेकांशी संगनमत असतं. काहीच करणार नाहीत पोलिस...''"आमचं पोट रिक्षावर अवलंबून आहे. मेहनत केली आणि सच्चाईनं वागलो, तर चार पैसे मिळतात. मोठमोठी दुकानं आहेत, मॉल आहेत. तिथं गिऱ्हाईक येतं. घासाघीस करतं. सौदा पटला नाही, तर निघून जातं. आमच्या धंद्याचं तसं नाही. रिक्षाची चाकं रस्त्याला लागली रे लागली, की आमची कमाई सुरू होते. आणि हे बघा साहेब, हे लोक अव्वाच्या सव्वा भाडं आकारतात. अडवणूक करून प्रवाशांना लुबाडतात; पण हा सारा पैसा घरी जातो का?'' तो बोलतच होता."कुठे जातो?'' मी विचारले."काय सांगू तुम्हाला? तुम्हीच समजून घ्या. घामाचाच पैसा आपल्या घरी येतो. हरामाच्या पैशाला वेगवेगळ्या सतरा वाटा फुटतात,'' तो तत्त्वज्ञान सांगत होता.दरम्यान, आम्ही "स्नेहसदन'च्या दारात पोचलो. रिक्षाचालक, पोस्टमन, बस कंडक्टर आदींच्याबाबत मला विशेष प्रेम वाटते. इतरांप्रमाणे त्यांच्याकडे "जादा' कमाईचे मार्ग नसतात. त्यांना बक्षिसी देण्यात आनंद वाटतो. मी त्याला भाड्यापेक्षा थोडे जास्त पैसे दिले. त्याने ते परत केले."दादा, नाव काय तुमचे? बोलण्याच्या ओघात विचारायचे राहून गेले.'' मी."अब्दुल्ला,'' तो."इतकं सुंदर मराठी बोलता तुम्ही?''"साहेब, मराठी माझी मायबोली आहे. पुण्यातच माय मराठीच्या अंगाखांद्यावर वाढलो...''"पोटाची खळगी भरण्यासाठी खूप खटपटी, लटपटी केल्या. शेवटी ही रिक्षा भेटली. गिऱ्हाईक माझं दैवत आहे. मी कोणालाही कधीही नाही म्हणत नाही. चार पैसे खिशात पडतात. संसाराचा गाडा हाकता येतो. प्रामाणिकपणे कष्ट केले, तर अल्लाह नाही ठेवत उपाशी.'' निघताना तो म्हणाला.त्याचा नितळ, पारदर्शी स्वभाव, गिऱ्हाइकाबद्दल वाटणारा जिव्हाळा आणि मायमराठीवरील प्रेम पाहून मी अचंबित झालो. मी त्याला न्याहारीसाठी येण्याचा आग्रह केला; पण हातची गिऱ्हाइके जातील, म्हणून त्यानं नम्रपणे नकार दिला. समाजजीवनाचे भ्रष्टीकरण होत आहे. झटपट पैसे कमावण्याच्या शर्यतीत सारे उतरले आहेत. या स्पर्धेत माणुसकी आणि मूल्ये यांचा बळी पडत आहे. तरीही वाऱ्यावादळाशी आणि पाऊसपाण्याशी झुंज देत एखादी पणती मिणमिणत असते. तीच मानवतेची तारणहार ठरत असते.

Monday, March 15, 2010
मनस्वी प्रतिभावंत
विनायक ऊर्फ विंदा करंदीकर हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. कोणत्याही रुढ साच्यामध्ये ते बसणारे नव्हते.
याचे कारण कोणतीही चाकोरी आंधळेपणाने स्वीकारणे त्यांना मान्य नव्हते. त्यामुळेच ज्या काळामध्ये बा. सी. मढेर्कर यांच्या काव्यप्रतिभेचा आणि बुद्धिमत्तेचा दबदबा होता, त्याच काळात विकसित होत जाणाऱ्या विंदांनी आपल्या लेखनावर आणि शैलीवर कोणाचीही छाया पडू दिली नाही. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्यावर माधव जूलियन यांचा प्रभाव होता; पण पुढे तोही ओळखू येणार नाही, अशी स्वतंत्र वाट विंदा करंदीकर यांनी निर्माण केली. स्वतंत्र प्रतिभा, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, अफाट व्यासंग, कुतूहल वाटणाऱ्या विषयांमध्ये अधिकाधिक खोलवर जाऊन त्यांचा घेतलेला शोध आणि लावलेला अन्वयार्थ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा प्रवास करूनसुद्धा जपलेला मनाचा-विचाराचा मोकळेपणा ही त्यांची काही ठळक वैशिष्ट्ये होती. कोकणामध्ये जन्मलेल्या विंदांचे बालपण फारसे सुखाचे नव्हते. पण त्याचा त्यांनी बाऊ केला नाही किंवा भांडवलही केले नाही. प्राप्त परिस्थितीपुढे ते झुकले नाहीत आणि चांगले दिवस आल्यानंतरही त्यांचे जमिनीवरचे पाय सुटले नाहीत. एकंदरच विंदा आयुष्य घट्टपणाने जगले. सामाजिक बांधिलकी या शब्दाचा सतत जप न करतासुद्धा अशी बांधिलकी जपता येते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या स्वभावात एक रोखठोकपणा होता आणि कोकणी माणसाकडे असणारा फटकळपणाही होता. पण विंदांचे हे रूप फणसासारखे होते. विंदांचे मन अतिशय संवेदनशील होते. लहान मुलाचे भावविश्व जाणून घेण्याची त्यांची शक्ती अचाट होती. त्यामुळेच त्यांनी मुलांसाठी विपुल लेखन केले. त्यांच्या 'एटू लोकांचा देश'ने तर पिढ्यानुपिढ्यांचे रंजन केले. विस्मयकारक कल्पना, हळुवार मनामध्ये अलगदपणाने प्रवेश करण्याची किमया, साधे-सरळ शब्द आणि प्रसन्न शैली यामुळे त्यांनी बालवाचकांसाठी एक आगळे दालनच खुले करून दिले. असे दालन की ज्यामध्ये ऋजुता जपलेल्या कोणत्याही वयाच्या वाचकाने सहजपणे शिरून आनंदित होऊन जावे. अशी किमया करणाऱ्या विंदांनीच सामाजिक वास्तव मांडणाऱ्या कविताही लिहिल्या. व्यक्तिगत भावजीवनाचेही चित्रण केले आणि जीवनातील अटळ सत्यही सांगून टाकले. या लेखनाने त्यांना उदंड प्रसिद्धी मिळाली. विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर यांच्या कवितावाचनाच्या कार्यक्रमांनी साऱ्या महाराष्ट्राला वेड लावले. पण विंदांची प्रतिभा कवितेतच अडकून पडली नाही. त्यांच्या लेखणीने लघुनिबंधही लिहिले. या निबंधांमध्येही विदांची विचारशक्ती किती वेगळ्या प्रकारे काम करत होती, याचेच दर्शन होते. 'पहिला पाऊस' या निबंधामध्ये साचेबद्ध चित्रण नाही. ते म्हणतात, 'पावसाविषयी मी विचार करू लागलो की मला न कळताच एका अज्ञात भूतकालाकडून माझे मन पछाडले जाते. पृथ्वीवर पडलेला तो पहिला पाऊस मला आठवतो; त्याचे लिंबाएवढे थेंब डोळ्यांसमोर गरगरू लागतात. लाव्हाच्या लाटांशी चालणारा त्याचा भयानक संघर्ष डोळ्यांसमोर तांडव करू लागतो. पृथ्वीवरचा तो पहिला पाऊस!' असे चकित व्हायला लावणारे, वेगळाच दृष्टिकोन मांडणारे, विचारांना नवीन दिशा देणारे, चाकोरीबाह्य विश्वाचा एक कोपरा उघडून दाखविणारे लेखन हाच विंदांचा विशेष होता. याच विशेषातून त्यांनी अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र लिहिले, शेक्सपिअरच्या 'किंग लिअर'चे भाषांतर केले. हे करण्यामागे 'जगातील मौलिक ग्रंथ मराठीत आणून मराठी समृद्ध करणे आणि उच्च शिक्षणाचे माध्यम होण्याचे तिचे सार्मथ्य वाढवणे, ही कर्तव्यनिष्ठ प्रेरणा होती' असे विंदांनीच नमूद केले आहे. अशा अंगाने ग्रंथलेखन करणाऱ्या विंदांनीच तत्त्वज्ञानाच्या ओढीतून ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवचे अर्वाचिनीकरण केले. ते पूर्ण झाले, १९७८ सालामध्ये. त्याच्यापुढचेच वर्ष अल्बर्ट आइन्स्टाईनच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. जगाच्या विचारविश्वामध्ये घुसळण करून विज्ञानाला नवा आयाम प्राप्त करून देणाऱ्या या संशोधकाला विंदांनी आपला 'अमृतानुभव' ग्रंथ अर्पण केला. विज्ञानाबद्दलची अशी ओढ हासुद्धा विंदांचा विशेष होता. अशा ओढीतून त्या विषयाचे अभ्यासपूर्ण वाचन करणारे तत्त्वज्ञानाकडे अधिकच ओढले जातात. अलीकडे विंदाही चार्वाकपासून ते देकार्तपर्यंतच्या तत्त्वज्ञांकडे असेच वळले. हे तत्त्वज्ञ आणि त्यांचे विचार यांची ओळख करून देण्यासाठी त्यांनी 'अष्टदर्शने' लिहिली. याचा अर्थ वाढत्या वयाने त्यांच्या मनातील कुतूहलाला संपवले नव्हते आणि सरत जाणाऱ्या वर्षांनी त्यांच्या मनातील सजगता लोपली नव्हती. त्यामुळेच कबीर सन्मानापासून ते ज्ञानपीठापर्यंतच्या सन्मानांची रक्कम त्यांनी सामाजिक कार्यासाठी देऊन टाकली. 'देणाऱ्याने देत जावे। घेणाऱ्याने घेत जावे। घेता घेता एक दिवस। देणाऱ्याचे हात घ्यावेत।। असे सांगणाऱ्या विंदांनी आपल्या साहित्यातील शब्द कागदापुरतेच राहणारे नाहीत, हे सप्रमाण दाखवून दिले. त्यांच्या निधनाने प्रगल्भ प्रज्ञेचा उत्कट आणि मनस्वी प्रतिभावंत आपण गमावला आहे.

तत्त्वज्ञ कवी
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्वप्ने उधळीत, गेलो झेपावत भविष्याच्या दिशेने घेऊन अगोदरच अटळाचे दर्शन, असे म्हणणारे विंदा आता दर्शनापार गेले आहेत. केशवसुत, माधव जूलियन, बा. सी. मर्ढेकर, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे या शृंखलेतील विंदा करंदीकर नावाची एक कडी अलगदपणे गळून पडली आणि या सामाजिक जाणिवेचा एक काव्यमय दुवा कायमचा हरपला. प्राध्यापक गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर हे कवी म्हणून सर्वज्ञात असले तरीही इंग्रजीचे गाढे व्यासंगी प्राध्यापक, लघुनिबंधकार, साहित्यशास्त्राचे अभ्यासक, उत्तम भाषांतरकार आणि समीक्षक म्हणूनही खूप मोठे होते आणि त्याच्याही पलीकडे माणुसकीचे पूजक, तत्त्वज्ञ, स्वच्छंदी शैली जपणारे चिंतक म्हणूनही त्यांचे आगळेपण सांगता येईल. विंदांच्या जाण्यामुळे व्यवहारात चिक्कू म्हणून ओळखला जाणारा; पण वास्तवात आभाळाएवढा दानशूर असा माणूस आपल्यातून कायमचा गेला आहे. दैनंदिन जगण्यात पै-पैची बचत करणारा हा माणूस आपल्याला मिळालेली सारी संपत्ती सार्वजनिक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या संस्थांमध्ये आनंदाने वाटून टाकताना सतत दिसला आहे. एका बाजूला साहित्यनिर्मिती करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे त्यांचे वैशिष्ट्य आगळेच म्हणावे लागेल. त्यामुळेच भागानगर सत्याग्रहात मिळालेली कारावासाची शिक्षा त्यांनी आनंदाने सोसली आणि एका विशिष्ट टप्प्यानंतर सारे सन्मान त्यांचा पाठलाग करत असतानाही जाणीवपूर्वक वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची कृती त्यांनी करून दाखवली. अर्थात असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असले तरीही त्यांच्यातला कवी सर्वांत आघाडीवर होता, हेही खरेच. त्यांची मुख्य ओळख त्यामुळेच कवी अशीच राहील. "नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे; कोण मला वठणीला आणू शकतो तो मी पाहे' म्हणणाऱ्या केशवसुतांची, "मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे; नसो आज ऐश्वर्य आज या माउलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे' असे सांगणाऱ्या माधव जूलियनांची आणि "गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतिच काडी; म्हणायचा अन् मनाशीच की या जागेवर बांधिन माडी' असे म्हणणाऱ्या बा. सी. मर्ढेकरांची परंपरा पुढे नेताना "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे' असे म्हणणारे विंदा आज आपले दाते हात आणि माणसाच्या जगण्याचे लेखनातून आलेले निधान आपणा सर्वांसाठी मागे ठेवून आपल्यातून निघून गेले आहेत. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी साहित्यिक म्हणून असलेली विंदांची ओळख अखिल भारतीय पातळीवर श्रेष्ठ साहित्यिक म्हणून असली तरीही त्यांच्यातला माणूस हा त्यांना मिळालेल्या साऱ्या पुरस्कारांपलीकडचा एक निखळ तत्त्वज्ञ होता. मात्र त्यांनी स्वतःकडे कधीही असे थोरपण असल्याचे मिरवले नाही. पण दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांसारख्या कवींनाही ते सतत आदर्श बनून राहिले होते, यातच त्यांचे मोठेपण स्पष्ट होते. त्यांच्या कवितेत माणसाच्या जगण्याचे भलेबुरे सारे पदर एकवटलेले होते. "अष्टदर्शने'सारख्या काव्यकृतीने त्यांनी जागतिक तत्त्वज्ञानाचे भांडार मराठी माणसाला खुले केले. तसेच त्याच माध्यमातून चार्वाकाचे अस्सल दर्शन घडवीत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाचेही आजचे विश्लेषण वाचकांसमोर ठेवले. चार्वाकाबद्दल आपल्या कवितेत ते म्हणतात, "चार्वाकप्रणित । सुखवाद काही, अयोग्य ते नाही । सुचवीत. सुखी होण्यासाठी। करावे काहीही, असे त्याने नाही। सांगितले. सुखासाठी चौर्य । वा मद्यप्राशन, चार्वाक-दर्शन । सुचवी ना.'' थोडक्यात सत्याचा स्वीकार आणि श्रद्धांचा अव्हेर तसेच हिंसेचा धिक्कार करून मानवी जीवन सुखमय करणे, हेच एक ध्येय मानणारे उद्योगप्रवण मानवतावादी असे चार्वाकाचे दर्शन ते घडवतात. आपल्या "अष्टदर्शने'त त्यांनी देकार्त, स्पिनोझा, काण्ट, हेगेल, शोपेनहौएर, नित्शे, बर्गसॉं यांच्यासह चार्वाकाच्या तत्त्वज्ञानाची काव्यमय ओळख करून दिली. यातील चार्वाक वगळता, सारेच तत्त्वज्ञ प्रत्यक्ष हे एकमेव प्रमाण न मानणारे आहेत. मात्र चार्वाक हा प्रत्यक्ष हेच प्रमाण मानणारा. या सर्व तत्त्वविचारांची सांगड घालण्याचे काम त्यांनी या "अष्टदर्शने'च्या माध्यमातून का केले, असा प्रश्न समोर येऊ शकतो. परंतु शि. स. अंतरकरांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे विश्व आणि मानव यांच्या अस्तित्वाच्या स्वरूप आणि अर्थविषयक मूलभूत प्रश्नांचा शब्दप्रामाण्य न स्वीकारता केला जाणारा विचार म्हणजे तत्त्वज्ञान, हे समान सूत्र त्यामागे आहे. या साऱ्यातून कोणत्याही जगण्याच्या पातळीवर अंधानुकरणापेक्षा विचारगर्भ वृत्तीचा अंगीकार करण्याचे तत्त्व त्यांनी मांडले, हे लक्षात येते. म्हणूनच हा कवी केवळ काव्याच्या सौंदर्यासक्ततेचा भक्त न राहता, जीवनाच्या सौंदर्याचाही भाष्यकार ठरतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता जशी हेतुगर्भ होती, तशीच हेतुगर्भता विंदांकडे होती आणि तरीही निव्वळ हेतुगर्भ कवितेचे लेखन त्यांनी केलेले नाही, हेही महत्त्वाचे आहे. विंदांनी स्वेदगंगा, मृद्गंध, ध्रुपद, जातक आणि विरुपिका या क्रमाने आपले रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्वप्ने उधळीत, गेलो झेपावत भविष्याच्या दिशेने घेऊन अगोदरच अटळाचे दर्शन, असे म्हणणारे विंदा आता दर्शनापार गेले आहेत. काव्यसंग्रह प्रकाशात आणले. अनुभवाशी इमान राखणे आणि भाषेच्या रूढ वाटा टाळणे, ही त्यांच्या कवितेची खास वैशिष्ट्ये. सत्याचा शोध ही या सगळ्या कवितेमागची अंत:प्रेरणा असल्याचे दिसून येते. मात्र त्यामुळेच इंद्रियनिष्ठ अनुभवांनाही ते "प्रेम करावे शुद्ध पशुसम' अशा शब्दांनी सामोरे जाऊ शकले. हे करत असतानाच बालकविता, लघुनिबंध, समीक्षा हे प्रांतही त्यांनी ताकदीने हाताळले. "ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र', "फाऊस्ट', किंवा "राजा लिअर' सारखी त्यांची ग्रंथावरील टीकेसह केलेली भाषांतरे त्यांच्या व्युत्पन्नतेची साक्ष देतात. त्यांच्या भाषेतील अभिनिवेश, नाट्य आणि ठामपणा त्यांच्या लेखनाला सौंदर्याबरोबरच एक काळीज कापणारी धारही प्रदान करतो. हे वैशिष्ट्य खास करंदीकरांचेच आणि म्हणूनच त्यांच्या लेखनाचा आकृतिबंधही खास त्यांचाच. व्यक्तिगत आणि सामाजिक अनुभव आवश्यक तेव्हा अंतर्मुख पद्धतीने आणि जरूर तेव्हा बर्हिमुख स्वरूपात मांडण्याची त्यांची हातोटी, ही त्यांचे व्यक्तिमत्त्व एकारलेले नसल्याचेच दाखवून देते. स्वतःच्या कवितांचे इंग्रजी अनुवाद करताना त्यांनी केलेले भाष्य हे ते स्वत:कडेही कसे अलिप्तपणे पाहू शकत होते, याचेच दर्शन घडवते. त्यांच्या बालकवितेत एक खट्याळ आजोबा दडलेले दिसतात. ही कविता साने गुरुजींसारखी भावुक आणि ध्येयवादी नाही. मात्र सहजसंवादी पद्धतीने मने जिंकत बालकांना आनंदाचे खजिने पुरवणारी आणि त्यातून नव्या विचारांची प्रेरणा देणारी म्हणून बघावी लागते. "अजबखाना', "एटू लोकांचा देश', "पिशीमावशी', "बागूलबोवा' सारखे त्यांचे संग्रह या दृष्टीने लक्षात घ्यावे लागतील. त्यांनी प्रेमकविता लिहिली तरी या प्रेमकवितेला रोमॅंटिसिझमचा वास नव्हता. किंबहुना स्त्रीबाबतची त्यांची करुणाच त्यांच्या कवितेतून जास्त ठळक झालेली दिसून येते. त्यांच्या कवितेत स्त्री आणि पुरुष यांच्यातील विरोध सातत्याने मांडला गेला आहे; मात्र त्यातला पुरुष स्त्रीपेक्षा नेहमीच खुजा आहे. स्वतः पुरुष असूनही हे वास्तव काव्यातून प्रकटणे हे त्यांची माणसाकडे पाहण्याची अलिप्ततावादी वृत्तीच दाखवते. "कर कर करा, मर मर मरा, दळ दळ दळा, मळ मळ मळा, तळ तळ तळा, तळा आणि जळा' असे म्हणत ते "भारतीय स्त्रियांसाठी स्थानगीत' या कवितेत स्त्रीच्या स्थितीवरती नेमकेपणाने बोट ठेवतात. बालकवितेतदेखील त्यांच्यातला तत्त्वज्ञ त्यांची पाठ सोडत नाही. "सून' ही त्यांची कविता त्या दृष्टीने बोलकी आहे. तीमध्ये ते म्हणतात, "एकदा कांद्याला म्हणाली लसूण, ""मला आण एक सून.'' मग कांदा बाजारात गेला, लवंग घेऊन घरी आला; लसूण म्हणाली "सून हुशार' लवंग झाली तिखट फार!'' जीवनातल्या वास्तवाची अशी पेरणी सहजगत्या करणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. मंगेश पाडगावकरांनी "संहिता - विंदा करंदीकरांची निवडक कविता' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, "पूर आलेल्या नदीचा प्रवाह काठ जुमानीत नाही,' अगदी अशाच प्रकारचे रांगडे चैतन्य, जोमदारपणा हे करंदीकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जीवनाविषयीच्या जिवंत कुतूहलातून करंदीकर काव्याची प्रेरणा घेत असत. कुठल्याही अनुभवावर किंवा काव्यप्रकारावर शुद्ध कलात्मक किंवा अ-कलात्मक असा शिक्का मारायला ते तयार नसतात. करंदीकरांची खरी बंडखोरी त्यांच्या या मनमोकळ्या, कलात्म प्रतिष्ठेचे साचे झुगारू शकणाऱ्या स्वीकारशीलतेत आहे. अनुभवाचे सामर्थ्य आणि कलात्मक रचनेचे सौंदर्य यांच्या एकजीवतेतून निर्माण होणारी जाणीव करंदीकरांच्या कवितेला व्यापून राहिलेली आहे. सतत जाणवणाऱ्या नवनव्या सत्याच्या संदर्भात करंदीकर जुन्या निष्ठा उलटसुलट करून तपासून पाहतात. स्वतःच कवटाळलेल्या विचारधारेशी विरोध पत्करतात. त्यामुळेच "वर्तमानपत्रांनी सकाळी घातलेला आगीचा रतीब पितो घटाघटा आणि प्रायश्चित्त म्हणून फिरवतो बोटे मुलांच्या जावळातून' असे ते म्हणू शकतात. सत्यदर्शनासाठी नीती-अनीतीच्या सांकेतिक कल्पनांचा त्याग ते करतात. सत्याचा शोध घेताना होणारे जीवनाच्या विसंगतीचे दर्शन ते सर्वांपर्यंत पोचवतात आणि तर्कापलीकडच्या सत्याची वाटणारी ओढ ते तितक्याच स्पष्टपणाने समोर ठेवतात. त्यामुळेच "पांथस्थ पक्षी', "निळा पक्षी', "तसेच घुमते शुभ्र कबुतर' सारख्या त्यांच्या कविता वेगळी प्रतीके घेऊन विचार करायला भाग पाडतात. इंद्रियनिष्ठ अनुभव आणि आध्यात्मिक अनुभव यांत भिंत उभी न करणे हे करंदीकरांचे एक वैशिष्ट्य आहे. ऐंद्रिय अनुभव नाकारणारे अध्यात्म आपण मानत नाही, असे म्हणणारे करंदीकर शारीर अनुभवाची उत्कटता आध्यात्मिकतेला भिडवून परस्परविरोधी तत्त्वांमधली साम्यस्थळे शोधण्याचेही काम करतात. माणसाचे जगणे हे एकारलेले असूच शकत नाही. एकाच वेळी परस्परविरोधी स्वरूपाच्या अनुभवांच्या समग्रतेतून त्याचा प्रवास चालू असतो, हे अतिशय स्वच्छ मनाने करंदीकर सांगू शकतात. कारण ते स्वतःही त्याच स्वच्छ मनाचे आणि निर्मळ आचाराचे उद्गाते म्हणूनच ओळखले जातात. "ये यंत्रा ये' म्हणत यंत्रयुगाचे स्वागत करणारा हा कवी क्रांतीची चाहूल घेत "माझ्या मना बन दगड' असेही म्हणतो. वर्गसंघर्षाचे ढोल बडवतानाच नवसर्जनाचे न्यारे रूप ते आपल्यासमोर ठेवतात. कधी साम्यवादी वाटणारी त्यांची विचारधारा, व्यक्तिस्वातंत्र्याच्या गरजेपुढे बोथटपणा आला तरी हरकत नाही, असे म्हणताना दिसते आणि त्यामुळेच रिक्षाचे पैसे वाचवण्यासाठी चार किलोमीटर अंतर खांद्यावर फणसाचे ओझे घेऊन पार करणारा हा लेखक सार्वजनिक संस्थांना लाखो रुपयांची मदत अगदी सहजगत्या करताना दिसतो आणि देहदानाच्या माध्यमातून मृत्यूनंतरही आपले तत्त्व टिकवून ठेवतो. या दोन्ही भूमिकांत लोकांना विरोधाभास दिसला, तरी प्रत्यक्षात तात्त्विक एकतानता आहे, हेच सिद्ध होते. हे सत्य ज्याला उमगले तोच विंदांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेईल.

Monday, March 8, 2010
"पुढारी' नको...!
"सकाळ'ने मध्यंतरी तबलानवाझ झाकीर हुसेन यांचा अत्यंत सुंदर कार्यक्रम घेतला. दुसऱ्यादिवशी कोल्हापुरातील एका सजग महिलेचा फोन आला, तो दोन कारणांसाठी. एक असे की इतका मोठा कलावंत "सकाळ' मुळे कोल्हापुरात आला, त्याबध्दल आभार आणि दुसरे असे की त्या कार्यक्रमात "सकाळ'ने एकाही राजकीय पुढाऱ्याला व्यासपीठावर येवू दिले नाही त्याबध्दल विशेष आभार. गेल्याच पंधरवड्यात देशातील सर्वात विश्वासार्ह व्यक्ती म्हणून ज्यांचा गौरव झाला ते माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुलकलाम यांचा कोल्हापूर दौरा झाला. त्या दौऱ्यातही केशवराव भोसले नाट्यगृहातील कार्यक्रमात त्यांनी "चांगला राजकीय नेता' व्हायला किती जणांना आवडेल असे विचारल्यावर कसाबसा एकाच मुलीचा हात वर गेला. सभागृहात चांगल्या शाळेतील उद्याचे भवितव्य म्हणता येतील अशी सातशे मुलं-मुली होती, त्यांतील फक्त एकाच मुलीस राजकीय नेता व्हावा, असे वाटावे, यातच राजकीय पुढारी या जमातीबध्दल समाजात किती खोलवर नाराजीची भावना आहे हे ध्यानात येवू शकेल.नगरसेवकांपासून आमदार-खासदारांपर्यंत बहुतेक राजकीय नेत्यांचे वागणे सारखेच असते, अशी समाजाची धारणाच बनली आहे. लोकांच्या घामातून उभ्या राहणाऱ्या संपत्तीवर हे लोक डल्ला मारतात आणि आपल्यासाठी कांहीच करत नाहीत असाही रोष वाढतो आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आपल्या मुलाची संधी डावलली जाते असेही त्याला वाटते. दिलेला शब्द आणि वेळ कधीच न पाळणारा माणूस अशी राजकीय पुढाऱ्याची समानार्थी संज्ञा बनली आहे. आता राजकारणात येणारी पिढीही राजकीय पुढाऱ्यांच्याच घरांतील आहे. तिथेही सामान्य माणूस गावकुसाबाहेर. म्हणून राजकीय पुढारी होवून समाजसेवा करण्याचा विचार नव्या पिढीला खुणावत नाही. तेदेखील "करिअर' असू शकते असा तो विचारच करू शकत नाही. खरेतर आपल्या जगण्याशी संबंधित अनेक विषय ज्या व्यवस्थेशी संबंधित आहेत, त्या व्यवस्थेवर समाजाने दाखविलेला हा अविश्वास आहे.आपल्या देशाने राजकीय लोकशाही स्विकारली आहे. या लोकशाहीने सामान्य माणसाला अमुल्य असा मताचा अधिकार दिला आणि आपले राज्य कुणी करायचे हे ठरविण्याची ताकद दिली. परंतू ही ताकद अनेक कारणांनी दिवसेंदिवस क्षीण होत चालल्याचे चित्र दिसते. त्याचेच प्रतिबिंब व्यापक अर्थाने समाजमनांत उमटताना दिसते. त्यामुळेच राजकीय पुढारी व्हायला कुणाचे हात वर यायला तयार नाहीत, त्याचप्रमाणे विश्वासार्ह व्यक्ती म्हणून समाज त्यांना मान्यता द्यायला तयार नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी श्रध्दा बाळगणारा आपला समाज आहे. त्या श्रध्देला तडे गेल्यानेच लोकांची राजकारणाबध्दल नकारात्मक मानसिकता तयार होत आहे.त्यामुळेच सोनिया गांधीपेक्षा लोकांना डॉ.कलाम हे अधिक विश्वासार्ह वाटतात. कुठेही गेलो तरी लोकांना "पुढारी तेवढे नकोत.. अशी सार्वत्रिक चीड दिसते ती राजकीय नेतृत्वाला आत्मचिंतन करायला लावणारी आहे. - विश्वास पाटील

Tuesday, February 16, 2010
दु:खाचा शोध घेतलाच पाहिजे!
झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात. त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते... उद्याच्या उड्डाणांचे आकाश पाहायचे असेल, तर नव्या पिढीने बदललेच पाहिजे. या बदलात सकारात्मकता हवी. बदलही विधायक हवेत. आपल्याला सुंदर जग हवे आहे ना; मग दुःखाचा शोध घेतला पाहिजे.काळ किती बदलतो बघा. परवा मी नागपुरात होतो. अर्थात, महत्त्वाच्या कामानिमित्तानेच गेलो होतो. अशोकवनात थांबलो होतो. सोबत गोपाळ फडणीसही होता. त्याचा भाऊ विवेक "व्हीसीए'चा सदस्य आहे. अनायसे भारत-दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट सामना सुरू होता. त्याने दोन तिकिटे दिली. आम्हाला थोडा वेळही होता. मंदाला खरेदीसाठी शहरात जायचे होते. मला त्या खरेदीत काही रस नव्हता. मी आणि गोपाळ सामना बघण्यासाठी जामठ्याच्या "व्हीसीए' स्टेडिअमवर गेलो. अगदी भोजनापर्यंतचा सामना बघून लगेच परतलोसुद्धा. "जंगलातून मैदानात' अशा फोटोओळींसह सामना बघतानाचे आमचे छायाचित्र वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. फावला वेळ होता, म्हणून गेलो होतो. एरवी आमच्या वाट्याला असे वेळखाऊ मनोरंजन कधी आले नाही. एकतर हेमलकशात करमणुकीची साधने नव्हती. महाविद्यालयात असतानाही मी फारसा क्रिकेट वगैरे खेळलो नाही. कॉमेन्ट्री ऐकण्यापलीकडे माझे वेड पुढे गेले नाही. आमचा दुवाकॉलेज सुटले. मी इकडे आलो, तेव्हाही कॉमेन्ट्री ऐकणे कधीमधी सुरू होते. इकडे त्या काळात ना वृत्तपत्रे यायची, ना पुस्तके. जगाशी संबंधच नव्हता म्हणा ना! एकमेव ट्रान्झिस्टर होता. तो आमचा आणि जगातील दुवा होता. त्यावर आम्ही बातम्या ऐकायचो. स्थानिक स्टेशन्स खर्र-खर्र अशा आवाजासह ऐकावी लागायची. बीबीसी मात्र लागायचे. साधे आणीबाणीचेच उदाहरण घ्या. 26 जून 1975 ला लागू झालेली आणीबाणी आम्हाला कित्येक दिवस कळलीच नाही. प्रचंड पाऊस सुरू झाला असल्याने हेमलकशाचा उर्वरित भागाशी संबंध तुटला होता. मी बाप होणार होतो. मंदाची आबाळ नको म्हणून ताई तिला इथून घेऊन गेली होती. दिगंतच्या म्हणजेच पिलूच्या जन्माची बातमी नागपूरहून हेमलकशाला पोचायला महिना लागला. साक्षात बापालाच महिनाभरानंतर बातमी समजावी, असे तेव्हाचे अवघड दिवस होते. बाबांनी जगनला नेहमीप्रमाणे फोन केला होता. तो निघालाही; मात्र पावसाने सारे रस्ते अडवून ठेवले होते. तो तरी काय करणार?जन्मानंतर महिनाभरातच पिलूला डायरिया झाला. त्यामुळे जगन पुन्हा हेमलकशाला निघाला. माझ्या मुलाच्या जन्माची "बातमी' मला त्याच्या आजारपणामुळे महिनाभराने कळली. नाल्यानजीक जीप ठेवून जगन सायकलने हेमलकशात पोचला होता. निरोप कळल्यावर मी त्याच्यासह जीपशेजारी आलो. जीप दिसेचना. पाहतो तर नाल्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. नेमका मोठा दगड आडवा आल्याने ती अडकून पडली. मग आम्ही हिकमतीने दगड काढला. बंद पडलेली जीप कशी तरी सुरू केली. पाणी ओसरल्यानंतर आनंदवनसाठी रवाना झालो. आम्ही पोचलो तोवर रात्र झाली होती. आज ते सारे दिवस आठवले, तरी अंगावर शहारे येतात. काहीही सुविधा नसताना साऱ्या हालअपेष्टा कशा सोसल्या असतील, याचे आश्चर्यही वाटून जाते. एकमात्र खरे, या साऱ्यांमागे प्रेरणा होती, उद्दिष्ट होते- जगाला सुंदर करण्याचे. आज विश्वासाने वावरणारे आदिवासी दिसले की खूप बरे वाटते. जग बदलले. खेड्यापाड्यात टीव्ही पोहचला. परवा क्रिकेट सामना बघून आल्यानंतर या सर्व गोष्टी आठवायला लागल्या. काम हाच विरंगुळा !तेव्हा एक बरे होते. कामे एवढी असायची, की फावला वेळ उरायचाच नाही. पेशंट नसताना मी दाट जंगलात जायचो. जळाऊ लाकडे आणावी लागायची. मी ट्रॅक्टर चालवायचो. बांधकामासाठी दगड आणावे लागायचे. मी एकटाच जायचो असेही नाही. आम्ही सर्व जण मिळून सारी कामे करायचो. दिवसभर कोणत्या ना कोणत्या कामात आम्ही सर्व गुंतलेलो असायचो. कामांनी थकल्यामुळे रात्री झोप यायची. तसे बऱ्यापैकी वाचनही चालायचे. त्या काळात गाजलेली पुस्तके मी वाचून काढली होती. हे कार्य चालायचे कंदिलाच्या प्रकाशात. लाइट नव्हतेच ना! सुटीचा वेळ मिळालाच, तर मी जंगलात भटकून यायचो. अगदी दूरवर चालत जाऊन अनेक व्यक्तींना भेटणे हा माझा छंद होता. तेवढाच विरंगुळा. मंदाला बागकाम आवडायचे. ती फळझाडे, फुलझाडांमध्ये रमायची. आदिवासींकडे धड कपडे नव्हते. साध्या लंगोटीवर ते राहायचे. माडिया फारसे कपडे घालायचे नाहीत. कमरेला फडके बांधले, की झाला त्यांचा पोशाख. लहान मुलांच्या अंगावर लंगोटसुद्धा नसायचा. तेव्हा सरकारची एक "जनता योजना' सुरू होती. 20 रुपयांत वस्त्रोद्योग महामंडळात जनता साड्या मिळायच्या. शंभराची साडी फक्त वीस रुपयांत मिळायची. मंदा या साड्या आदिवासींपर्यंत पोचवायची. स्वस्त कापड मिळाल्याने त्यांनाही ते परवडायचे. अशी काही कामे आम्ही वाटून घेतली होती. खरे सांगायचे तर, "रिकामे मन सैतानाचे घर,' या उक्तीप्रमाणे आम्ही स्वतःला सतत व्यस्त ठेवायचो. माझ्यासह सर्व मित्रांनी सर्व प्रकारची कामे केली आहेत. अगदी संडाससुद्धा साफ केले आहेत. तेव्हाचे संडास म्हणजे, खड्डा खोदून माती टाकायची पद्धत होती. कामाची लाज आम्ही बाळगली नाही. श्रमांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा संकल्प केल्यानंतर कष्टसुद्धा हलके होऊन जायचे. आदिवासी उघडेनागडे राहायचे; पण त्यांचा प्रामाणिकपणा आम्हाला भावला होता. ते कष्टाळूही होते. हाफपॅन्ट हाच पोशाख !कॉलेजमध्ये असतानाही मी साधा शर्ट-पॅन्ट घालायचो. इथे आल्यावर पायजमा शर्ट घालायला लागलो. कुडकुडणाऱ्या थंडीत उघड्या शरीराने हिंडणारे आदिवासी बघून आपल्याला पूर्ण कपडे घालायला मिळतात, याचीही लाज वाटायची. तेव्हापासून मी हाफपॅन्ट आणि अर्ध्या बाह्यांचा बनियन वापरायला सुरवात केली. हाच माझा पोशाख झाला. बाहेर जायचे असेल तेव्हा फक्त पायजमा सदरा घालायचो. एरवी माझा हाफपॅन्ट-बनियनचा पोशाख ठरलेला असायचा. अगदी आजपर्यंत ती सवय कायम आहे. सगळेच कार्यकर्ते असे कपडे घालायचे. गरज नसलेल्या गोष्टी टाळायच्या, हे ठरवून टाकले. एकेक गोष्टी आपोआपच सुटत गेल्या. केसांना तेल लावणे बंद केले. कंगव्याचीही गरज वाटेनाशी झाली. टायरच्या चपला अंगवळणी पडल्या. स्वतःची आणि अनेकांची कटिंग मी कित्येकदा करून दिली आहे. त्यात काही वेगळेही वाटायचे नाही. सारे काही सवयीवर अवलंबून असते. आजकालचे मोबाईलवेड बघितल्यावर तेव्हाच्या जगण्याचा अचंबा वाटतो. आता सेकंदा सेकंदाला बातमी येते. तेव्हा कित्येक महिने काही कळायचे नाही. एखादी गंभीर घटना घडली तरी आमच्यापर्यंत येईस्तोवर सर्व काही "सेटल' झालेले असायचे. काही बातमी आली नाही, म्हणजे सर्व काही व्यवस्थित आहे, असा आमचा समज होता. आता परिस्थिती बदललीय. ट्रान्झिस्टर गेले. घरोघरी मोबाईल आले आहेत. जंगल प्रदेशातही डिश ऍन्टेने पोचले. हेमलकशाजवळच्या सर्व खेड्यापाड्यांत क्रिकेट आले. जंगल तुटले. गावागावात मैदाने झाली आहेत. पोराटोरांच्या मॅचेस होतात. गर्दीही होते. काळानुसार बदल होणारच. मी तरी आजवर "कॉमेन्ट्री'पलीकडे कुठे पोचलो होतो? अगदी विदेशात जाऊन आलो असलो, तरी क्रिकेट सामना बघण्याचा योग मात्र प्रथमच जुळून आला. काळाने घेतलेली झेप ओघाओघाने आठवली. कोणताही बदल आत्मसात केला पाहिजे. "ज्वाला आणि फुले'मध्ये बाबा म्हणतात ते खरे आहे. झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात. त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते... उद्याच्या उड्डाणांचे आकाश पाहायचे असेल, तर नव्या पिढीने बदललेच पाहिजे. या बदलात सकारात्मकता हवी. बदलही विधायक हवेत. आपल्याला सुंदर जग हवे आहे ना; मग दुःखाचा शोध घेतला पाहिजे. स्वतः कष्ट उपसले पाहिजेत. सर्व सुंदर बदलांच्या स्वागतासाठी अधीरही झाले पाहिजे.

Monday, February 8, 2010
लव्ह अॅट र्फस्ट साइट, प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नाही. प्रेम करून लग्न झालं नसेल तर, लग्नानंतर प्रेम करायला का
य हरकत आहे? अॅरेंज मॅरेज लव्ह मॅरेजमध्ये बदलणं शक्य आहे. भारतात रुजलेल्या या संस्कृतीवर आता अमेरिकन नागरिकांचाही विश्वास बसू लागलाय. ............. लग्न ठरवताना प्रत्येकाच्या बाबतीत 'लव्ह अॅट र्फस्ट साइट' असं घडेलच याची शक्यता नाही. अशा वेळी मग, पर्याय स्वीकारला जातो तो अॅरेंज मॅरेजचा. काही जणांची लव्हस्टोरी प्रेमापासून सुरू होते आणि त्याची परिणीती लग्नात होते. तर काही जणांचं लग्न आधी होतं आणि मग प्रेमाला बहर येतो. 'समव्हेअर समवन इज मेड फॉर यू' असं म्हणूनच म्हटलं जातं. पण, अशा वेळी प्रश्न पडतो तो म्हणजे 'असं ठरवून, समजून-उमजून प्रेम करता येतं?' याचं उत्तर अर्थातच 'हो' असं आहे. ठरवून लग्न करायंच. एकमेकांना समजून घेत संसाराचा गाडा हाकायचा, शक्य तेव्हा तडजोडी करायचा हा भारतीयांचा फण्डा. इन्स्टण्ट मॅरेज आणि झटपट घटस्फोटाचं लोण अलिकडेच परदेशातून आयात केलेलं. आपल्याकडे प्रेम शरीरापर्यंत मर्यादीत राहत नाही. आपला कल एकरुप होण्याकडे असतो. मन आणि आत्म्याशी याचा संबंध. कालपर्यंत बोजड वाटणारा हा विचार कुटुंबसंस्थेचे तीन तेरा वाजलेल्या अमेरिकेतही स्वीकारला जातोय. अमेरिकन सायकोलॉजिस्ट आणि लेखक रॉबर्ट एपस्टिन याच्या मते, एखाद्या व्यक्तीवर ठरवून प्रेम करता येतं आणि लवकरच हा पॅटर्न अमेरिकेत स्वीकारला जाईल, असं त्यांचं ठाम मत आहे. याचं कारण तिथे नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेले प्रचंड तणाव आणि त्यामुळे अर्ध्यातच तुटणारी नाती आहे. यावर तोगडा म्हणजे कोणावर प्रेम करायचं, त्या व्यक्तीची निवड करून आपण त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करू शकतो, असं मत रॉबर्ट मांडतो. रॉबर्टच्या पहिल्या लग्नाचा शेवट घटस्फोटात झाला. ही घटना खूपच वैयक्तिक स्वरूपाची असली, तरी याचा त्याच्यावर खूपच परिणाम झाला. नात्यात आलेल्या या अपयशामुळे तो खूपच फ्रस्ट्रेट झालो होता. त्यातून टिकाऊ संबंधाबाबत त्याच्या डोक्यात चक्र सुरू झालं. आज आपल्या आजूबाजूला पाहिलं, तर घटस्फोटांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येतंय. लव्ह मॅरेज असूनही नातं असं असफल होत असताना अॅरेंज मॅरेजची तर बातच सोडा. कारण यात दोन अनोळखी व्यक्ती दोन-चार वेळा भेटतात आणि मग, लग्नाचा निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्यात खरंच प्रेम किती असतं, हा खरा मुद्दा. लव्ह मॅरेजमध्ये ते दोघे जण एकमेकांना ओळखत असतात, एकमेकांवर प्रेम करत असतात. पण अॅरेंज मॅरेजमध्ये असं नसतं. ते दोघे फार तर चारसहा महिने एकमेकांना ओळखत असतात. पण, आपल्या मनाशी ठाम निश्चय केला, तर मात्र आपण समोरच्या व्यक्तीवर खरंच प्रेम करू शकतं, अगदी समजून-उमजून! आपण सगळेच परीकथा आणि रोमॅण्टिक सिनेमे पाहत आणि ऐकत लहानाचे मोठे होतो. या परीकथांप्रमाणे स्वप्नातला राजकुमार किंवा राजकुमारी आपल्याला भेटेल, अशी आपल्या सगळ्यांचीच कल्पना असते. या कल्पनेनुसार टीनएजपासून तारुण्यात प्रवेश करेपर्यंत आपण सगळेच आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आपला जोडीदार शोधत असतो. आणि त्यापैकी काहींना त्यांचा सोलमेट भेटतो, तर अनेकांना तो कांदेपोह्यांच्या मार्गाने शोधावा लागतो. पण, मार्ग कोणताही असला, तरी एखाद्या व्यक्तीवर ठरवून प्रेम करायचं म्हटलं, तर ते निश्चितच शक्य आहे, असं रॉबर्ट सांगतो. घटस्फोटानंतर बराच काळ फ्रस्ट्रेट असणाऱ्या रॉबर्टच्या आयुष्यात कामानिमित्त आलेल्या एका तरुणीबरोबर निर्माण झालेल्या अशा नात्याच्या आधारे आपण असं मत व्यक्त केल्याचं तो सांगतो. केवळ याच प्रयोगाच्या आधारे नाही तर अॅरेंज मॅरेजेसच्या केलेल्या अभ्यासाचाही आधार याला लाभला असल्याचं तो सांगतो. ठरवून लग्न केलेल्या जोडपं प्रथम लग्नसंस्कारांनी एकत्र येतं, तर कालांतराने निर्माण झालेलं प्रेम त्यांना एकमेकांशी बांधून ठेवतं. आजही आपल्याकडे ठरवून लग्न करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. अशा लग्नासाठी एकमेकांवर विश्वास हाच आधार असला, तरी एकमेकांवरील प्रेमच त्यांना एकमेकांसाठी अनुरूप बनवत असतं. बराच काळ एकमेकांबरोबर व्यतीत केल्यावर जसं त्या व्यक्तींमध्ये प्रेम निर्माण होतं, तसंच अॅरेंज मॅरेज केलेल्या जोडप्यांमध्येही. म्हणूनच तर कोणावर ठरवून प्रेम करायचं, म्हटलं तर ते शक्य आहे. शेअरिंग आणि केअरिंग यांच्या आधारावर हे प्रेम फुलवता येऊ शकतं, असं रॉबर्ट म्हणतो. म्हणूनच तर आपल्याकडे म्हटलं जातं, नवराबायको ही संसाररथाची दोन चाकं. दोन्ही चाकांशिवाय हा रथ पुढे हाकणार कसा?
Thursday, February 4, 2010
हमारी generation की आवाज सुनो !
स्वतःच्या हव्या तशा आयुष्याच्या मांडणीचा विचार करणारी, त्यासाठी पालकांची मदत घेणारी ही एक महाविद्यालयीन युवती... प्रातिनिधिक स्वरूपात ती पालकांना काहीतरी सांगू पाहतेय. आजच्या युवा पिढीचे भावविश्व शब्दबद्ध करण्याचा तिचा हा एक प्रयत्न स्वानुभवांसह, तिच्याच शब्दांत...!विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा Society, Elders, Parents हे विषय निघतात, तेव्हा प्रत्येक जण त्यांच्या आई-वडिलांचा एक कॉमन व famous dialog सांगतात, "जास्त हुशारी करू नकोस. आम्ही तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे, पावसाळे बघितलेत!''पालकांना हे तरी माहीत आहे का की, त्यांच्या वेळचे उन्हाळे, पावसाळे व आताचे उन्हाळे, पावसाळे यामध्ये किती तफावत आहे? त्यांना सांगावंसं वाटतं, की तुमचा हा डायलॉग त्या काळासाठी योग्य असेल; पण आता उन्हाळे, पावसाळे तरी जागेवर राहिले आहेत का ? तुमचा उन्हाळा, पावसाळा व आमचा उन्हाळा, पावसाळा यात कम्पॅरिझन होऊच शकत नाही; कारण या दोन पिढ्यांमध्ये जो काळ आहे, त्यामध्ये झालेले changes उदाहरणार्थ © science, technology व Globalisation हे काळापेक्षाही जास्त speed ने पुढे गेले आहेत. त्यामुळे आमच्या पिढीचे विचार तुमच्याशी जुळू शकत नाहीत....म्हणे 'स्वंयपूर्ण' व्हा !मोबाईल व इंटरनेटवर नेहमीच त्यांचा राग असतो; पण आजची परिस्थिती अशी आहे, की एक वेळ जेवायला नसले तरी चालू शकते; पण या साऱ्या गोष्टी जीवनावश्यकच झाल्या आहेत. आम्ही मानतो, की काही जण त्याचा अतिरेक करतात, ऍडिक्ट होतात; पण जे त्याचा योग्य तऱ्हेने उपयोग करतात, त्यांच्यासाठी ते देवासारखे आहेत. खरं तर मोठ्यांनी आमच्याकडून या गोष्टी कशा वापरायच्या, हे शिकले तर बरे होईल. नेमकी कॉलेजला निघायची वेळ किंवा टीव्हीवर आपल्या आवडीचे काही बघत असतो, तेव्हा त्यांना दुसऱ्यांना sms करण्याची आठवण येते. स्वतःला sms करता येत नाही, याचा राग ते आमच्यावर काढतात. रूटीन कामे सांगावीत तसे, एवढा sms करून दे आणि तेही रुबाबात सांगतात. घराबाहेर गेल्यावर मोबाईलमध्ये काही अडचण निर्माण झाली, तर त्यांना दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते. स्वतःचा अडाणीपणा ते दुसऱ्यासमोर दाखवतात. विशेष म्हणजे त्यांना काहीच वाटत नाही आणि आपल्याला मात्र म्हणतात, "काय थोड्या थोड्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत लागते. आता मोठे झालात. स्वयंपूर्ण व्हा! हे कितपत स्वयंपूर्ण आहेत ते त्यांनाच माहीत!'काही पालक मात्र फार मोठ्या मनाचे असतात. आपले अज्ञान जाणून घेऊन आपल्याच मुलांकडून ज्ञान update करतात. त्याबद्दल काही माध्यम वापरून सर्वांना जागे करतात. मागच्याच महिन्यात 'सकाळ'मध्ये संपादक उत्तम कांबळेंचा 'मोबाईल हरवला व मोबाईल सापडला' वाचले. आम्हा सर्वांना वाचून फार आनंद झाला. वाटलं असंच सर्व पालकांनी मुलांकडून काय शिकण्यासारखं आहे ते जगजाहीरपणे कबूल केलं, तर बाकी पालकांवर त्याचा निश्चितच परिणाम होऊ शकतो. आमची अशा फालतू कामांपासून सुटका होऊ शकते. लुडबूड नकोय आम्हाला...!होस्टेलवर राहणारे कसेबसे पालकांच्या तडाख्यातून सुटून दुसऱ्या गावात येतात, तेव्हाही "पालकजात' पिच्छा सोडत नाही. सतरांदा फोन करतील. "आज काय केलं बेटा?' हा तर आईचा नेहमीचा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांना रोजचं रूटीन "त्यांना जसं आवडतं,' तसं सांगून मोकळं होतो आम्ही; कारण रात्री मित्रांशीही फोनवर गप्पा करायच्या असतात. दुसरीही काही कामे असतात त्याबद्दल यांना सांगितलं, तर आहे तिथून लुडबूड करायला कमी करत नाहीत.होस्टेलवर राहणाऱ्या मुलींचं तर विचारूच नका. ती जिथे जिथे जाते तिथे तिथे तिची आई फोनने पिच्छा करत असते. हेही कमी की काय, 'पेरेंट्स मीटिंग'च्या वेळी जर यांचे प्रश्न ऐकले की असं वाटतं, अरे, आम्हाला काय तुम्ही अजूनही school going students समजता का? आम्ही कॉलेजमध्ये आलो. मोठे झालो हे त्यांच्या डोक्यातच जात नाही. असे बाळबोध प्रश्न विचारतात, की त्यांच्या प्रश्नांची कीव करावीशी वाटते. 'सातच्या आत घरात' विसरा आता ! मला चांगलं आठवतं, आमच्या प्राचार्यांना एका पालकांनी प्रश्न केला, की सर, तुमच्या कॉलेजच्या होस्टेलवर रात्रीचे लहशलज्ञ ळप 10.30 ला आहे. म्हणजे तुम्ही रात्री 10.30 पर्यंत मुलींना भटकू देता. एवढेच नाही, तर काही मुली 10 वाजता बाहेर जातात व 10.30 ला होस्टेलवर येतात, हे योग्य आहे का? मला वाटतं अजूनही बरेचसे पालक "मुलींनी सातच्या आत घरात' या डायलॉगमधून बाहेरच निघालेले नाहीत. ते o situation चा विचार न करता प्राचार्यांसमोर मुलींवरचे प्रेम उतू घालतात. त्यांना हे कळत नाही Eng, Med. व इतर कॉलेजेस संध्याकाळी पाच ते सहापर्यंत असतात. त्यानंतर ती मुले कॉम्प्युटरचे क्लासेस किंवा अवघड विषयांच्या ट्यूशनला जातात. मग नऊ वाजेपर्यंत क्लास झाल्यावर जेवण करून रूमवर यायला 10.30 नक्कीच होणार. पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी येण्या-जाण्यामध्ये किती वेळ जातो, याचा ते विचारच करत नाहीत. मुले जर कॉलेजच्या मेसवर जेवत असतील, तर असा आव आणत प्राचार्यांना बोलतात, की तुमची जेवणाची क्वालिटी बेक्कार आहे. तुम्ही मेनूमध्ये असं ठेवायला पाहिजे, तसं ठेवायला पाहिजे. रोजच ही कुणाची तरी तक्रार असणार; कारण मेसमध्ये जेवणारी मुले सर्व states मधून आलेली असतात. त्यामुळे काहीही मेनू ठेवला तरी तो कोणाला न कोणाला आवडणार नाही आणि होस्टेलला यायच्या आधी जेवणाच्या बाबतीत यांनी आमच्यासाठी काय बोंब मारलेली असते न सांगितलेले बरे!'खोके बढाउंगा...उडाउंगा भी !'एका रविवारी आमचा ग्रुप picture नंतर मॅकडीमध्ये गेला. मनसोक्त गप्पागोष्टी रंगल्या होत्या. विषय काय असणार? सध्याचा गाजणारा म्हणजे विद्यार्थी आत्महत्या. एक जण म्हणाला, "काय यार हे काय आत्महत्येचं वारं आलंय. स्वाइन फ्लू एकाला झाला की दुसऱ्याला होतो माहीत होतं; पण सध्या तर, आज पाच आत्महत्या झाल्या, तर दुसऱ्या दिवशी त्याची संख्या 10 वर... सालं झालं तरी काय विद्यार्थ्यांना! असं वाटतं आपणही करून पाहावी की काय? पण ही करण्यासारखी गोष्ट असली तरी करून पाहण्यासाठी... अरे बापरे! या विचारानेच घाम फुटतो.''एक जण म्हणतो, "माझीही परिस्थिती अशीच आहे. सालं माझ्या जागेवर दुसरे कुणी असते, तर तो केव्हाच वर ट्रान्स्फर झाला असता. माझा बाप मोठ्ठा डॉक्टर त्यामुळे मी डॉक्टर झालोच पाहिजे, नाही तर त्यांची गादी कोण चालवणार? यार हे पेरेंट्स बापाने किराणा दुकान मुलाच्या ताब्यात द्यावे, अशाच प्रकारे गोष्टी करतात...''"मालूम है उसने मेरी ऍडमिशन के लिए आधा खोका दिया, लेकिन मेरे उपर के खोके में कुछ जाने को मांगता ना! तीन साल से गाडी आगेही नही जा रही, बोलता है चिंता मत कर! और आधा खोका लगाऊंगा। खुदको बहुत smart समझता है।''"अरे वो सब ठीक है लेकिन तू हमे एक बता। उपरका खोका तो हमारी समझ में आया, याने की तेरी खोपडी। लेकिन पहलेवाले ऍडमिशनवाले आधे खोके क्या है, हमारे भी खोपडी में डाल।''"अरे तुम सब बुद्दू हो...एक खोका याने एक करोड। करोड को ये बिझनेसवाले खोका कहते है।''"बापरे... आधा खोका याने की पच्चास लाख। तेरे बाप ने इधर भरा।''"अरे इस में कुछ बडी बात नही। उस के पास बहुत खोके पडे हुए है। और आप सबको तो पताही है, की मुझे ये डाक्टर लाइन बिलकूल पसंद नहीहै । मैं इंजिनिअर होना मांगता था लेकिन...'' "उसे मालूम नही जब मैं उनकी गद्दी पे बैठूंगा तो खोके बढाऊंगा लेकिन जीते-जागते खोके उडाउंगा।''म्हटलं, आम्हालाही पडतात प्रश्न !मी नाशिकची... आई-वडील शिक्षण क्षेत्रात असल्याने लहानपणापासून अकरावी-बारावीचे स्टुडंट्स बघते. पालक बघते. आता हे सर्व वरचं ऐकलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या एक डॉक्टर मॅडम. एकदा त्या आमच्याकडे आल्या. माझ्या पप्पांना म्हणाल्या, "सर, दोन महिन्यांवर परीक्षा आली आहे. माझी सोनाली बारावीत आहे. तिला जरा केमेस्ट्रीची मदत कराल काय?''दुसऱ्या दिवसापासून सोनाली संध्याकाळी सात ते रात्री नऊ आमच्याकडे. मॅडम स्वतः तिच्यासोबत यायच्या. खाली दोन तास गाडीत बसून राहायच्या. तिला सोबत घरी घेऊन जायच्या. प्रॅक्टिस सोडून दोन महिने दवाखाना बंद ठेवला. आईचं मुलीविषयीचं स्वप्न पूर्ण झालं. सोनाली मेडिकलला गेली. मोठा मुलगाही डॉक्टर झाला. त्यामुळे आई खूश; पण वडिलांना वाटायचं लहान्याने माझ्यासारखं डॉक्टर व्हावं. लहाना पठ्ठा फार हुशार निघाला! बारावीचा रिझल्ट लागेपर्यंत कळूच दिलं नाही, की त्याने अकरावीतच इळे. सोडलं आहे. रिझल्टनंतर आई-वडिलांना धक्काच. त्यानं ठरवलं होतं की डॉक्टर व्हायचं नाही. आई-वडील रिझल्टनंतर थोडा वेळ नाराज झाले. सर्व विसरून त्याच्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या मागे लागले. चांगल्या ठिकाणी ऍडमिशन झाली. मागच्याच महिन्यात त्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला पुण्याला मम्मीबरोबर गेले तेव्हा कळलं, की मोठा मुलगा नाशिकमध्ये व सोनाली व छोटा मुलगा मोठ्या पोस्टवर फॉरेनमध्ये... भूतकाळात गेले... सोनालीला आईने त्या वेळी साथ दिली नसती तर... छोट्यावरचा राग लगेच विसरून पालक त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नसते तर... स्वतःची प्रॅक्टिस काही महिने बंद ठेवली नसती तर... हे असे अनेक प्रश्न...'असे आई-वडील आम्हालाही असते तर...? 'आधी दिलेल्या उदाहरणात त्या आई-वडिलांसारखं पैशाच्या जोरावर मुलाला डॉक्टर बनवणं व आपलं करिअर थोडं बाजूला ठेवून मुलांना मानसिकरीत्या सांभाळून प्रोत्साहन देणारे आई-वडील दोघांच्या ऍटिट्यूडमध्ये फार मोठी तफावत. पहिल्या उदाहरणात बनलेले डॉक्टर समाजाला घातक, तर दुसऱ्या उदाहरणात बनलेले डॉक्टर समाजाला आवश्यक.डॉ. उमेश कुलकर्णी व शर्मिला कुलकर्णी... पप्पांना मणक्यांचा त्रास म्हणून नेहमी त्यांच्याबरोबर भेट व्हायची... एकदा सहज विचारलं, ""डॉक्टरसाहेब, मॅडम दिसत नाहीत?''ते म्हणाले, ""आमच्या मुलीला खेळाची आवड. त्यामुळे ज्या वेळी बाहेरगावी तिच्या टूर्नामेंट्स असतात, तेव्हा आळीपाळीने आमच्यापैकी एक जण तिच्याबरोबर जातो...'' विश्वासच बसला नाही.12 जानेवारीला "सकाळ'चे संपादक उत्तम कांबळे यांनी "तुमच्याही मुलांच्या मनात आहे एक कविता,' हे शीर्षक असणारी न्यूज फ्रंट पेजवर छापली. सकाळी सहाला मम्मीचा मोबाईल वाजला. दुसरीकडून अनोळखी व्यक्ती माझ्या आईला congratulation देत होत्या. आईला व मला कळलं, की आमच्या कुटुंबावर फ्रंट पेजवर बातमी आहे. तीन ते चार दिवस मम्मीचा मोबाईल फुल एंगेज. एक कॉल सुरू असताना पाच-सहा कॉल्स वेटिंगवर... मला कळेना एवढे फोन कसे येताहेत? तेव्हा लक्षात आलं न्यूजमध्ये मम्मी-पप्पांचे मोबाईल नंबर दिले आहेत. न्यूज येईपर्यंत आम्हा कोणालाच वाटले नव्हते, की आम्ही काही वेगळं केलं आहे. परंतु जेव्हा एसएमएस वाचायला सुरवात केली, तेव्हा प्रत्येक मेसेजमध्ये मम्मी-पप्पांना
congratulation त्याचबरोबर माझ्यासाठी खूप सारे good wishes. मी मम्मीला विचारले, "हे काय?'तेव्हा मम्मी म्हणाली, "बेटा, मला जे फोन आले त्यामध्ये जे स्टुडंट होते त्याचं म्हणणं होतं, "मॅडम, आम्हालाही असे आई-वडील असते तर... किंवा मॅडम please माझ्या आईशी... माझ्या वडिलांशी बोलाल का?' अशा प्रकारच्या फोननी तर माझ्या आईची झोपच उडाली. लक्षात आलं, की कित्येक आई-वडील मुलांना समजून घेत नाहीत... नको तेवढी बंधनं टाकतात... आम्ही हे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, आता तू तरी पूर्ण कर... म्हणजे स्वतःचे स्वप्न मुलांकडून पूर्ण होण्याची अपेक्षा करतात... काही म्हणाले, "मॅडम, मला संगीताची आवड आहे, तर कुणाला ड्रॉइंगची, तर कुणाला खेळण्याची...' पण बहुतेक पालकांचं एकच म्हणणं, "पहिलं अभ्यासात लक्ष घाल. पूर्ण आयुष्य पडलं आहे छंद जोपासायला; पण माझ्या मम्मीला वाटतं शिक्षणाबरोबर जर छंद जोपासू दिले तर stress level कमी होऊ शकते; पण हे पालकांना पटविणे म्हणजे मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणे असे आहे. यामुळे माझ्या पेरेंट्सनी सर्वांच्या फोनला प्रतिसाद दिला. "तुमच्या मुलांच्या पाठीशी उभे राहा,' असे सांगितले. तुम्ही केलेल्या संस्कारांवर तरी ठेवा विश्वास !सध्या पेपर उघडला की हमखास विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर बातमी असते. विद्यार्थ्यांची stress level वाढली हे खरं आहे; पण त्यांना त्यांच्याच घरात समजून घेणाऱ्या प्रेमाच्या व्यक्ती लाभल्या तर...? ते frustration adiction च्या मागे लागतात. वाईट सवयी लावून घेतात व जिथे या गोष्टी म्हणजे stress level अतिशय वाढते, तेव्हा आयुष्याचा शेवट एवढाच पर्याय त्यांना दिसतो. नेहमी "फोनवर एवढा वेळ बोलते', असं मम्मीला म्हणणारी मी या घटनेनंतर तिचं बोलणं किती गरजेचं आहे हे माझ्या लक्षात आलं. अशा कित्येक आया आहेत त्या योग्य वेळी स्वतःच्या मुलांचं करिअर स्वतःच्या करिअरपेक्षा आवश्यक समजतात.
मला शाळेचे दिवस आठवतात. सातवी-आठवीमध्ये मुली आल्या, की पेरेंट्सला वेगळीच काळजी असते. नको तेवढ्या चौकशा... थोडासा उशीर झाला तरी शंभर प्रश्न, "आता तू मोठी झालीस. असं नको करू. तसं नको करू. असे कपडे घाल, तसे कपडे घाल, घरात कामाला मदत कर, मुलीची जात आहे. तुला स्वयंपाक यायलाच पाहिजे...' आणि रिस्ट्रिक्शन्स..माझ्या एका मैत्रिणीची आई मुलीवर सतत ऑर्डर सोडते. तिला एखादी गोष्ट करणे शक्य नसेल, तर कुठलाही प्रश्न विचारण्याचा तिला अधिकार नाही. आम्ही मैत्रिणीला एकदा विचारले, "का गं, आम्ही सर्व सायकलीवरून येतो, तू का नाही सायकलीवरून येत?' ती म्हणाली, "माझे आई-बाबा म्हणतात, सायकल चालवायची नाही; कारण त्याने उंची वाढते व उंची जर जास्त वाढली, तर तुझ्यासाठी मुलगा कुठून आणायचा?'शक्यतोवर आम्ही रात्री 10.30 ते 11.30 लॅपटॉपवर बसतो. इंटरनेटवर बसतो; कारण त्याच वेळी मित्र-मैत्रिणी भेटू शकतात. काही जण याचा गैरवापर करतात म्हणून प्रत्येकच जण गैरवापर करेल असे नाही. कधी कधी इनबॉक्स चेक करतात. त्यावरचे जे रिप्लाय असतात, त्याचा खरा मीनिंगच त्यांना माहीत नसतो किंवा तो कुठल्या मेसेजवर रिप्लाय आहे हेही माहीत नसतं. उगीचच निगेटिव्ह मीनिंग काढतात. आम्ही जास्त एसएमएस करतो; कारण ते आम्हाला स्वस्त वाटतात. उदाहरणार्थ मैत्रिणीला विचारायचं आहे "तू कुठं आहेस?' असे करण्यासाठी कॉलला एक रुपया; पण एसएमएसला एक पैसाच लागतो. त्यामुळे आम्ही एसएमएसचा भरपूर वापर करतो. तर यांना वाटतं काही तरी लफडंच आहे ! यांचा थोड्या थोड्या गोष्टींवर अविश्वास.शेवटी म्हणावं लागतं, ""अरे बाबा... तुम्हीच तर आमच्यावर संस्कार केले आहेत, त्यावरही तुमचा विश्वास नाही का?''बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे, की आई-वडील मुलांशी नीट वागत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये गुड रिलेशनशिप तयार होत नाही. अशा वेळी मुलं आपलं मन मोकळं करू शकत नाहीत. जर त्यांचे मित्रही असे असतील, की त्यांच्याजवळ ते बोलू शकत नाहीत. त्या वेळी असं वाटतं, की भावना मोकळ्या करायला आई एवढं जवळ कोणीच असू शकत नाही. ज्यांना घरातच भावनिक संरक्षण मिळतं, ते वाईट मार्गाला लागत नाहीत....बाप म्हणून त्यांचा काय उपयोग? माझी मैत्रीण जी आदर स्टेटची आहे, ती एक दिवस चक्कर येऊन पडली. स्ट्रेसमुळे. दुसऱ्या स्टेटची असल्यामुळे आई-वडील लगेचच पोचू शकत नव्हते. माझ्या आईने तिला दवाखान्यात नेऊन दिवसभर भरती केले. रात्री घरी आणले.ती मैत्रीण डॉक्टरांना म्हणायची, "मुझे पप्पा से बात करनी है।' परंतु तिचे वडील ऑपरेशनमध्ये एंगेज असल्यामुळे बोलू शकत नव्हते. रात्री फोन केला त्यांना. सर्व घटना सांगितली. मी त्यांना विचारले, "अंकल, आप कब निकल रहे हो?' तेव्हा ते म्हणाले, "मुझे तीन-चार दिन मेजर ऑपरेशन्स है इसलिए नही आ सकता। ऐसा करो उसे बोलो दो दिन रेस्ट कर के प्लेन से चली आना।' मी तिच्या बाजूलाच बसले होते. माझं डोकं सुन्न झालं. तिच्या पप्पांना बाकी पेशंटसमोर स्वतःची मुलगी काहीच वाटत नसेल. कदाचित बाकी पेशंटचे ऑपरेशन दुसरे डॉक्टर करू शकतील; पण पप्पा म्हणून जर ते आले असते... नात्यातल्या दुसऱ्या कुणाला पाठवू शकले असते... असे डॉक्टर खोऱ्यांनी पैसे कमावतात; पण बाप म्हणून त्यांचा काय उपयोग? कदाचित पप्पांमुळेच ती परमनंट पेशंट बनेल.
अश्विनी जोगी, नाशिक
Tuesday, February 2, 2010
संपलेली माणुसकी
सौ. स्वाती संजय पोरवाल, बिबवेवाडी
त्या दिवशी रविवार होता. बऱ्याच दिवसांत हॉटेलात
जेवायला गेलो नव्हतो. माझी मुलगी म्हणाली, ""आज हॉटेलात जायचे.'' ती शक्यतो कधी बाहेर जेवायचे म्हणत नसल्याने माझ्या मिस्टरांनी लगेच होकार दिला. आम्ही तिघे एका प्रशस्त हॉटेलात गेलो. रविवार असल्याने बरीच गर्दी होती. बरेच लोक वेटिंगला होते. (कुठल्या प्रवासी तिकिटाला नव्हे हॉटेलमध्ये जेवायला) असो. कसेबसे आम्हाला एक टेबल मिळाले. आम्ही ऑर्डर दिली. जेवण येईपर्यंत सहजच इकडेतिकडे बघत होतो. समोरच्या टेबलावर 6-7 जणांचे कुटुंब बसले होते. सर्व हसतखेळत ताव मारत होते. त्याच बाजूला एक घोड्याटाइप खेळणे (गेम) होते. त्यावर एक वर्ष ते दीड वर्षांच्या लहान मुलाला घेऊन एक 10-12 वर्षांची मुलगी उभी होती. ते मूल छानपैकी घोड्यावर हलत होते, हसत होते. पण... त्या मुलीची नजर मात्र टेबलावर मांडलेल्या जेवणावर होती. तिच्या चेहऱ्यावरून तिला भूक लागल्याचे जाणवत होते. ती मुलाला घेऊन त्या कुटुंबाच्या टेबलाजवळ आली, तर ते मूल परत घोड्यावर जाण्यासाठी रडायला लागते. टेबलावरच्या एका स्त्रीने तिला हाताने तिकडे जाण्यास सुचवले. ती परत निराशेने वळली. आताही तिची नजर सर्व टेबलावर मांडलेल्या अन्नावर होती.आता आमचीही ऑर्डर आली होती. पण माझे काही जेवणात लक्ष लागेना. पती व मुलगी आनंदाने जेवत होते. माझ्या घशाखाली काही केल्या घास उतरेना. हे म्हणाले, "काय झाले? सारखे समोर काय पाहते आहे?'' मी त्यांना ती मुलगी व ते कुटुंब दाखवले. ते म्हणाले, ""जाऊ दे. त्याचं झाल्यावर तिला जेवायला देतील.'' पण माझे काही लक्ष लागेना. एव्हाना त्यांची जेवणं आटोपली होती व कुटुंबप्रमुखाने खुणेनेच वेटरला बिल देण्याची सूचना केली. मला कळून चुकले की त्या मुलीला इथे तरी जेवण मिळणे नाही. मला माहीत होतं, की जरी माझ्या मिस्टरांच्या मनात त्या मुलीला खायला घालायचे असले तरी ते भांडण नको म्हणून घालणार नाहीत. ते हात धुवायला गेले. एवढ्यात मी वेटरला पाहिले. त्याला बोलावले व त्या मुलीला पाव-भाजी व बरोबर दोन जोडी जास्त देण्यास सांगितले. वेटरजवळ 50 रु. दिले. तोपर्यंत ते लोक निघण्याच्या तयारीत होते. मी त्याच्या टेबलाजवळ जाऊन त्या स्त्रीला म्हणाले, ""माझा आज संकल्प होता, एखाद्या 10-12 वर्षांच्या मुलीला जेवायला घालायचे, पण दिवसभरात कोणीही भेटले नाही म्हणून तुमच्या कामवाल्या मुलीसाठी पावभाजी ऑर्डर केली आहे, ती खाईपर्यंत थांबा.'' त्या बाईने एकंदर प्रकार लक्षात घेता माझ्यावर जळजळीत कटाक्ष टाकला. मी तिच्याकडे न बघता त्या मुलीला खुणेने बोलावून तिला बसायला सांगितले व वेटरला परत ती मुलगी दाखवून लवकर आणण्यास सांगितले. तेवढ्यात माझे पती आले, मी काढतापाय घेतला. नंतर काय झाले माहीत नाही. बाहेर आल्यावर जेव्हा मी त्यांना ही गोष्ट सांगितली तेव्हा ते म्हणाले, ""पावभाजी का? तिला एक भाजी व 2-3 पराठे द्यायचे होतेस ना? ती तरी हे कधी खाणार? मी पैसे दिले असते.''दुसरा प्रसंग माझ्या मैत्रिणीच्या घरी तिच्या मुलाची बर्थडे पार्टी होती. मुले एन्जॉय करत होती. इडली, सांबार, बर्फी, केक, चॉकलेट, पलीकडे एक डिश धुण्यासाठी बाई बसली होती. तिच्याबरोबर एक 5-6 वर्षांचा मुलगा होता. तो केविलवाण्या नजरेने हे सर्व पाहत होता. मी मैत्रिणीला म्हणाले, ""त्याला खायला दे ना.'' ती म्हणाली, ""अगं सगळं झाल्यावर देईन. नाही तरी मुलं खूप उष्टं टाकतात.'' हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. आपल्या मुलाचं आपण किती कौतुक करतो. पाहिजे ती वस्तू त्याला आणून देतो. मग आपल्याकडे काम करणाऱ्या लहान बछड्यांचे असे हाल? मोठं माणूस असेल तर आपले मन मारू शकते, पण लहान मुलांना थोडी कळतं की आपण नोकर आहोत. आपल्याला असलं काही मिळणार नाही. मला वाटलं होतं एक डिश घ्यावी व त्या मुलाला द्यावी, पण मैत्रिणीचा स्वभाव पाहता हिंमत झाली नाही. आता वाटतं माझी डिश मी त्याला देऊन त्या मैत्रिणीलाही झाडायला हवं होतं, उष्टं देणं किती पाप. गरिबी हा त्यांचा गुन्हा आहे का? देवानेही अशा लोकांना जन्माची अद्दल घडवायला हवी.सर्व नोकर ठेवणाऱ्या लोकांना माझी कळकळीची विनंती, की कमीत कमी लहान मुलाचे मन मारू नका. आपल्या मुलासारखं त्यांना वागवा, मग बघा त्याच्या आयाही किती प्रामाणिकपणे काम करतील आणि तुमचे मनाचे समाधान? ते तर तुम्ही कशातही मोजू शकणार नाही, माणुसकीचा अंत करू नका.

Sunday, January 24, 2010
घरोघरी नाहीत आता मातीच्या चुली!
पायाच्या दोन्ही अंगठ्यांत काठवट धरून भाकरी बडवायची. सुना उभ्या राहून परातीत भाकरी थापायला लागल्या. आईची टराटर फुगलेली भाकरी आणि सुनांचा पिठाचा भाजलेला लगदा. कशाची तुलना कशाशी करायची? आता घरात किचनकट्टा. शेगडी-लायटर. सगळं चकाचक. किचन कसं टीव्हीतल्या जाहिरातीगत दिसतं. ओव्हनपासून ते मायक्रोव्हेवपर्यंत सारं हाजीर! मिक्सरपासून ग्राइंडरपर्यंत सारं तैनात! फक्त चवीचा पत्ता नाही. कुठं हरवली ही चव? चुलीसमोर माझं बालपण गेलं. फुलती चूल... भुरभुरती चूल... भडकलेली चूल... थंड चूल... चुलीची अनेक रूपं पाहिली मी. माझ्या नकळत्या वयात. चूल आणि मूल. माझी आई या चुलीसोबत, माझ्यासोबत जगत होती. जगवत होती. चुलीसोबत पेटणं, धगधगणं, फुलणं, थंड होणं अनुभवलं मी माझ्या वयासोबत. आयुष्याशी जोडली गेली चूल, भानूशी आणि वैल. नाही कळत ना तुम्हाला? नकोच कळायला! काय असते चूल? तीन दगडांची चूल. कुणाचं पेटतं आयुष्य? कशी शोधली असेल माणसानं चूल? झाडावर झाड घासलं. उठली असेल ठिणगी. पेटला असेल वणवा. दावानल! जंगलभर, पोळले असतील पक्षी, प्राणी, पशू. माणसानं वाचवलं असेल आपल्याला. चलाखच तो. मेंदू होता त्याच्याजवळ. भाजलेला पशू-पक्षी-प्राणी-फळ-झाड चाखले असेल त्यानं. हे फारच ग्रेट! जीभ आणि चव. काही तरी वेगळं लागलं असेल माणसाला. मग विस्तवाचा शोध. यातायात. झाडावर झाड आपटा. दगडावर दगड. दिसली असेल ठिणगी. ती पकडा. ती साठवा. साठवता साठवता चुलीचा शोध. आधी फक्त मोकळी- धग. नंतर तीन दगडांची. मग कोणी तर कल्पक कुंभारानं बनवली असेल चूल. फारच बुद्धिमान असेल कुंभार. पेटणारी आग नियंत्रित करणारा. आगीला आकारात बंद करून इप्सिताजवळ पोचवणारा. त्यानंच बनवलं मडकं. मातीला आकार देऊन. पहिलं मडकं घडवणारा कुंभार नोबेल लॉरेटच! त्याला नाही दिलं कुणी नोबेल. बिचारा हाकलला गेला व्यवस्थेतून. ओबीसी हे आरक्षण देऊन! चूल : जणू काही घराची लक्ष्मीच!आई भल्या पहाटे उठून चुलीला पोतेरं द्यायची. हळद-कुंकू लावायची. चुलीत जिवंत ठेवलेला विस्तव फुलवत ठेवायची. शेणीवर. नव्हती तेव्हा काडेपेटी. विस्तव राखेत पेरून ठेवायचा. गरज असेल तेव्हा फुलवायचा. निर्माण करायची आग. जेव्हा चूल थंड पडायची तेव्हा आणायचा शेजाऱ्याच्या चुलीतून विस्तव. हक्कच तो! नव्हतं उसनं-पासनं. कैकदा असा विस्तव आणला आहे मी ही शेळकुंडावरून किंवा वडील आपल्या तंबाखूच्या पिशवीतून दोन गारगोट्या काढायचे. एकमेकांवर आपटून चकमक पेटवायचे. कप असायचा मध्ये. कप म्हणजे कापसाचं कवच. त्यावर फुलायचा विस्तव. पेटायची चूल. नंतर आली आगपेटी. गंधक सापडल्यावर. चुलीनं समृद्ध केलं आयुष्य. चुलीवरच्या गाडग्यातली आमटी. चुलीवरची भाकरी. चुलीवर तापवलेल्या दुधाची साय. वैलावर ठेवलेली भाजी. साऱ्यालाच मातीचा, राखेचा गंध. जिभेवर रेंगाळावी अशी चव. आईच्या हातातून चूल चव कमवायची. भाकरीला पापुद्रा यायचा. चूल लक्ष्मी घराची. आई भडकली, की चुलीशी बोलायची. चूल फुलली, तवा फुलला, की आई हेरायची... भांडण होणार. तव्यातली पहिली इटुकली भाकरी, आमटीचा पहिला थेंब, चहाचा पहिला घोट चुलीचा असायचा. चुलीला दिल्याशिवाय काहीच असायचं नाही आमच्या पदरात. चूल आणि आई दोघीही अन्नदात्या. दोघीत कमी-जास्त कोणीच नाही. जुना काळ आठवणं हा गुन्हाच!काळ बदलला. आई आणि चूल यांच्याबरोबर आम्ही वाढत गेलो. आईच्या घरात सुना आल्या. चूल, भानुशी, वैल, खोपडा, जळण, बाजूला सारलं जाऊन गॅस, शेगडी, लायटर आला. आई पायाच्या दोन्ही अंगठ्यांत काठवट धरून भाकरी बडवायची. सुना उभ्या राहून परातीत भाकरी थापायला लागल्या. आईची टराटर फुगलेली भाकरी आणि सुनांचा पिठाचा भाजलेला लगदा. कशाची तुलना कशाशी करायची? काठवट पायांच्या अंगठ्यात धरून आईची पाच-सहा बाळंतपणं सहज झाली. सुनांचं प्रत्येक वेळी सिझर. डॉक्टरांना जगवायला शेगडीचा जन्म.घरात किचनकट्टा. शेगडी-लायटर. सगळं चकाचक. किचन कसं टीव्हीतल्या जाहिरातीगत दिसतं. ओव्हनपासून ते मायक्रोव्हेवपर्यंत सारं हाजीर! मिक्सरपासून ग्राइंडरपर्यंत सारं तैनात! फक्त चवीचा पत्ता नाही. कुठं हरवली ही चव? हे फारच नॉस्टॅल्जिक झालंय ना? खरंय. आठवणं हा गुन्हाच. उलट येणाऱ्या काळावर स्वार होता आलं पाहिजे; पण कसं व्हायचं स्वार? वेगवेगळ्या जाहिरातींतल्या नवनव्या वस्तूंना घरात मोकाट प्रवेश देऊन? भरपूर लाकडं असायची शेतात. उन्हाळ्यात तोडायची, वाळवायची. पावसाळा निवांत. ददातच नसायची. झाड तोडायचा प्रश्न नसायचा. फक्त बेनायचं. पुन्हा झाड बेभान. जळाऊ लाकडंच लाकडं. भणभणती चूल. धुरात जीव घुटमळतो म्हणून आला वातीचा स्टोव्ह. मग रॉकेलचा प्रेशर स्टोव्ह. शेगडी ते गॅस. प्रगती हवीहवीच असणारी. मग प्रगतीचं शिखर मायक्रोव्हेव. अजून काहीही येईल. हवेतच शिजेल अन्न. चांगलंच आहे असं झालं तर! जगणं सुलभ, संपन्न होतच जायला हवं. प्रश्न इतकाच- शेतातली लाकडं, घरातली लाकडं, शिजवत जायचे लोक अन्न. तवा-चूल-भानुशी-वैल-राख साऱ्यांचंच रक्त जोडलं जायचं भाकरीशी. रॉकेल आलं. स्टोव्ह आला. बघता बघता गॅस आला. शेगडी आली. मायक्रोव्हेव आणि बाकी बरंच काही. प्रगती म्हणून भन्नाटच; पण कुठं? जिथं झाडं नाहीत, इंधन नाही तिथं सारं ठीक. त्यांनी गॅस पेटवावा. त्याची गरजच असते की; पण जिथं ही इंधनाची मुबलकता तिथं हा गॅस, ही शेगडी काय कामाची? कोणी म्हणेल वेळ वाचतो, श्रम वाचतात. अमूक होते-तमूक होतं. त्याचं काय? असेल बरोबर त्यांचं; पण उद्या संपेलच कधी तरी गॅस. रॉकेल आणि तुम्ही शोधलेले बरेच काही. विजेपासून अणूपर्यंत. तेव्हा पुन्हा माघारी वळण्यापेक्षा आत्ताच चूल जपायला काय हरकत आहे. आरोग्य तरी निरोगी राहील. चव शाबूत राहील. ऊर्जा टिकेल. गॅस खूप लोकांना पुरवून वापरता येईल. कोपऱ्यात पडलेली चूल यासाठी तरी शोधायला हवी. आपण कितीही मागास ठरलो तरी...!

Monday, January 18, 2010
- सुमन कल्याणपूर, नामवंत गायिका
सुमन म्हणजे फूल. सुमन कल्याणपूर या असामान्य गायिकेने गायलेली बहुतेक हिंदी-मराठी गाणी आजही तितकीच टवटवीत वाटतात. त्यांनी पार्श्वगायन सोडल्याला अनेक वर्षं उलटली तरी त्यांचे नाव व गाणे रसिकांच्या मनात तसेच ताजे आहे. महाराष्ट्र सरकारने नुकताच त्यांना 'लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर केला आहे. त्या निमित्ताने. ........... दिवाकर देशपांडे सुमन कल्याणपूर यांना हिंदी सिनेमांची खूप कमी गाणी गायला मिळाली याची त्यांच्या बऱ्याच चाहत्यांना खंत आहे. खरं तर तशी खंत बाळगायचं काहीच कारण नाही. सुमन कल्याणपूर यांच्या समकालीन गायक-गायिकांनी त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक व सातत्याने गाणी गायली असली तरी त्यांच्या व सुमन कल्याणपूर यांच्या गाजलेल्या व रसिकांच्या आजही लक्षात राहिलेल्या गाण्यांचे प्रमाण काढले तर समकालीन गायक-गायिकांपेक्षा सुमन कल्याणपूर यांच्या अशा गाण्यांचे प्रमाण कितीतरी अधिक आहे. आकडेवारीतच बोलायचे झाले तर सुमन कल्याणपूर यांच्या समकालीन गायक-गायिकांच्या गाजलेल्या व लोकांच्या लक्षात राहिलेल्या गाण्यांचे प्रमाण २५ टक्के धरले तर सुमन कल्याणपूर यांच्या अशा गाण्यांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षाही अधिक भरते. गाजलेल्या गाण्यांपेक्षा त्यांची न गाजलेली गाणी शोधणे अधिक अवघड आहे. त्यामुळे हिंदी पार्श्वगायन क्षेत्रातील सर्वाधिक यशस्वी गायिका कोण? या प्रश्ानचे एकमेव उत्तर सुमन कल्याणपूर असे आहे. याचा अर्थ लता मंगेशकर किंवा आशा भोसले या अयशस्वी गायिका आहेत, असा कुणी काढत असेल तर मात्र ते सपशेल चूक आहे. त्यांना यश आणि अपयशाची मोजपट्टीच लावता येत नाही. त्यामुळे या दोन्ही गायिकांना वगळून हिंदी चित्रपटांतील पार्श्वगायकांच्या कारकिदीर्चा आढावा घ्यायचा असेल तर सुमन कल्याणपूर या एकमेव यशस्वी गायिका ठरतात! खरं तर सुमन कल्याणपूर यांचा आवाज लता मंगेशकर यांच्याच जातकुळीचा, पण तरीही पूर्ण वेगळा. या दोन्ही आवाजांमधला फरक तसेच गायनाच्या पद्धतीतला फरक ज्यांचे कान तयार आहेत; अशा फार थोड्या लोकांच्या लक्षात येतो. त्यामुळे हिंदी, मराठीतले लता मंगेशकरांचा आवाज वापरणारे बरेच संगीतकार काही विशिष्ट गाणी सुमन कल्याणपूर यांच्याकडूनच गाऊन घ्यायचे. उदाहरणच द्यायचे झाले तर 'हाले दिल उनको सुनाना था' हे 'फरियाद'मधलं ज्येष्ठ संगीतकार (कै.) स्नेहल भाटकर यांनी संगीत दिलेलं गाणं फक्त सुमन कल्याणपूर यांच्याच आवाजात फिट बसतं. तसंच 'मेरे महबूब न जा, आजकी रात न जा' हे 'नूरमहल'मधलं जानी बाबू कव्वाल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं इतर कोणत्याही आवाजात ऐकण्याची कल्पनाच करवत नाही. त्यांच्या आवाजातलं, गायकीतलं खास असं वेगळेपण अशा अनेक गाण्यांमधून रसिकांना दिसत राहतं. लता मंगेशकर यांचा आवाज वापरणं ही हिंदी चित्रपटसृष्टीची न टाळता येणारी अपरिहार्यता होती, तसं सुमन कल्याणपूर यांच्याबाबत नव्हतं, कारण त्यांचा आवाज ही संगीतकारांची कमजोरी होती. अमुक एका गाण्याला सुमन कल्याणपूर यांचाच आवाज न्याय देऊ शकेल असं संगीतकारांना वाटलं की, ते या अटळतेला बाजूला ठेवून सुमन कल्याणपूर यांच्याकडूनच ते गाणे गाऊन घेत. 'आजकल तेरे-मेरे प्यार के चचेर् हर जुबानपर' हे 'ब्रह्माचारी' चित्रपटातलं गाणं तसं 'चालू टाईप'चं गाणं. ते लता मंगेशकरांनी गायलं असतं तर नक्कीच लोकप्रिय झालं असतं, पण सुमन कल्याणपूर यांच्या आवाजानं मुमताजचा नखरा अगदी अचूक पकडला आहे. त्यामुळे ते आजही रसिकांच्या चांगलंच लक्षात आहे. मराठीत तर अनेक संगीतकारांनी सुमन कल्याणपूर हा आपला ब्रँडच बनवला होता. दशरथ पुजारी, अशोक पत्की, कमलाकर भागवत अशा गुणी संगीतकारांनी सुमन कल्याणपूर यांनाच डोळ्यासमोर ठेवून गाणी बांधली आणि त्यांनी ती गाणी अक्षरश: अजरामर केली. अशा गाण्यांची कितीतरी उदाहरणं सांगता येतील. सुमन कल्याणपूर यांच्यावर अन्याय झाला असे बरेच लोक म्हणतात खरे; पण कमी गाणी गायला मिळाली म्हणून अन्याय झाला असं म्हणण्यापेक्षा जास्ती जास्त चांगली गाणी गायला मिळाल्यामुळे पार्श्वगायनाच्या क्षेत्रात खरा न्याय सुमन कल्याणपूर यांनाच मिळाला, असं वाटतं. जे काही मिळालं ते निखळ होतं आणि या अव्वल गायिकेनं त्या गाण्यांचं सोनंच केलं. शेकडो गाणी गात राहून अनेकांमधला एक कलाकार होण्यापेक्षा मोजकी पण नेमकी लक्षात राहणारी गाणी गाऊन त्यांनी स्वत:चं हिंदी, मराठी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी गायलेल्या इतर भाषांमधल्या गाण्यांमुळे त्यांचं त्या त्या प्रादेशिक भाषांमध्येही असंच स्थान असणार, यात शंका नाही. सुमन कल्याणपूर यांचीही भावना आपल्यावर अन्याय झाला, आपण हिंदी संगीत क्षेत्राच्या राजकारणाचे बळी आहोत, अशी असल्याचे काही ठिकाणी वाचायला मिळते. ते कितपत खरे आहे माहीत नाही. पण 'सुमन कल्याणपूर' या नावाने भारतातील पार्श्वगायनाच्या इतिहासात एक न पुसले जाणारे प्रकरण ठळकपणे लिहिले गेले आहे आणि जोपर्यंत हिंदी, मराठी गाणी ऐकणारे रसिक या भूतलावर आहेत, तोपर्यंत हे नाव आणि त्यांची गाणी लोकांच्या ओठांवर राहणारच आहेत.

Sunday, December 20, 2009
टीव्हीची दुनिया
दशकभरात भारतीय टीव्ही इण्डस्ट्रीने भरपूर मोठी झेप घेतली आहे. चॅनल्सच्या या वाढत्या संख्येमुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांची निमिर्ती होऊ लागली. यामुळे टीव्ही प्रोड्युसर्सना असणारी मागणी प्रचंड प्रमाणात वाढलीय. आज चॅनल जगताने बरीच मोठी झेप घेतली आहे. १९९३ मध्ये फक्त दहा चॅनल्स होते. आज या चॅनल्सची संख्या २२० च्या वर पोहोचली आहे. भारतीय टीव्ही इण्डस्ट्रीने गेल्या दशकभरात प्रचंड झेप घेतली आहे. एण्टरटेन्मेण्ट, न्यूज ते स्पोर्ट्स, बिझनेस संबंधित चॅनल्सचा सुळसुळाट झाला आहे. चॅनल्सची संख्या वाढली तशी त्यावरील कार्यक्रमांची संख्या वाढली. यामुळे टीव्ही प्रोड्युसर्सना असणारी मागणीही भरपूर प्रमाणात वाढली. म्हणूनच आज या क्षेत्रात फूल टाइम करिअर करता येणं शक्य आहे. मीडिया इण्डस्ट्रीत आलेल्या बुममुळे वेगवेगळे चॅनल्सना चांगले दिवस आले आहेत. यामुळे टीव्ही प्रोडक्शन या क्षेत्रातही कामाच्या संधी खूप वाढू लागल्या आहेत. टीव्ही प्रोडक्शनमध्ये वेगवेगळ्या टीव्ही मालिका, व्हिडीओ प्रोडक्शन, डिजिटल व्हिडीओ आणि लाइटिंग, एडिटिंग या सगळ्यांचा समावेश होतो. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे. टीव्ही प्रोडक्शन या क्षेत्राचं प्रशिक्षण घेतल्यावर टीव्ही प्रोडक्शन प्रोसेस, फिल्म अॅण्ड व्हिडीओ डिजिटल एडिटिंग, यूज ऑफ डिजिटल कॅमेरा, फिल्म अॅण्ड टीव्ही ग्राफिक्स, लाइट डिझाइन टेक्निक्स, मीडिया प्लॅनिंग, पोस्ट प्रोडक्शन टेक्निक्स आदी क्षेत्रांत काम करता येतं. टीव्ही प्रोडक्शनचं प्रशिक्षण घेतल्यावर स्वतंत्र प्रोड्युसर किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करता येतं. एखाद्या टीव्ही प्रोड्युसरकडे पर्सनल असिस्टण्ट म्हणून काम करण्याचा पर्यायही आहे. कोणत्याही कार्यक्रमाच्या टीव्ही प्रोड्युसरला त्या कार्यक्रमातील कलाकारांच्या येण्याजाण्यापासून कॉश्च्युम, एडिटिंग, शूटिंग, प्रॉपटीर्, बजेट प्लॅनिंग अशा सगळ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात. दूरदर्शन, झी, सोनी, एनडीटीव्ही, स्टार, ई टीव्ही अशा अनेक चॅनल्समध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, ऑन लाइन प्रोड्युसर, प्रोडक्शन डिझायनर अशा प्रकारच्या कामाच्या संधी उपलब्ध असतात. या चॅनल्सवरील संस्कृती, डान्स, कला, मनोरंजनात्मक अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची निमिर्ती करण्यासाठी प्रत्येक चॅनलला टीव्ही प्रोड्युसरची गरज असते. या क्षेत्रातील ज्ञानाबरोबरच टेक्निकल बाजूची माहिती असणाऱ्या प्रोफेशनल्सना बालाजी टीव्ही हाउससारख्या विविध प्रोडक्शन हाउसेसमध्ये असिस्टण्ट एडिटर, असिस्टण्ट साऊण्ड रेकॉडिर्स्ट, असिस्टण्ट कॅमेरामन म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. बीबीसी, सीएनबीसी, सीएनएन, डिस्कव्हरी, नॅशनल जीओग्राफीसारख्या इण्टरनॅशनल चॅनल्समध्येही नोकरीसाठी अर्ज करता येईल. फ्रेशर म्हणून कमीतकमी पाच हजार रुपये पगार तर हमखास मिळतो. तर अनुभवी व्यक्तींना २० हजार आणि त्याहून अधिक पगार मिळतो. काही संस्थांमध्ये या क्षेत्राचं परिपूर्ण प्रशिक्षण देणारे स्पेशलाइज्ड् कोसेर्स उपलब्ध आहेत (फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, पुणे). इथे तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स इन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन उपलब्ध आहे. तसंच एक वर्षाचा सटिर्फिकेट कोर्सही आहे. तर काही संस्थांमध्ये मास कम्युनिकेशन कोर्सच्या सिलॅबसमध्ये टीव्ही प्रोडक्शन हा एक भाग असतो. या कोर्समधून विद्यार्थ्यांना कॅमेरा, दिग्दर्शन, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी अशा विविध विषयांशी ओळख करून घेता येतेत. एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेण्टर, दिल्ली इथे दोन वर्षांचा एमए हा डिग्री कोर्स आहे. तर दिल्लीच्याच इंदप्रस्थ कॉलेजमध्ये बॅचलर मास मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन कोर्सचा एक भाग म्हणून या विषयाचं प्रशिक्षण देण्यात येतं. दिल्लीच्याच द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनने त्यांच्या पीजी डिप्लोमा इन रेडिओ अॅण्ड टीव्ही जर्नलिझम कोर्सचा एक भाग म्हणून नुकताच टीव्ही प्रोडक्शन हा विषय सुरू केला. काही प्रायव्हेट संस्थांमध्ये शॉर्ट टर्म प्रोग्राम्स उपलब्ध आहेत. काही संस्थांतफेर् या विषयाची ओळख करून देणारे सेमिनार्स आणि वर्कशॉप्सही घेतले जातात. स्कूल ऑफ ऑडिओ अॅण्ड इंजिनीअरिंग इथेही डिप्लोमा इन डिजिटल फिल्म मेकिंग, डिग्री इन फिल्म मेकिंग, सटिर्फिकेट कोर्स इन टेलिव्हिजन प्रोडक्शन हे कोसेर्स उपलब्ध आहे. या संस्थांमध्ये प्रवेश घेणं तितकंसं सोपं नसतं. संस्थांची मर्यादित संख्या आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या यामुळे इथली प्रवेश प्रक्रिया थोडी कठीण असते. यासाठी प्रथम लेखी परीक्षा पास व्हावं लागतं. ........ हे कोसेर्स उपलब्ध असणाऱ्या काही नामांकित संस्था : झेविअर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, सेण्ट झेविअर्स कॉलेज, महापालिका मार्ग, मुंबई ०१सत्यजीत रे फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकाता फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे मास कम्युनिकेशन रिसर्च सेण्टर, नवी दिल्ली मैसूर युनिव्हसिर्टी, मैसूर सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, पुणे स्कूल ऑफ ऑडिओ अॅण्ड इंजिनीअरिंग, अंधेरी/चेन्नई/नवी दिल्ली/बंगलोर.
Sunday, December 13, 2009
अखेरची कविता!
अखेरची कविता!:
कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांचा उद्या स्मृतिदिन. १४ डिसेंबर, १९७७ रोजी 'आधुनिक वाल्मिकी' असा गौरव झालेल्या गद
िमांचे अचानक देहावसान झाले. त्यांचे चिरंजीव शरत्कुमार यांनी गदिमा व त्यांचा काळ रेखाटणारे 'कळशीच्या तीर्थावर' हे पुस्तक लिहिले आहे. 'ब्लू बर्ड'ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील माडगूळकरांच्या अखेरच्या कवितेची ही हेलावून टाकणारी हकीकत.
रात्रीचे आठ वाजून गेलेले होते. टेलिफोनची बेल खणखणली. आपल्या दुखऱ्या छातीवर एक हात धरून पप्पांनी रिसीव्हर उचलला. मघापासून बाहेर येऊ पाहणारी खोकल्याची उबळ थोपवत त्यांनी रिसीव्हर कानाला लावला, ''हॅलो...!''
दुसरीकडून आवाज आला, ''हॅलो, स्वामी आहेत काय? मी पी. एल. (पु. ल. देशपांडे) बोलतोय.''
''बोला बोला! काय खबरबात?''
''तुमची तब्येत कशी काय? बरेच दिवसांत गाठभेट नाही.''
''आमच्या तब्येतीची रडकथा नेहेमीचीच आहे. नवीन काय काढलंत?''
''गेल्या महिन्यात बाबा आमट्यांची गाठ पडली होती. त्या उभयतांनी तुमची खूप आठवण काढली. म्हणाले, 'कविश्रींचे पाय अजून 'आनंदवना'ला लागले नाहीत. एकवार त्यांच्या येण्याचा योग घडवून आणा.' तिथं बाबा आणि साधनाताई यांनी एक 'आनंदमेळावा' योजला आहे.''
''त्या थोर पुरुषाचं आमंत्रण कशाला पाहिजे? माझी फार इच्छा आहे येण्याची. पण प्रकृतीनं इथं अगदी जायबंदीच करून ठेवलंय मला''
''बाबांनी तुमच्याकडं एक मागणी केलीय. 'आनंदमेळ्या'साठी त्यांना एक गाणं लिहून पाहिजेय तुमच्याकडून. तुमच्या वतीनं मी होकार देऊन बसलोय. मग कधी देताय?''
''पीएल्, माझी प्रकृती धडधाकट असती तर तुला मी फोनवरसुद्धा ओळी सांगितल्या असत्या. प्रयत्न करतो. त्या महात्म्याला नकार देणं महाकर्मकठीण.''
''उदईक सेवकास धाडतो लेखनाचा कागुद आणण्यासाठी.''
संभाषण संपलं. रात्रीत जागून पपांनी एक सुरेखसं गाणं लिहिलं. नव्या पिढीचं प्रतीक म्हणून 'बालतरूची पालखी' काढण्याची बाबांची अभिनव कल्पना पपांना इतकी आवडली की त्यांनी त्याला साजेसं गीत सहज लिहून हातावेगळं केलं. इतकंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी फोनवरच ते पी. एल्. देशपांड्यांना ऐकवलं. मुखडा ऐकताच पी. एल्.ची कळी खुलली. ते गाणं होतं नवागताच्या स्वागताचं :
'कोवळ्या रोपट्या, आज तू पाहुणा
भूषवी अंगणा येऊनिया।
माणसाची प्रीती घेई रे संगाती
मानाचा अतिथी आमुचा तू।
श्यामसुंदराच्या देहुड्या ढंगात
येइ या घरात आनंदाने।
आनंदाचा नाद मंजुळ संगीत
शाखापल्लवात घेऊनी ये।
कोवळ्या पानात तुझिया नवीन
सूर्याचे किरण नाचू देत।
वनाचा वल्लभ नाचताहे वारा
देई उपहारा गीताचा त्यां।
वर्षतो श्रावण आशिर्वाद त्याचा
मुकुट माथीचा होवो तुज।
इंदपुरीतून धारा वर्षताती
पडू दे त्या माथीं पानांवर।।'
पपांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं हे शेवटचंच गीत. या गाण्यासाठी त्यावेळी आग्रह धरणाऱ्या पी. एल्.ना मात्र या अदृष्टाची यत्किंचितही चाहूल नसावी. अवघ्या चार-पाच दिवसांनी असं काही घडेल आणि पपांचा अखेरचा निरोप घ्यावा लागेल, अशी पुसटशीही जाणीव त्यांना शिवलेली नसावी...

Sunday, November 1, 2009
लोकांचा लेखक
मराठी साहित्यविश्वातला छुपा चातुर्र्वण्य ज्यांना ठाऊक आहे, त्यांना बाबा कदम हा अस्सल कथा लिहिणारा लेखक मान्यते
च्या परिघाबाहेर कसा राहिला, याचे आश्चर्य वाटणार नाही. ते लोकप्रिय होते हा जणू त्यांचा गुन्हाच झाला. ते मुंबई-पुण्याच्या प्रस्थापित साहित्यिकांच्या कंपूत न वावरता दूर कोल्हापुरात राहून झपाटल्यासारखे लिखाण करत राहिले. रहस्यकथा, अपराध कथा, शिकार कथा, कोर्टरूम ड्रामा यांच्या अरण्यात रमले. साहित्यातले हे प्रांत तसे दुय्यम मानले जातात. तशात बाबांचे भरमसाठ लिहिणे म्हणजे श्रेष्ठतेच्या तथाकथित फूटपट्टीत उथळपणाचीच खूण मानली गेली. मानवी मनाचे विश्लेषण करण्याच्या फंदात न पडता ते माणसांच्या अर्तक्य वर्तनाचा, ते करण्यास भाग पाडणाऱ्या परिस्थितीचा, सामाजिक स्थितीचा वेध घेत राहिले. त्यांच्या लिखाणातला ग्रामीण ढंग, रांगडेपणा आणि बैजवार सांगण्याची तऱ्हा वाचकाला आवडली तरी साहित्यप्रांतातील टीकाकार आणि मान्यवर लेखक-प्रकाशकांना ती अदखलपात्र वाटली. पण एखाद्याने खरोखरच त्यांच्या कादंबऱ्यांचा नीट अभ्यास केला तर ज्यांना आपण मोठे लेखक मानले अशा कितीतरी लेखकांच्या लिखाणाहून त्यांचे लेखन मोठे होते, प्रत्ययकारक होते, याचा शोध लागेल. बाबा कदमांचे खरे नाव वीरसेन कदम. त्यांच्या थरारक कादंबऱ्या वाचतानाही हा कोणीतरी भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा माणूस असणार असा वाचकाचा समज होई. प्रत्यक्षात मात्र बाबा उंचीने छोटे आणि मिष्किल होते. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानात अधिकारपदावर होते. त्यामुळे संस्थानी वातावरण, खानदानी रिवाज यांचा त्यांना चांगलाच परिचय होता. तरीही ते स्वत: रमले ते सामान्य माणसांच्या गोष्टींमध्ये. बी.ए., एलएल.बी. झाल्यावर त्यांनी फौजदारी वकील हा पेशा स्वीकारला. पुढे ते सरकारी वकील झाले. ३१ वषेर् त्यांनी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम केले. हे करताना कौटुंबिक कलह, दुश्मनी, इस्टेटीची भांडणे, खून-मारामाऱ्या ह्यापोटी कज्जेदलालीच्या फेऱ्यात अडकलेल्या लोकांशी त्यांचा संपर्क येऊ लागला. मानवी स्वभावाचे अजबगजब नमुने त्यांना पाहायला मिळाले. त्यांना भेटणाऱ्या माणसांमध्ये आणि त्यांना अडकवणाऱ्या परिस्थितीमध्ये त्यांना कादंबऱ्यांची बिजे सापडू लागली. ही माणसे गावरान होती, रांगडी होती, भाबडी होती, निष्पाप होती, चालबाज आणि धोकादायकही होती. बाबांची दुसऱ्याशी संवाद साधण्याची हातोटी विलक्षण. त्यांनी या माणसांच्या कहाण्या जाणून घेतल्या. ती जिथे बोलत नसत त्या मधल्या नि:शब्द जागांमधले अर्थही बाबा ताडत असत. अशा सत्य घटनेवर आधारलेल्या सुमारे नव्वद कादंबऱ्या बाबा कदमांनी लिहिल्या. त्यांनी गुन्हा आणि गुन्हेगार यात फरक केला आणि गुन्हेगाराकडेही आत्मीयतेने पाहिले, ही त्यांच्या लेखकपणाची वेगळी खूण. ते शिकारीचे नादी. या नादापायी त्यांनी कोल्हापुरातली जंगले पालथी घातली. थरार केवळ कल्पनेने कागदावर उतरवला नाही तर स्वत: अंतर्बाह्य अनुभवला. डोंगरची मैना, भालू, जोतिबाचा नवस, अजिंक्य, बदला, ज्वालामुखी, सन्ना, इस्टेट मॅनेजर, पद्मजा अशी नावे असलेल्या त्यांच्या कादंबऱ्यांवर वाचकांच्या उड्या पडत असत. त्यांच्या एकेका कादंबरीच्या आठ आठ आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांनी असंख्य वाचनालये समृद्ध झालेली आहेत. परंतु एवढी प्रचंड लोकप्रियता लाभूनही बाबांना अहंकाराचा वारा लागला नाही. ते कायम ऋजु राहिले. औरंगाबाद येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात बाबा कदमांची प्रकट मुलाखत ठेवण्यात आली होती. बाबांच्या गप्पीष्ट स्वभावाची प्रचीती यावेळी आली. त्यांची साहित्यविषयक धारणा, लेखकीय वेगळेपण आणि जीवनदृष्टी जाणून घेण्यासाठी सरसावून बसलेल्या मुलाखतकारांच्या प्रश्ानंना चक्क बाजूला ठेवून ते एका सत्यघटनेचे कथन असे काही रंगून जाऊन करू लागले की त्यांनी त्या दीड तासात एक अख्खी कादंबरीच उलगडली. त्यांना प्रश्ान् विचारणारे आणि मंडपात बसलेले श्रोते त्यांच्या रसाळ कथनात बघता बघता हरवून गेले. साहित्य संमेलन आणि बाबांचा एवढाच संबंध

च्या परिघाबाहेर कसा राहिला, याचे आश्चर्य वाटणार नाही. ते लोकप्रिय होते हा जणू त्यांचा गुन्हाच झाला. ते मुंबई-पुण्याच्या प्रस्थापित साहित्यिकांच्या कंपूत न वावरता दूर कोल्हापुरात राहून झपाटल्यासारखे लिखाण करत राहिले. रहस्यकथा, अपराध कथा, शिकार कथा, कोर्टरूम ड्रामा यांच्या अरण्यात रमले. साहित्यातले हे प्रांत तसे दुय्यम मानले जातात. तशात बाबांचे भरमसाठ लिहिणे म्हणजे श्रेष्ठतेच्या तथाकथित फूटपट्टीत उथळपणाचीच खूण मानली गेली. मानवी मनाचे विश्लेषण करण्याच्या फंदात न पडता ते माणसांच्या अर्तक्य वर्तनाचा, ते करण्यास भाग पाडणाऱ्या परिस्थितीचा, सामाजिक स्थितीचा वेध घेत राहिले. त्यांच्या लिखाणातला ग्रामीण ढंग, रांगडेपणा आणि बैजवार सांगण्याची तऱ्हा वाचकाला आवडली तरी साहित्यप्रांतातील टीकाकार आणि मान्यवर लेखक-प्रकाशकांना ती अदखलपात्र वाटली. पण एखाद्याने खरोखरच त्यांच्या कादंबऱ्यांचा नीट अभ्यास केला तर ज्यांना आपण मोठे लेखक मानले अशा कितीतरी लेखकांच्या लिखाणाहून त्यांचे लेखन मोठे होते, प्रत्ययकारक होते, याचा शोध लागेल. बाबा कदमांचे खरे नाव वीरसेन कदम. त्यांच्या थरारक कादंबऱ्या वाचतानाही हा कोणीतरी भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा माणूस असणार असा वाचकाचा समज होई. प्रत्यक्षात मात्र बाबा उंचीने छोटे आणि मिष्किल होते. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानात अधिकारपदावर होते. त्यामुळे संस्थानी वातावरण, खानदानी रिवाज यांचा त्यांना चांगलाच परिचय होता. तरीही ते स्वत: रमले ते सामान्य माणसांच्या गोष्टींमध्ये. बी.ए., एलएल.बी. झाल्यावर त्यांनी फौजदारी वकील हा पेशा स्वीकारला. पुढे ते सरकारी वकील झाले. ३१ वषेर् त्यांनी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम केले. हे करताना कौटुंबिक कलह, दुश्मनी, इस्टेटीची भांडणे, खून-मारामाऱ्या ह्यापोटी कज्जेदलालीच्या फेऱ्यात अडकलेल्या लोकांशी त्यांचा संपर्क येऊ लागला. मानवी स्वभावाचे अजबगजब नमुने त्यांना पाहायला मिळाले. त्यांना भेटणाऱ्या माणसांमध्ये आणि त्यांना अडकवणाऱ्या परिस्थितीमध्ये त्यांना कादंबऱ्यांची बिजे सापडू लागली. ही माणसे गावरान होती, रांगडी होती, भाबडी होती, निष्पाप होती, चालबाज आणि धोकादायकही होती. बाबांची दुसऱ्याशी संवाद साधण्याची हातोटी विलक्षण. त्यांनी या माणसांच्या कहाण्या जाणून घेतल्या. ती जिथे बोलत नसत त्या मधल्या नि:शब्द जागांमधले अर्थही बाबा ताडत असत. अशा सत्य घटनेवर आधारलेल्या सुमारे नव्वद कादंबऱ्या बाबा कदमांनी लिहिल्या. त्यांनी गुन्हा आणि गुन्हेगार यात फरक केला आणि गुन्हेगाराकडेही आत्मीयतेने पाहिले, ही त्यांच्या लेखकपणाची वेगळी खूण. ते शिकारीचे नादी. या नादापायी त्यांनी कोल्हापुरातली जंगले पालथी घातली. थरार केवळ कल्पनेने कागदावर उतरवला नाही तर स्वत: अंतर्बाह्य अनुभवला. डोंगरची मैना, भालू, जोतिबाचा नवस, अजिंक्य, बदला, ज्वालामुखी, सन्ना, इस्टेट मॅनेजर, पद्मजा अशी नावे असलेल्या त्यांच्या कादंबऱ्यांवर वाचकांच्या उड्या पडत असत. त्यांच्या एकेका कादंबरीच्या आठ आठ आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांनी असंख्य वाचनालये समृद्ध झालेली आहेत. परंतु एवढी प्रचंड लोकप्रियता लाभूनही बाबांना अहंकाराचा वारा लागला नाही. ते कायम ऋजु राहिले. औरंगाबाद येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात बाबा कदमांची प्रकट मुलाखत ठेवण्यात आली होती. बाबांच्या गप्पीष्ट स्वभावाची प्रचीती यावेळी आली. त्यांची साहित्यविषयक धारणा, लेखकीय वेगळेपण आणि जीवनदृष्टी जाणून घेण्यासाठी सरसावून बसलेल्या मुलाखतकारांच्या प्रश्ानंना चक्क बाजूला ठेवून ते एका सत्यघटनेचे कथन असे काही रंगून जाऊन करू लागले की त्यांनी त्या दीड तासात एक अख्खी कादंबरीच उलगडली. त्यांना प्रश्ान् विचारणारे आणि मंडपात बसलेले श्रोते त्यांच्या रसाळ कथनात बघता बघता हरवून गेले. साहित्य संमेलन आणि बाबांचा एवढाच संबंध.

Sunday, October 25, 2009
तमाशा फडातला वगसम्राट
चंद्रकांत ढवळपुरीकरांनी तमाशात दोन पिढ्या घडविल्या. विठाबाई, कांताबाईंचा ते आदर्श होतेच; पण लता पुणेकर, सुरेखा पुणेकर, रघुवीर खेडकर आणि किरण ढवळपुरीकर या तरुण तमासगीरांनीही भाऊंकडून तमाशा कलेचे धडे घेतले.चंद्रकांत ढवळपुरीकर हे तमाशा क्षेत्रातील अनुभवी आणि बुजुर्ग नाव होते. वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर या नावाने गेली पन्नास वर्षे तमाशा फड गाजविला. आपल्या करारी भारदस्त आवाजाने आणि दमदार अभिनयाने त्यांनी तमाशातल्या वगाला कलात्मक दर्जा मिळवून दिला. चंद्रकांत भाऊंनी साकारलेला "अब्जलखान' अजूनही यापुढे कितीतरी काळ तमाशा रसिकांच्या स्मरणात राहील, यात शंका नाही. वगात खलनायकाची भूमिका करावी ती चंद्रकांत ढवळपुरीकरांनीच. सत्तर ते नव्वद या दशकात एकीकडे विठाबाई, कांताबाई आणि रोशनबाई यांच्या लावणीच्या दिलखेच अदांवर आणि त्यांच्या नशिल्या जवानीवर उभा महाराष्ट्र घायाळ होत होता, अशा काळात चंद्रकांत ढवळपुरीकर या तमासगिराने आपल्या दमदार अभिनयाने तमाशाच्या प्रेषकाला वगाची गोडी लावली. पारंपरिक तमाशाला आधुनिक चेहरा देऊन त्यातील नाट्य अधिक प्रगल्भ केले.अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या गावात १९३२ मध्ये या कलावंताचा जन्म झाला. १९५० ते २००० ही ५० वर्षे त्यांनी तमाशा कलेतून समाजप्रबोधन केले. सुरवातीला विष्णू बुवा बांगर यांच्या तमाशात ढवळपुरीकरांनी नाच्याची भूमिका करून आपल्या तमाशा सेवेची नांदी उभी केली. १९५० नंतर तुकाराम खेडकर यांच्याबरोबरीने काम करत ढवळपुरीकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाले. पुढे १९६४ नंतर त्यांनी दत्ता महाडीक पुणेकर यांच्या साथीने तमाशा फड काढला आणि यानंतर मात्र हा बहुआयामी तमासगीर स्वतंत्रपणे आपला तमाशा फड घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकरंजनासाठी फिरत राहिला.तमाशात नाच्या, सोंगाड्या, अभिनय सम्राट, मॅनेजर व तमाशाचा मालक अशा कितीतरी जबाबदाऱ्या झेलत झेलत ढवळपुरीकर लोककलेचा पारंपरिक व कलात्मक बाज तसाच ठेवून तमाशाला प्रबोधनाच्या वाटेवर आणू पाहत होते. ढवळपुरीकरांचा तमाशा का पहायचा? तर तो त्यांच्या वगामुळे, असे आजही बोलले जाते. "संत तुकाराम', "भक्त पुंडलिक', "चित्ता फाडला जावळीचा', "महाराष्ट्र झुकत नाही' हे चंद्रकांत ढवळपुरीकरांचे खास गाजलेले वग होते. या वगांतील गणोजी शिर्के, चंद्रराव मोरे, मंबाजी, आबाजी पाटील या व्यक्तिरेखांतून त्यांनी तमाशाशौकिनांना अक्षरशः वेड लावले. त्यांचा "महाराष्ट्र झुकत नाही' हा वग तर इराण, जर्मनी आणि अमेरिकेतील लोककलांच्या अभ्यासकांचा अभ्यासविषय बनला. तमाशा क्षेत्रात प्रचंड प्रसिद्धी आणि मान-सन्मान लाभलेला हा हाडाचा कलावंत होता. त्यांना महाराष्ट्र सरकारने कला पुरस्कार देऊन गौरविलेच, पण मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणचे अनेक नावाजलेले पुरस्कारही त्यांना मिळाले. प्रवरानगर येथील प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पद्मश्री विखे पाटील पुरस्कारानेही हा कलावंत सन्मानित झाला. असे मानसन्मान आणि पुरस्कार मिळूनही त्यांची नजर तमाशाच्या फडाबाहेर गेली नाही. नाटक, चित्रपटाच्या आमिषाला न भुलता ते लोकनाट्याला नवा बाज देण्यात रममाण झाले.चंद्रकांत ढवळपुरीकरांनी तमाशात दोन पिढ्या घडविल्या. विठाबाई, कांताबाईंचा ते आदर्श होतेच; पण लता पुणेकर, सुरेखा पुणेकर, रघुवीर खेडकर आणि किरण ढवळपुरीकर या तरुण तमासगीरांनीही भाऊंकडून तमाशा कलेचे धडे घेतले. तमाशाच्या अनेक देशी-परदेशी अभ्यासकांचे भाऊ केंद्र होते. तमाशाचे सारे रस्ते याच आधारवडावर येऊन थांबत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संयत व संयमी होते. शुद्ध वाणी, वाणीतला स्पष्ट आणि ओजस्वी भाव भाऊंना भेटणाऱ्या प्रत्येकावर मोहिनी टाकायचा. व्यक्तिगत जीवनात अत्यंत प्रेमळ माणूस म्हणून त्यांची ख्याती होती; पण तमाशात मात्र भाऊंनी खलनायकी पात्रांना साकारले. या अर्थाने भाऊंच्या समोर निळू फुले यांचा आदर्श होता. तमाशाबद्दल बोलताना ते आवर्जून अण्णा भाऊ साठेंचा उल्लेख करत. अण्णा भाऊंना अपेक्षित असलेले लोकनाट्य अजूनही का साकारत नाही, ही त्यांची खंत होती.तमाशात रात्रीचा राजा दिवसा मात्र भिकारी असतो. महाराष्ट्रातल्या साऱ्याच लोककलांची ही शोकांतिका आहे. चंद्रकांत भाऊ याला अपवाद नव्हते. अत्यंत शिस्तबद्धपणे तमाशा चालवूनही तमाशाचा मालक कर्जाच्या खाईत ढकलला जातोच. याला कारण तमाशा कॅन्सरसारखी शिरलेली सावकारशाही आणि शासनाची उदासीनता आहे, असे ते सातत्याने सांगत.आजचा तमाशा बदलला, त्याचा ऑर्केस्ट्रा झाला. नाटक आणि चित्रपटाचे तो अतिरेकी अनुकरण करायला लागला, तमाशाच्या प्रेक्षक बदलला, त्यांची अभिरुची बदलली, कला म्हणून तमाशा किती उरला आणि व्यवसाय म्हणून तो नेमका कुठे चालला आहे, असे प्रश्न तमाशासमोर आहेतच, याशिवाय तमासगिरांचे दारिद्य्र, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न, त्यांच्या मुलांचे शिक्षण असे असंख्य प्रश्न तमाशा कलेसमोर उभे असताना तमाशा क्षेत्रातला चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्यासारखा मार्गदर्शक फड सोडून जावा, ही तमाशा कलेच्या दृष्टीने अत्यंत शोकात्म घटना आहे.जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून माणसाचे जीवन आमूलाग्र बदलणार, हे वास्तव आहे. सांस्कृतिक क्षेत्रावर या आधुनिक व आर्थिक बदलांचा निश्चितपणे परिणाम होत आहे. आज जगभरातल्या लोककला संपुष्टात येऊ पाहत असताना तमाशाकडून पारंपरिक अपेक्षा करून चालणार नाही, हेही वास्तव आहे; पण महाराष्ट्रातील तमाशा ही लोककला कला म्हणून संपत चालली आणि व्यवसाय म्हणून अधिकाधिक शृंगारिक बनली, याची सामाजिक आणि सांस्कृतिक कारणमीमांसा करण्याची ही निश्चित वेळ आहे. एकीकडे लोकसाहित्य व लोककलांच्या अभ्यासात तमाशाचा समाजशास्त्रीय अभ्यास झाला नाही आणि जो झाला तो विद्यापीठांच्या एम.फिल. व पीएच.डी. या पदव्यांपर्यंत मर्यादित राहिला. दुसरीकडे शासनाने व सांस्कृतिक कलांचा अभ्यास करणाऱ्या संस्थांनी तमाशा कलेचा विकास होईल, तमाशा कलावंतांना सामाजिक न्याय मिळेल, अशी धोरणात्मक अंमलबजावणी कधीच केली नाही आणि तिसरीकडे शिक्षण, व्यसन, दारिद्य्र आणि नैतिक शिस्तीच्या अभावी तमासगीर केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरत राहिला. तमाशातील जातिव्यवस्था पाहिली तर अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. ""महाराघरी गाणं, मांगाघरी वाजवणं आणि ब्राह्मणाघरी लिव्हनं'' हे म्हणणे तमाशाला तंतोतंत लागू पडते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला ब्रोकन मॅन (पाठीचा कणा मोडलेला माणूस) तमाशा कलेत पावलोपावली दिसतो आहे. या ब्रोकन मॅनचा विचार झाला नाही तर दिवसागणिक लावण्यांचे शृंगारिक नाद सजतील, कला केंद्र उत्तररात्री फुलतील, डान्स बार पुन्हा उघडतील आणि चंद्रकांत ढवळपुरीकरांसारखे तमाशातले असंख्य कलावंत दारिद्य्र व लाचारीचे जिणे जगत जगत जगाचा निरोप घेतील, ही पुरोगामी महाराष्ट्राची सांस्कृतिक शोकांतिका आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातला पाटील बाई नाचवणे हे प्रतिष्ठेचे मानत राहील, तोपर्यंत तमाशा ही कला केवळ शृंगाराचा अड्डाच राहील, हे वेगळे सांगायला नको. चंद्रकांत ढवळपुरीकर हा कलावंत या साऱ्या गोष्टींच्या विरोधी होता. "कला म्हणून तमाशाला जपा,' हा ढवळपुरीकरांनी नव्या तमाशा कलावंतांना दिलेला संदेश आज शासनाने, तमाशाच्या अभ्यासकांनी, कलावंतांनी, प्रेक्षकांनी आणि तमाशाचा विकास करू पाहणाऱ्या प्रत्येकाने लक्षात घेतला, तर या "वगसम्राटा'ला खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.
Friday, October 23, 2009
राज्यातील विजयी उमेदवार 10/2009
नंदूरबार - १ - अक्कलकुवा (अनुसूचित जमाती) - ऍड. के. सी. पाडवी (कॉंग्रेस)२ - शहादा (अनुसूचित जमाती) - पद्माकर वळवी (कॉंग्रेस) ३ - नंदूरबार (अनुसूचित जमाती) - विजयकुमार गावीत (राष्ट्रवादी कॉंग्रेस)४ - नवापूर (अनुसूचित जमाती) - शरद गावीत (समाजवादी पक्ष)धुळे - ५ - साक्री (अनुसूचित जमाती) - योगेंद्र भोये (कॉंग्रेस)६ - धुळे ग्रामीण - प्रा. शरद पाटील (शिवसेना)७ - धुळे शहर - अनिल गोटे (लोकसंग्राम)८ - सिंदखेडा - जयकुमारभाऊ रावळ (भाजप)९ - शिरपूर (अनुसूचित जमाती) - काशिनाथ पावरा (कॉंग्रेस)जळगाव -१० - चोपडा (अनुसूचित जमाती) - जगदीशचंद्र वाळवी (राष्ट्रवादी कॉंग्रेस)११ - रावेर - शिरीष चौधरी (अपक्ष)१२ - भुसावळ (अनुसूचित जाती) - संजय सावकारे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१३ - जळगाव शहर - सुरेशकुमार जैन (शिवसेना)१४ - जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) १५ - अमळनेर - कृषिभूषण पाटील (अपक्ष)१६ - एरंडोल - चिमणराव पाटील (शिवसेना)१७ - चाळीसगाव - राजीव देशमुख (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१८ - पाचोरा - दिलीप वाघ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९ - जामनेर - गिरीश महाजन (भाजप)२० - मुक्ताईनगर - एकनाथ खडसे (भाजप)बुलडाणा - २१ - मलकापूर - चैनसुख संचेती (भाजप)२२ - बुलडाणा - विजयराज शिंदे (शिवसेना)२३ - चिखली - राहुल बोंद्रे (कॉंग्रेस)२४ - सिंदखेडराजा - डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२५ - मेहकर (अनुसुचित जाती) - संजय राजमूलकर (शिवसेना)२६ - खामगाव - गोकुळचंद सानंदा (कॉंग्रेस)२७ - जळगाव (जमोद) - डॉ. संजय कुटे (भाजप)अकोला -२८ - अकोट - संजय गवांडे (शिवसेना)२९ - बालापूर - बळीराम शिरसकर (अपक्ष)३० - अकोला पश्चिम - गोवर्धन शर्मा (भाजप)३१ - अकोला पूर्व - हरिदास भाडे (भारीप बहुजन महासंघ)३२ - मूर्तिजापूर - हरिश पिंपळे (भाजप)वाशिम - ३३ - रिसोड - सुभाषराव झनक (कॉंग्रेस)३४ - वाशिम (अनुसूचित जाती) - लखन मलीक (भाजप)३५ - कारंजा - प्रशांत डहाके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)अमरावती -३६ - धामणगाव - वीरेंद्र जगताप (कॉंग्रेस)३७ - बडनेरा - रवी राणा (अपक्ष)३८ - अमरावती - रावसाहेब शेखावत (कॉंग्रेस)३९ - तिवसा - ऍड. यशोमती ठाकूर (कॉंग्रेस) ४० - दर्यापूर (अनुसूचित जाती) - अभिजीत अडसूळ (शिवसेना)४१ - मेळघाट - केवळराम काळे (कॉंग्रेस)४२ - अचलपूर - ओमप्रकाश कडू (अपक्ष)४३ - मोर्शी - डॉ. अनिल बोंडे (अपक्ष)वर्धा -४४ - अर्वी - दादाराव केचे (भाजप)४५ - देवळी - रणजित कांबळे (कॉंग्रेस)४६ - हिंगणघाट - अशोक शिंदे (शिवसेना)४७ - वर्धा - सुरेश देशमुख (अपक्ष)नागपूर -४८ - काटोल - अनिल देशमुख (राष्ट्रवादी कॉंग्रेस) ४९ - सावनेर - सुनील केदार (कॉंग्रेस)५० - हिंगणा - विजयभाऊ घोडमारे (भाजप)५१ - उमरखेड (अनुसूचित जाती) - विजय खडसे (कॉंग्रेस)५२ - नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस (भाजप)५३ - नागपूर दक्षिण - दिनानाथ पडोळे (कॉंग्रेस)५४ - नागपूर पूर्व - कृष्णा खोपडे (भाजप)५५ - नागपूर मध्य - विकास कुंभारे (भाजप)५६ - नागपूर पश्चिम - सुधाकर देशमुख (भाजप)५७ - नागपूर उत्तर (अनुसूचित जाती) - डॉ. नितीन राऊत (कॉंग्रेस)५८ - कांपटी - चंद्रशेखर बावनकुले (भाजप) ५९ - रामटेक - आशिष जैस्वाल (शिवसेना)भंडारा -६० - तुमसर - अनिल बावणकर (कॉंग्रेस)६१ - भंडारा - नरेंद्र भोंडेकर (कॉंग्रेस)६२ - साकोली -नानाभाऊ पाटोले (भाजप)गोंदिया - ६३ - अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोळे (भाजप)६४ - तिरोरा - कुशाल बोपाचे (भाजप)६५ - गोंदिया - गोपालदास अगरवाल (कॉंग्रेस)६६ - आमगाव (अनुसूचित जमाती) - रामरतनबापू राऊत (कॉंग्रेस)गडचिरोली -६७ - आरमोरी (अनुसूचित जमाती) - आनंदराव गेडाम (कॉंग्रेस)६८ - गडचिरोली (अनुसूचित जमाती) - डॉ. डल्लुजी नामदेव (कॉंग्रेस)६९ - अहेरी (अनुसूचित जमाती) - दिपक अत्राम (अपक्ष)चंद्रपूर -७० - राजूरा - सुभाष धोटे (कॉंग्रेस)७१ - चंद्रपूर (अनुसूचित जाती) - नानाजी शामकुळे (भाजप)७२ - बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार (भाजप)७३ - ब्रह्मपूरी - अतूल देशकर (भाजप) ७४ - चिमुर - विजय वडेट्टीवार (कॉंग्रेस)७५ - वरोरा - संजय देवतळे (कॉंग्रेस)यवतमाळ -७६ - वणी - वामनराव कासावकर (कॉंग्रेस)७७ - राळेगाव (अनुसूचित जाती) - प्रा. वसंत पुरके (कॉंग्रेस)७८ - यवतमाळ - निलेश पावरेकर (कॉंग्रेस)७९ - दिग्रस - संजय राठोड (शिवसेना) ८० - अरणी - शिवाजीराव मोघे (कॉंग्रेस)८१ - पुसाद - मनोहर नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)८२ - उमरखेड - विजयराव खडसे (कॉंग्रेस)नांदेड -८३ - किनवट - प्रदीप नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) ८४ - हडगाव - माधवराव पवार (कॉंग्रेस)८५ - भोकर - अशोक चव्हाण (कॉंग्रेस)८६ - नांदेड उत्तर - डी. पी. सावंत (कॉंग्रेस)८७ - नांदेड दक्षिण - ओमप्रकाश पोखरणा (कॉंग्रेस)८८ - लोहा - शंकर धोंडगे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)८९ - नायगाव - वसंतराव चव्हाण (अपक्ष)९० - देगलूर (अनुसूचित जाती) - रावसाहेब अंतापूरकर (कॉंग्रेस)९१ - मुखेड - हनुमंत पाटील (कॉंग्रेस)हिंगोली -९२ - वसमत - जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)९३ - कळमनुरी - राजीव सातव (कॉंग्रेस)९४ - हिंगोली - भाऊराव पाटील गोरेगावकर (कॉंग्रेस)परभणी -९५ - जिंतूर - रामप्रसाद कदम (कॉंग्रेस)९६ - परभणी - संजय जाधव (शिवसेना)९७ - गंगाखेड - सीताराम घनदाट (अपक्ष)९८ - पाथरी - मीरा रेंगे (शिवसेना)जालना - ९९ - परतूर - सुरेशकुमार जेठलिया (अपक्ष)१०० - घनसावंगी - राजेश टोपे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१०१ - जालना - कैलास गोरंट्याल (कॉंग्रेस)१०२ - बदनापूर (अनुसूचित जाती) - संतोष सांबरे (शिवसेना)१०३ - भोकरदन - चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१०४ - सिल्लोड - अब्दुल सत्तार अब्दुल नाबी (कॉंग्रेस)औरंगाबाद - १०५ - कन्नड - हर्षवर्धन जाधव (मनसे)१०६ - फुलंब्री - डॉ. कल्याण काळे (कॉंग्रेस)१०७ - औरंगाबाद मध्य - प्रदीप जैस्वाल (अपक्ष)१०८ - औरंगाबाद पश्चिम (अनुसूचित जाती) - संजय शिरसाट (शिवसेना)१०९ - औरंगाबाद पूर्व - राजेंद्र दर्डा (कॉंग्रेस) ११० - पैठण - संजय वाघचौरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१११ - गंगापूर - प्रशांत बंब (अपक्ष)११२ - वैजापूर - आर. एम. वाणी (शिवसेना)नाशिक - ११३ - नांदगाव - पंकज भुजबळ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)११४ - मालेगाव मध्य - मुफ्ती मोहम्मद ईस्माइल ए. खलीक (जनसुराज्य शक्ती) ११५ - मालेगाव बाह्य - दादा भौसे (शिवसेना)११६ - बागलान (अनुसूचित जमाती) - उमाजी बोरसे (भाजप)११७ - कळवण - अर्जुन पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस)११८ - चांदवड - शिरीष कोतवाल (अपक्ष)११९ - येवला - छगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१२० - सिन्नर - माणिकराव कोकाटे (कॉंग्रेस)१२१ - निफाड - अनिल कदम (शिवसेना)१२२ - दिंडोरी (अनुसूचित जमाती) - धनराज महाले (शिवसेना)१२३ - नाशिक पूर्व - ऍड. उत्तमराव ढेकले (मनसे) १२४ - नाशिक मध्य - वसंतराव गीते (मनसे)१२५ - नाशिक पश्चिम - नितीन भोसले (मनसे)१२६ - देवळाली (अनुसूचित जाती) - बबनराव घोलप (शिवसेना)१२७ - इगतपूरी (अनुसूचित जाती) - निर्मला गावीत (कॉंग्रेस)ठाणे -१२८ - डहाणू (अनुसूचित जाती) - राजाराम ओझारे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया)१२९ - विक्रमगड (अनुसूचित जाती) - ऍड. चिंतामणराव वांगा (भाजप)१३० - पालघर (अनुसूचित जमाती) - राजेंद्र गावीत (कॉंग्रेस)१३१ - बोईसर - विलास तारे (बहुजन विकास आघाडी)१३२ - नालासोपारा - क्षितीजी ठाकूर (बहुजन विकास आघाडी)१३३ - वसई - विवेक पंडीत (अपक्ष)१३४ - भिवंडी ग्रामीण (अनुसूचित जमाती) - विष्णु सावरा (भाजप)१३५ - शहापूर (अनुसूचित जमाती) - दौलत दरोडा (शिवसेना) १३६ - भिवंडी पश्चिम - अब्दुल रशिद ताहीर मोमीन (समाजवादी पक्ष)१३७ - भिवंडी पूर्व - अबु आझमी (समाजवादी पक्ष) १३८ - कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर (मनसे)१३९ - मुरबाड - किसन काठोरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१४० - अंबरनाथ (अनुसूचित जाती) - डॉ. बालाजी कीणीकर (शिवसेना)१४१ - उल्हासनगर - उत्तमचंद कुमार (भाजप)१४२ - कल्याण पूर्व - गणपत गायकवाड (अपक्ष)१४३ - डोंबिवली - रवींद्र चव्हाण (भाजप)१४४ - कल्याण ग्रामीण - रमेश पाटील (मनसे)१४५ - मिरा भाईंदर - गिल्बर्ट मेंडोका (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१४६ - ओव्हळा माजीवाडा - प्रताप सरनाईक (शिवसेना)१४७ - कोपरी पंचपाखडी - एकनाथ शिंदे (शिवसेना)१४८ - ठाणे - राजन विचारे (शिवसेना)१४९ - मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१५० - ऐरोली - संदीप नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१५१ - बेलापूर - गणेश नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)मुंबई उपनगर -१५२ - बोरिवली - गोपाळ शेट्टी (भाजप)१५३ - दहिसर - विनोद घोसाळकर (शिवसेना)१५४ - मागठाणे - प्रवीण दरेकर (मनसे)१५५ - मुलुंड - सरदार तारासिंग (भाजप)१५६ - विक्रोळी - मंगेश सांगळे (मनसे) १५७ - भांडुप पश्चिम - शिशिर शिंदे (मनसे)१५८ - जोगेश्वरी पूर्व - रवींद्र वाईकर (शिवसेना)१५९ - दिंडोशी - राजहंस सिंग (कॉंग्रेस)१६० - कांदिवली पूर्व - रमेश ठाकूर (कॉंग्रेस)१६१ - चारकोप - योगेश सागर (भाजप)१६२ - मालाड पश्चिम - अस्लम शेख (कॉंग्रेस)१६३ - गोरेगाव - सुभाष देसाई (शिवसेना)१६४ - वर्सोवा - बाळदेव खोसा (कॉंग्रेस)१६५ - अंधेरी पश्चिम - अशोक जाधव (कॉंग्रेस) १६६ - अंधेरी पूर्व - सुरेश शेट्टी (कॉंग्रेस)१६७ - विलेपार्ले - कृष्णा हेडगे (कॉंग्रेस)१६८ - चांदिवली - खान मोहम्मद आरीफ (कॉंग्रेस)१६९ - घाटकोपर पश्चिम - राम कदम (मनसे)१७० - घाटकोपर पूर्व - प्रकाश मेहता (भाजप)१७१ - मानखुर्द - अबू आझमी (समाजवादी पक्ष)१७२ - अणुशक्तीनगर - नवाब मलीक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) १७३ - चेंबूर - चंद्रकांत हंडोरे (कॉंग्रेस)१७४ - कुर्ला - मिलिंद कांबळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१७५ - कलिना - कृपाशंकर सिंग (कॉंग्रेस)१७६ - बांद्रा पूर्व - प्रकाश सावंत (शिवसेना)१७७ - ब्रा पश्चिम - बाबा सिद्दीकी (कॉंग्रेस)मुंबई शहर -१७८ - धारावी (अनुसूचित जमाती) - वर्षा गायकवाड (कॉंग्रेस)१७९ - सायन कोळीवाडा - जगन्नाथ शेट्टी (कॉंग्रेस)१८० - वडाळा - कालीदास कोळंबकर (कॉंग्रेस)१८१ - माहिम - नितीन सरदेसाई (मनसे)१८२ - वरळी - सचिन अहीर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१८३ - शिवडी - बाळा नांदगावकर (मनसे)१८४ - भायखळा - मधुकर चव्हाण (कॉंग्रेस)१८५ - मालबा हिल - मंगल लोढा (भाजप)१८६ - मुंबादेवी - अमीन पटेल (कॉंग्रेस)१८७ - कुलाबा - अनी शेखर (कॉंग्रेस)रायगड -१८८ - पनवेल - प्रशांत ठाकूर (कॉंग्रेस) १८९ - कर्जत - सुरेशभाऊ ला (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९० - उरण - विवेकानंद पाटील (शेतकरी कामगार पक्ष)१९१ - पेण - धैर्यशील पाटील (शेतकरी कामगार पक्ष)१९२ - अलिबाग - मिनाक्षी पाटील (शेतकरी कामगार पक्ष)१९३ - श्रीवर्धन - सुनील तटकरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९४ - महाड - भरतशेठ गोगावले (शिवसेना)पुणे -१९५ - जुन्नर - वल्लभ बेनके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९६ - आंबेगाव - दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९७ - खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९८ - शिरूर - अशोक पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस)१९९ - दौंड - रमेश थोरात (अपक्ष)२०० - इंदापूर - हर्षवर्धन पाटील (कॉंग्रेस)२०१ - बारामती - अजित पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २०२ - पुरंदर - विजय शिवतारे (शिवसेना)२०३ - भोर - संग्राम थोपटे (कॉंग्रेस)२०४ - मावळ - बाळा भेगडे (भाजप) २०५ - चिंचवड - लक्ष्मण जगताप (अपक्ष)२०६ - पंपरी - अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२०७ - भोसरी - विलास लांडे (अपक्ष)२०८ - वडगाव शेरी - बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २०९ - शिवाजीनगर - विनायक निम्हण (कॉंग्रेस) २१० - कोथरूड - चंद्रकांत मोकाटे (शिवसेना)२११ - खकवासला - रमेश वांजळे (मनसे)२१२ - पर्वती - माधुरी मिसाळ (भाजप) २१३ - हडपसर - महादेव बाबर (शिवसेना)२१४ - पुणे कॅन्टोन्मेंट - रमेश बागवे (कॉंग्रेस)२१५ - कसबा पेठ - गिरीश बापट (भाजप)अहमदनगर -२१६ - अकोले (अनुसूचित जमाती) - मधुकर पिचड (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२१७ - संगमनेर - बाळासाहेब थोरात (कॉंग्रेस)२१८ - शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (कॉंग्रेस)२१९ - कोपरगाव - अशोक काळे (शिवसेना)२२० - श्रीरामपूर - भाऊसाहेब कांबळे (कॉंग्रेस)२२१ - नेवासा - शंकरराव गडाख (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२२२ - शेवगाव पाथर्डी - चंद्रशेखर घुले (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २२३ - राहुरी - शिवाजीराव कर्डीले (भाजप)२२४ - पारनेर - विजय औटी (शिवसेना)२२५ - अहमदनगर शहर - अनिल राठोड (शिवसेना)२२६ - श्रीगोंदा - बबनराव पाचपुते (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२२७ - कर्जत जामखेड - प्रा. राम शिंदे (भाजप)बीड -२२८ - गेवराई - बदामराव पंडीत (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२२९ - माजलगाव - प्रकाशदादा सोळंके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२३० - बीड - जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २३१ - अष्टी - सुरेश धस (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२३२ - केज (अनुसूचित जाती) - डॉ. विमलताई मुंदडा (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२३३ - परळी - पंकजा मुंडे-पालवे (भाजप)लातूर - २३४ - लातूर ग्रामीण - वैजनाथ शिंदे (कॉंग्रेस)२३५ - लातूर शहर - अमित देशमुख (कॉंग्रेस)२३६ - अहमदपूर - बाबासाहेब पाटील (रिडालोस)२३७ - उदगीर (अनुसूचित जाती) - सुधाकर भालेराव (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२३८ - निलंगा - शिवाजीराव पाटील निलंगेकर (कॉंग्रेस)२३९ - औसा - बसवराज पाटील (कॉंग्रेस)२४० - उमरगा - ध्यानराज चौगुले (शिवसेना)उस्मानाबाद -२४१ - तुळजापूर - मधुकरराव चव्हाण (कॉंग्रेस)२४२ - उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर (शिवसेना)२४३ - परांडा - राहुल मोटे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)सोलापूर - २४४ - करमाळा - शामल बागल (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २४५ - माढा - बबनराव शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २४६ - बार्शी - दिलीप सोपल (अपक्ष)२४७ - मोहोळ (अनुसूचित जाती) - लक्ष्मण ढोबळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२४८ - सोलापूर उत्तर - विजयकुमार देशमुख (भाजप)२४९ - सोलापूर मध्य - प्रणिती शिंदे (कॉंग्रेस)२५० - अक्कलकोट - सिद्रामप्पा पाटील (भाजप) २५१ - सोलापूर दक्षिण - दिलीप माने (कॉंग्रेस)२५२ - पंढरपूर - तुकाराम भालके (स्वाभिमानी पक्ष)२५३ - सांगोला - गणपतराव देशमुख (शेतकरी कामगार पक्ष)२५४ - माळशिरस (अनुसूचित जाती) - हनुमंत डोळस (राष्ट्रवादी कॉंग्रेस)सातारा - २५५ - फलटण (अनुसूचित जाती) - दिपक चव्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२५६ - वाई - मकरंद जाधव पाटील (अपक्ष)२५७ - कोरेगाव - शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२५८ - माण - जयकुमार गोरे (अपक्ष)२५९ - कराड उत्तर - शामराव पाटील (अपक्ष) २६० - कराड दक्षिण - विलासराव पाटील (कॉंग्रेस)२६१ - पाटण - विक्रमसिंह पाटणकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२६२ - सातारा - शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी कॉंग्रेस)रत्नागिरी - २६३ - दापोली - सूर्यकांत दळवी (शिवसेना)२६४ - गुहागर - भास्कर जाधव (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२६५ - चिपळूण - सदानंद चव्हाण (शिवसेना)२६६ - रत्नागिरी - उदय सामंत (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२६७ - राजापूर - राजन साळवी (शिवसेना)सिंधुदुर्ग -२६८ - कणकवली - प्रमोद जठार (भाजप)२६९ - कुडाळ - नारायण राणे (कॉंग्रेस)२७० - सावंतवाडी - दिपक केसरकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)कोल्हापूर -२७१ - चंदगड - बाबासाहेब कुपेकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२७२ - राधानगरी - के. पी. पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२७३ - कागल - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२७४ - कोल्हापूर दक्षिण - सतेज पाटील (कॉंग्रेस)२७५ - करवीर - चंद्रदीप नरके (शिवसेना)२७६ - कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर (शिवसेना)२७७ - शाहूवाडी - विनय कोरे (जनसुराज्य शक्ती पार्टी)२७८ - हातकणंगले (अनुसूचित जाती) - डॉ. सुजीक मिनचेकर (शिवसेना)२७९ - इचलकरंजी - सुरेश हाळवणकर (भाजप) २८० - शिरोळ - सा. रे. पाटील (कॉंग्रेस)सांगली -२८१ - मिरज (अनुसूचित जाती) - सुरेश खाडे (भाजप)२८२ - सांगली - संभाजी पवार (भाजप)२८३ - इस्लामपूर - जयंत पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २८४ - शिराळा - मानसिंग नाईक (अपक्ष)२८५ - पलूस कडेगाव - पतंगराव कदम (कॉंग्रेस)२८६ - खानापूर - सदाशिवराव पाटील (कॉंग्रेस)२८७ - तासगाव कवठेमहांकाळ - आर आर पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)२८८ - जत - प्रकाश शेंडगे (भाजप)
Tuesday, September 15, 2009
झंझावात आशा भोसले
मा. दीनानाथांसारख्या प्रतिभासंपन्न पित्याकडलं लाभलेलं स्वरांचं अनमोल धन, विलक्षण जिद्दी मन घेऊन आशाताईंनी पार्श्वगायनाच्या प्रांतात पाऊल ठेवलं, त्याला आता जवळजवळ साठ वर्षे होत आली.
सहा दशकं उलटली तरी आपल्यासारख्या रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद त्यांच्या आवाजात कायम आहे. बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व, या वयाच्या सर्व टप्प्यांत आणि पहाटेपासून उत्तररात्रीपर्यंत, दैनंदिनीच्या कुठल्याही वळणावर "आशाताईं'च्या सुरांनी उभारीच दिलेली आहे."उठी श्रीरामा'सारख्या भूपाळीतून पहाट प्रसन्न केलीय, "पंढरीनाथा झडकरी आता' किंवा "येगं येगं विठाबाई'सारख्या लालित्यपूर्ण भक्तिगीतांनी, दुपारच्या शांत वातावरणात पोटात खड्डा निर्माण केलाय. "नाच रे मोरा'नं शाळकरी सवंगडी भेटल्याचा आनंद दिलाय. "केव्हातरी पहाटे' किंवा "ही वाट दूर जाते'सारखं भावगीत असो, "रेशमाच्या रेघांनी'सारखी लावणी असो, आशाताईंच्या वैविध्यपूर्ण मराठी गीतांनी तांबड्या मातीतल्या साध्या माणसांना, वर्षानुवर्षे जगण्याचं बळ दिलंय.भावगीतांचा टप्पा बदलला, स्वररचनेचे आकार बदलले, रुची बदलली, पण आशाताईंचा आवाज बदलत्या प्रत्येक वळणावर अनोखे रूप घेऊन आपल्यासमोर आलाय. "तरुण आहे रात्र अजुनी' असो, गुलामअलींची गझल असो, नाट्यगीताचा तुकडा असू दे किंवा "जानम समजा करो'ची सुरावट असो, अनेक शब्दकार, संगीतकारांना, त्यांच्या शब्दस्वरांना आपल्या सुरांनी, आशाताईंनी "ताजा ग्रंथ' दिलाय.आपल्या मरगळलेल्या, गांजलेल्या आयुष्याला उभारी देणारा सुरांचा हा झंझावात आहे. आपल्या साऱ्यांच्या दैनंदिनीत सहजतेनं एकरूप झालेला. वैयक्तिक संकट-अडचणी बाजूला ठेवून, प्रसन्नपणे रंगमंचावरून सामोरे येत आपलेही ताणतणाव क्षणात दूर करणारा, सुरांचा हा चैतन्यदायी सुरेल आविष्कार आहे.तब्बल पंचवीस वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शनच्या जमान्यात अरुण काकतकरांच्या सौजन्यानं मी आशाताईंची प्रथम छोट्या पडद्यासाठी प्रकट मुलाखत घेतली. ८५ सालचा सप्टेंबर महिना. शहर मुंबई. फोर्टमधला आशिष स्टुडिओ. साईबाबावाल्या पांडुरंग दीक्षितांचा मुलगा "आशिष' केसातून हात फिरवत, सतत फिरक्या घेणारा, एकदम गंभीर झालेला असतो. कारण कोणत्याही क्षणी आशाताई स्टुडिओत येण्याची शक्यता असते.व्हायोलीन्स लागलेली. बाबूजी म्हणजे सुधीर फडके स्टुडिओत पोचलेले. मुलाखतीत ऐकवायच्या गाण्याचं रेकॉर्डिंग-कम-चित्रण करण्यासाठी आशाताई येणार असतात. त्यांच्या तोंडची गाणी पडद्यावर ज्यांच्यावर चित्रित होतात, त्या "नायिका' आपण नेहमी पाहतो, पण ती गाणी गाणाऱ्या पडद्यामागच्या "गायिका' मात्र प्रथमच पडद्यावर दिसणार असतात. स्टुडिओचा दरवाजा लोटताच मोगऱ्यासारखा वास देणाऱ्या इन्सेसचा गंध दरवळतो. पाठोपाठ खळाळत हसत आशाताई, स्काय ब्ल्यू काठाची पांढरी साडी, त्याच रंगाचे रेडिमेड फूल डोक्यात खोचलेले, अशा आत शिरतात. "चला आशिष, लवकर रेकॉर्डिंग करू या. मला नंतर "मेहेबूब'मध्ये पोचायचंय. एवढ्यात आशाताईंना "बाबूजी' दिसतात. क्षणात त्या विनम्र होतात. "नमस्ते बाबूजी...' निम्म्या झुकत हात जोडून नमस्कार करतात. "गीत रामायणा'त तल्लीन झाल्यानंतर हलते तशी मान हलवत, बाबूजी उजव्या हाताची एक तर्जनी नाचवत, आशाताईंकडे बघत आम्हाला सांगतात... "जशास तसे'मध्ये आशा प्रथम माझ्याकडे गायली.' लगेच आशाताई त्यांचे शब्द खोडतात... "नाही बाबूजी...' "जाळ्यात गावलाय मासा...!' पुढचं पाऊल. दोघांचे डोळे जुन्या आठवणींनी लकाकतात. "जिवलगा कधी रे येशील तू' गाण्याचं टी.व्ही.साठीचं रेकॉर्डिंग संपतं. बाबूजींचे डोळे पाणावलेले. ""त्या परमेश्वराची कृपा आहे. काय बाई आहे ही! पंचावन्न मध्ये मी प्रथम हे गाणं रेकॉर्ड केले अगदी तसाच आवाज. जागान् जागा तीच. कमाल आहे.'' बाबूजींना गदगदून येतं. बाबूजींच्या स्तुतीनं आशाताई संकोचतात. मान डावीकडे झुकवत, रुमाल मानेवर टिपत, काहीशा हसत, डोळ्यांतून साऱ्यांना "धन्यवाद' देत स्टुडिओबाहेर पडतात.इथून माझा त्यांच्याबरोबरचा गप्पाष्टकांचा प्रवास सुरू होतो. कधी प्रभुकुंज, पेडर रोड, कधी खारच्या हेमंतच्या फ्लॅटवर, कधी बर्मन साहेबांचा हॉल, कोल्हापूरचं मैदान, नाशिक वा नागपूरच्या हजारो रसिकांसमोर विस्तारलेलं स्टेज, बडोद्याच्या महाराजांचा दरबार, जिव्हाळ्याच्या बोरिवलीकरांसमोर वा नेहरू स्टेडियमच्या प्रांगणात किंवा ठाण्याच्या "इंद्रधनू'त किंवा अमेरिकेतल्या "सॅन होजे'च्या अधिवेशनात खचाखच भरलेल्या अनिवासी भारतीय मराठी संमेलनात. ऐन पंचाहत्तरीत मुसळधार पावसात पुण्यातल्या रमणबाग शाळेत भिजत, तेवीस गाणी म्हणण्याचा दुर्दम्य उत्साह. सतत इतक्या वर्षांत मी त्यांना खळाळत, उत्साहातच पाह्यलंय. चुकूनही दुर्मुखलेपण नाही.लाल, केशरी, हिरव्या काठांच्या सिल्क साड्या गाण्यागणिक बदलत, डोईवरचं फूल बदलत, कधी नवग्रहांची माळ ठसठशीतपणे गळ्याभोवती पेहनत, कधी पाचू, कधी पोवळं, माणकं, मोती, अशा माळा बदलत, कधी हिऱ्यांची कुडी तर पॅरिसचं मॉडर्न कानातलं लटकवत, मनगटावरचं हिऱ्यामोत्यांनी चकाकणारं ब्रेसलेट आकाशाच्या दिशेनं भिरकावत आशाताई, हातातल्या माईकवरून, पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावरही, "ले गई ले गई... मुझको हुई ना खबर' देशोदेशीच्या रंगमंचावरून म्हणू लागतात, तेव्हा त्यांची नातवंडं शोभतील, अशा वयाची श्रोत्यांमधली जनरेशनही बेभान होते, डुलायला लागते."विचारल्यावीण हेतू कळावा, त्याचा माझा सूर जुळावा...' म्हणता म्हणता अचानक घेतलेली आशाताईंची "तान,' अचानक आलेल्या वळवाच्या सरीचा प्रसन्न आनंद देते. "का रे अबोला'मधील "आर्जव,' "आ आ आजा' मधला "खळाळ,' "मेरा नाम है शबनम' म्हणत गाता गाता केलेला नटखट "संवाद,' "मुहब्बत क्या कहीये' म्हणत "गझल'चा नेमका पकडलेला चालू "ट्रेंड,' "सोना रे सोना रे...'मधून येणारी "नयी निखार,' "दिल चीज क्या है...' ऐकताना लखनौचा सरंजामीशाही महाल डोळ्यांसमोर उभं करणं, "पान खाये सैयॉं'मध्ये आठवणारी नौटंकीवाली, "शूरा मी वंदीले' म्हणताना दीनानाथांना केलेलं वंदन, कधी एखाद्या गाण्यातला "खटका,' तर कधी गाता गाता हसणं. त्या गात असतानाची किती किती रूप अनुभवलीयत. त्या नुसत्या "गायिका' नाहीत, तर प्रत्येक "शो' हिट करणाऱ्या बेस्ट परफॉर्मरही आहेत.केसाचा बुचडा बांधत, तोंडाला कसलंसं तेल चोपडत, त्या त्यांच्या मुंबईतल्या पेडर रोडवरच्या "प्रभुकुंज'मधल्या फ्लॅटच्या खोलीतून बाहेर येतात आणि हॉलमध्ये समोर अचानक उभे ठाकलेले, आपण कुणी ओळखीचे दिसलो की भरभरून हसतात. "माणसांनी आपल्याकडे यावं' ही आपुलकी, अगत्य त्या हसण्यात पुरेपूर भरलेलं असतं. "आलेच हं' असं म्हणत, क्षणात आत पळतात. फटदिशी टिनोपॉल व्हाइट कॉटन साडी नेसून, एकदम ताज्या तवाण्या, प्रसन्न मुद्रेनं तुम्हाला सामोऱ्या येतात.मनात येईल ते मनःपूर्वक बोलून मोकळ्या होतात. राग आला तर साऱ्यांसमक्ष चिडतात, फटकारतात आणि स्वतःची छोटीशी जरी चूक लक्षात आली, तरी "इमेज'चा बाऊ न करता, फट्दिशी "माफ करा हं' म्हणत खळाळतात.इतक्या निकोप, निखळ, स्वच्छ असल्यानंच, गाण्यातही त्यांचं निकोप मन उतरते आणि मग ते गाणं मनाइतकंच उत्कट बनतं. घरात कुणाला बरं नाहीसं झालं, तर "पूजा' बोलतात. मंत्रोच्चार करवतात. उत्कट -हळुवारपणाबरोबरच, "परवशता पारा दैवी'सारखं आक्रमक गाणं म्हणणाऱ्या आशाताई वेळप्रसंगी कणखरही आहेत. सांसारिक टक्केटोणपे खाऊनही म्हणूनच त्या टिकून आहेत.गाणं असो वा खाणं, "जमत नाही म्हणजे काय?' हे आव्हान त्या कायम स्वीकारतात. "अशक्य' हा शब्द त्यांच्या कोशात नाही. बाबांसारखी नाट्यगीतं म्हणता यावीत म्हणून गणपतराव मोहित्यांकडून "ढब' जाणून घेतली. बाबूजींकडून "उच्चारण' घोटून घेतलं. हवं तिथेच व्हायब्रेशन देत, प्रत्येक शब्द, प्रत्येक भावना, वेगळ्या तऱ्हेनं कशी मांडावी हे बर्मनदांकडून शिकून घेतलं, "शब्द चावू नका, मोकळं गा' ही शब्दांवर लक्ष देण्याची शिकवण, सी. रामचंद्रांनी माहीत करून दिली. त्यामुळे "मलमली तारुण्य माझे' मस्त रंगलं. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरावटी ऐकण्यासाठी सोप्या, पण म्हणायला "अवघड,' त्यासाठी मेहनत घेतलीय. एकच आवाज वेगवेगळ्या स्टाइलने कसा आणता येतो त्याचा आत्मविश्वास "दी ट्रेन'पासून सुरू झालेल्या छोट्या बर्मनदांच्या बरोबरच्या प्रवासात वाढला. ध्वनिमुद्रणासाठी ध्वनिक्षेपकासमोर गेल्यावर त्या भोवतीचं सारं विसरतात. राग, लोभ, अन्याय, दुःख सारं सारं विसरून त्या गाण्यातल्या भावनेशी एकरूप होतात. समरस होतात. कारण माईक हाच माझा परमेश्वर आणि गाणं हीच माझी पूजा, यावर त्यांची श्रद्धा आहे.आयुष्यातील चढ-उतारांना, जो क्षण जसा येईल त्याला सामोरं जाणं, हसत जाणे, हा त्यांचा आयुष्यातला पणच आहे. कारण, त्यांचं म्हणणे...माझा रस्ता मी निवडलाय. त्याकरिता कुणाला दोष देणं मला आवडत नाही. मी "स्पष्टवक्ती- फटकळ' असल्याने मला "राजकारणात' आणि राजकारण करण्यात रस नाही.दीदींना त्या मानतात. "चले है तीर नजर के इधर से भी...' हे त्यांच्याबरोबर प्रथम द्वंद्वगीत म्हटले. दीदींनी "आनंदघन' म्हणून संगीतकार या नात्यानं "रेशमाच्या रेघांनी' ही लावणी म्हणवून घेतली. दीदी शेजारी असल्यानं मी म्हटलेली सर्वांत सभ्य लावणी, असं त्या मिस्कीलपणे नोंदवितात. बाळच्या म्हणजे हृदयनाथच्या रचना म्हणताना सर्वांत ताण असतो. तो गाताना गाण्याचे भाव, स्वर, लय, ताल यांना अगदी तपशिलात जाऊन बारकाव्यासह सादर करतो. त्याचं गाणं गाताना भीती वाटते. कारण सुरांच्या बाबतीत त्याचं कडक लक्ष असतं. त्याचं "जिवलगा राहिले रे दूर घर माझे' हे सात मिनिटाचं गाणं मी एका दमात गायलीय. श्वास जातोय कायमचा, असं वाटलं.""नव्या मंडळींनी गाण्याचा भाव अर्थ समजून घ्यायला हवा. संगीतकाराने शब्द कुठे तोडले आहेत, हरकत घेताना आवाजाला कुठे आवळून घ्यायला पाहिजे, ते शिकायला हवं. नुसत्या चाली पाठ करून चालणार नाही,'' असे त्या सुचवतात.पंचाहत्तरीतही त्यांच्या गाण्याची लोकप्रियता टिकून असण्यामागे कारण त्या सांगतात, की जसा जमाना आला, तशी मी बदलत गेले. त्या त्या जमान्याच्या स्टाइलमध्ये अडकले असते, तर संपले असते. सतत सर्वोत्तमच द्यायचं हा ध्यास. त्यामुळे मी गाणं आजही एन्जॉय करते. सुरेश भट आशाताईंना उद्देशून म्हणत...तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहोवार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहोतलवार तुझ्या गीतांची, बिजलीसम तळपत राहो।।
)

Subscribe to:
Posts (Atom)